MR/Prabhupada 0176 - जर तुम्ही कृष्णावर प्रेम करत असाल तर कृष्ण तुमच्यासोबत अखंड राहील
Lecture on SB 1.8.45 -- Los Angeles, May 7, 1973
तर आपल्याकडे या गूढ शक्ती आहेत , परंतु आम्हाला त्याचे ज्ञान नाही. याचे उदाहरण दिले आहे. हरीण ज्याच्या नाभिमध्ये कस्तुरी आहे ज्याचा सुगंध अप्रतिम आहे, तो इथे तिथे , इथे तिथे उडया मारत राहतो, हा सुगंध कुठून येत आहे? त्याला माहित नाही कि त्याच्या नाभी मधूनच सुगंध येत आहे. त्याच्या आतच सुगंध आहे, पण तो शोधत आहे, "कुठे आहे? कुठे आहे?" त्याचप्रमाणे आपल्यात इतक्या सुप्त गूढ शक्ती आहेत. आम्ही अपरिचित आहोत.
परंतु जर तुम्ही गूढ योग प्रणालीचा अभ्यास कराल , त्यांच्यापैकी काही , आपण अगदी छानपणे विकास करू शकता . जसे पक्षी उडत आहेत , आपण उडू शकत नाही. काहीवेळा आपण अशी इच्छा करतो की, "मला कबुतराचे पंख असते तर ..." काही असे काव्य आहत : "मी ताबडतोब जाऊ शकतो ." पण ती रहस्यमय शक्ती देखील तुमच्या आत आहे. जर आपण योगिक सरावाने ते विकसित केले तर आपण हवेत सुद्धा उडू शकता . हे शक्य आहे. एक ग्रह आहे ज्याला सिद्ध लोक म्हणतात. सिध्दलोकात, रहिवासी, त्यांना म्हटले जाते ... सिद्धलोकी म्हणजे त्यांना अनेक गूढ शक्ती प्राप्त झाल्या आहेत. आम्ही अनेक यंत्रांद्वारे चंद्र ग्रहावर जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. ते उडू शकतात . इच्छा केल्याबरोबर ते उडू शकतात . तर गूढ शक्ती सर्वांमध्ये आहेत . त्या विकसित करायला हव्यात .
- परास्य शक्तिर विविधैव श्रुयते (चै च मध्य १३।६५, अभिप्राय)
आपल्याजवळ इतक्या सुप्त शक्ती आहेत, त्यांना विकसित करावे लागते . श्रीकृष्णाप्रमाणे , जवळपास चार किंवा पाच वर्षांपूर्वी तुम्हाला कृष्ण काय आहे माहित नव्हते . विकास करून आपण कृष्ण जाणून घेत आहात , देव काय आहे, आपला संबंध काय आहे. तर मानवी जीवन हे अशा विकासासाठी आहे,यासाठी नाही कि अन्न कुठे मिळेल , निवारा कुठे मिळेल , संभोग कुठे मिळेल . हे आधीपासूनच आहेत.
- तस्यैव हेतोह प्रयतेत कोविदो न लभ्यते (श्री भ १।५।१८)
या गोष्टी आपल्या चौकशीच्या विषय नाहीत. हे आधीपासूनच आहेत . पक्षी आणि प्राण्यांसाठीदेखील इथे पुरेसा आहे आणि माणसाबद्दल काय बोलावे? पण ते इतके मूर्ख झाले आहेत. ते फक्त अन्न कुठे आहे, आश्रय कुठे आहे, संभोग कुठे आहे, संरक्षण कुठे आहे याबद्दल विचार करत आहेत . ही चुकीची संस्कृती आहे, भ्रमित झालेली . तर या गोष्टींचा प्रश्नच उद्भवत नाही ... या गोष्टींची चिंता नाहीच आहे . त्यांना दिसत नाही की त्या प्राण्यांना काही चिंता नाही, पक्ष्यांना काही चिंता नाही. मानव समाजाला अशी समस्या का आहे? त्या सर्व समस्या नाहीच आहेत . वास्तविक समस्या म्हणजे जन्म, मृत्यू ची पुनरावृत्ती थांबवणे , वृद्धत्व आणि आजार .ही वास्तविक समस्या आहे. कृष्ण भावनामृत चळवळीतून ही समस्या सोडवली जात आहे. जर तुम्ही केवळ समजून घ्याल कृष्ण काय आहे ,
- यक्त्वा देहम पुनर जन्म नैति (भ गी ४।९)
मग पुन्हा भौतिक जन्म नाही. म्हणून कृष्णभावनामृत चळवळ खूपच छान आहे, जर तुम्ही कृष्णासोबत मैत्रि केलीत तर तुम्ही कृष्णासोबत बोलू शकता. जसे युधिष्ठिर महाराजांनी विनंती केली की, "कृष्ण, काही दिवस अधिक रहा." तर कृष्ण, काही दिवस नाही, अखंड तुमच्यासोबत राहील जर तुम्ही कृष्णावर प्रेम कराल.खूप धन्यवाद.