MR/Prabhupada 0175 - धर्म म्हणजे हळूहळू कावळ्याचे हंसामध्ये रूपांतरण करणे



Lecture on SB 1.8.33 -- Los Angeles, April 25, 1972

कोणतेही साहित्य जे देवाबद्दलच्या ज्ञानाशी निगडित नाही , तद, तद वायसम तीर्थम, ते ठिकाण म्हणजे जिथे कावळे आनंद घेतात. कावळे कुठे आनंद अनुभवतात ? गलिच्छ ठिकाणी . आणि हंस, पांढरे हंस, ते स्वच्छ , सुंदर पाण्यात , जिथे बाग आहे , सुंदर आणि स्पष्ट पाणी आहे , पक्षी आहेत तिथे आनंद अनुभवतात . तर अगदी प्राण्यानंमध्येसुद्धा विभाग आहेत. हंस वर्ग आणि काक वर्ग.नैसर्गिक विभागणी . कावळा हंसाकडे जाणार नाही. हंस कावळ्याकडे जाणार नाही.

त्याचप्रमाणे मनुष्यांमध्ये , काक वर्गाचे पुरुष आणि स्वान वर्गाचे पुरुष आहेत. हंस वर्गाचे पुरुष इथे येतील कारण इथे सर्व काही स्पष्ट , चांगले आहे, चांगले तत्त्वज्ञान, चांगले अन्न, चांगले शिक्षण, चांगले ड्रेस, चांगले विचार, सर्वकाही चांगले आणि काक वर्ग पुरुष अशा आणि अशा क्लबमध्ये जातील, अशी पार्टी, नग्न नृत्य, अनेक इतर गोष्टी. तुम्ही पहाल . तर हे कृष्णभावनामृत आंदोलन हंस वर्गाच्या पुरुषांसाठी आहे. काक वर्गातलंय पुरुषांकरता नाही. नाही. पण आम्ही कावळ्यांना स्वानात रूपांतरित करू शकतो. तो आपला सिद्धांत आहे. जो कधी काळी कावळा होता तो आता हंसाप्रमाणे पोहत आहे कृष्ण भावनामृत चळवळीचा हाच लाभ आहे. तर जेव्हा हंस कावळा बनतात ते भौतिक जग आहे. तेच कृष्ण सांगत आहे :

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर भवति (भ गी 4.7)

जीव जेव्हा या भौतिक शरीरात आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी गुंततो , एका शारीनानंतर दुसरे शरीर ,परत दुसरे शरीर , एकामागे एक शरीर. ही स्थिती आहे. आणि धर्म म्हणजे हळूहळू कावळ्यांना हंसामध्ये रूपांतरित करणे . ज्याप्रमाणे एक माणूस खूप अशिक्षित, असभ्य असू शकतो, परंतु त्याला सुशिक्षित, सुसंस्कृत मनुष्य बनवता येऊ शकते . शिक्षणाद्वारे, प्रशिक्षणाद्वारे . तर मानवी जीवनामध्ये ही शक्यता आहे. मी कुत्र्याला भक्त बनवण्यास प्रशिक्षित करू शकत नाही. ते कठीण आहे. हे देखील करता येईल . पण मी इतका शक्तिशाली नसू शकतो .चैतन्य महाप्रभूंनी केले . जेव्हा ते जंगलातून जात होते , झारीखंडा, वाघ, साप, हरण, सर्व प्राणी भक्त झाले. ते भक्त बनले .

मग चैतन्य महाप्रभुसाठी काय शक्य आहे ... कारण ते स्वतः देव आहेत . ते काहीही करू शकतात . आपण ते करू शकत नाही. परंतु आपण मानवी समाजात काम करू शकतो. काही फरक पडत नाही, माणूस कितीही पतित असला तरी . जर त्याने आमच्या सूचनांचे पालन केले तर तो या मार्गावर चालू शकतो. त्याला म्हणतात धर्म . धर्म म्हणजे एखाद्याला त्याच्या मूळ स्थानावर आणणे. तो धर्म आहे. तर तिथे स्तर असू शकतात. परंतु मूळ स्थिती आहे की आपण भगवंताचे भाग आहोत , आणि जेव्हा आपण हे समजतो की आपण भगवंताचेच भाग आहोत , तेच आपल्या जीवनाची खरी अवस्था आहे . त्याला म्हणतात ब्रह्म -भूत (श्री ब 4.30.20) अवस्था ,त्याच्या ब्राह्मणत्वाची ओळख ,पूर्तता होणे.