MR/Prabhupada 0177 - कृष्ण चैतन्य सनातन सत्य आहे



Lecture on SB 1.15.28 -- Los Angeles, December 6, 1973

तर आपले जिव्हळ्याचे संबंध आहेत. तर आपण जेव्हा या स्थितीला येतो जिथे आपण भगवंताशी आपले घनिष्ठ नातेसंबंध समजतो , ज्याला म्हणतात स्वरुप-सिद्धी, स्वरुप-सिद्धी. स्वरुप-सिद्धी म्हणजे परिपूर्णतेचा अनुभव , स्वरुप-सिद्धी. तर इथे सुत गोस्वामी म्हणतात सौह्रदेन गधेन संता . जर एखादा जुना मित्र दुसर्या जुन्या मित्राला भेटतो तेव्हा ते खूप आनंदित होतात . तसेच, जर वडिलांची हरवलेल्या मुलाशी भेट झाली , तर ते अतिशय आनंदित होतात . आणि मुलालाही आनंद होतो. पती, पत्नी विभक्त झाल्यावर जेव्हा पुन्हा भेटतात. ते खूप आनंदित होतात.हे खूप नैसर्गिक आहे. स्वामी आणि सेवक जर बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा भेटतात तर ते अतिशय आनंदित होतात . तर अनेक मार्गांनी आपले कृष्णासोबत संबंध आहेत , संत, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य. संत , संत म्हणजे तटस्थ , केवळ सर्वोच्च समजण्यासाठी. दास्य म्हणजे पुढचे एक पाऊल. जसे आपण म्हणतो "देव महान आहे."

ते आहे सांत , देवाच्या महानतेची प्रशंसा करणे. पण तिथे कुठलीही कृती नाही. पण जेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे जाल , "देव महान आहे तर मी इतक्या सर्वाची सेवा करत आहे , समाज, मैत्रि, प्रेम, मांजरे, कुत्रे आणि इतर अनेकांना मी प्रेम करत आहे " मी त्या सर्वोच्च ला का प्रेम करू नये ?"त्याला म्हणतात दास्य . देवाचा साक्षात्कार होणे महान आहे ते सुद्धा चांगले आहे . पण जेव्हा आपण स्वेच्छेने पुढे जातो, "सर्वोत्तमाची सेवा का करु नये?"

सामान्य सेवांप्रमाणे, जे सेवे मध्ये व्यस्त आहेत, ते कनिष्ठ सेवा पासून वरिष्ठ सेवेकडे बदलण्याचा प्रयत्न करतात. सेवा आहे . पण वरिष्ठ सेवा आहे एखाद्याला सरकारी सेवा मिळने . ते फार छान आहे असे त्याला वाटते . त्याचप्रमाणे , जेव्हा आपण सर्वोत्तमाची ची सेवा करायची आशा करतो , ते आपल्याला शांत जीवन देते. ते आहे संत , दास्य . नंतर मैत्रीची सेवा. सेवा, सेवक मालकाला सेवा देत आहे , परंतु जेव्हा सेवक फार निकट असतो तिथे मैत्री असते. मी व्यावहारिकदृष्ट्या हे कलकत्त्यामध्ये पाहिले आहे. डॉ. बोस, त्यांनाच ड्रायव्हर त्यांचा सर्वात चांगला मित्र होता. जेव्हा ते कारमध्ये बसत तेव्हा ते ड्रायव्हरसोबत आपले सारे मन मोकळे करत असत . तर हा ड्रायव्हर, तो त्याचा जवळचा मित्र बनला. ड्राइव्हरसह सर्व गोपनीय चर्चा. तर असे घडते. जर सेवक खूप जवळचा झाला, तर मालक आपले मन उघड करतो. तो त्याच्याशी बोलतो काय केले पाहिजे .

म्हणून याला मित्रत्वाचे व्यासपीठ म्हणतात. आणि पुढे आणखी प्रगती ... जसे पिता आणि मुलगा, आई आणि मुलगा यांच्यातील संबंधाप्रमाणे याला वात्सल्य म्हटले जाते, आणि शेवटी वैवाहिक प्रेम . तर अशा प्रकारे आम्ही कृष्णाशी कोणत्या तरी प्रकारे संबंधित आहोत. पुज्यभावात , सेवाभावात , मित्र म्हणून, पितृ संबंध म्हणून किंवा प्रियकर म्हणून. आपल्याला ते पुनरुज्जीवित केले पाहिजे. आणि जसजसे तुम्ही यांच्यापैकी एकाचेही पुनरुज्जीवन कराल, जवळीक , मग आपण आनंदी होऊ, कारण ते अनंत आहे. सारखेच उदाहरण ... बोट,जोपर्यंत ते वेगळे आहे , ते आनंदी नाही. जसे ते जोडले जाते , तसे ते आनंदी होते. त्याचप्रमाणे, आपले कृष्णासोबत शाश्वत नाते आहे . आता आपण वेगळे आहोत, पण जेव्हा आपण त्याला पुन्हा एकदा भेटू तेव्हा आपण येनात्मा सुप्रसीदति .

म्हणूनच कृष्ण भावनामृत चळवळ सर्वांनाच फायद्याची आहे आपल्या मूळ चेतनेला पुनरुज्जीवित करण्यासाठी. ते आधीच तिथे आहे, नित्य-सिद्ध कृष्णभक्ती. आपले कृष्ण भावनामृत सनातन सत्य आहे. अन्यथा तुम्ही युरोपीयन, अमेरिकन मुलं आणि मुली, तीन-चार वर्षांपूर्वी, तुम्हाला कृष्ण माहित सुद्धा नव्हता. तुम्ही कृष्णासोबत इतके का जोडले गेलात ? आपण संलग्न का आहात? आपण कृष्णाशी जोडलेले नसतो तर , आपण या मंदिरात किंवा श्रीकृष्णाच्या वैभव प्रचारासाठी आपला मौल्यवान वेळ अर्पण करू शकला नसता. तुम्ही कृष्णसाठी प्रेम विकसित केले आहे. अन्यथा कुणी इतका मूर्ख नाही की आपला वेळ वाया घालवित बसेल . हे कसे शक्य आहे? कोणी म्हणेल की कृष्ण भारतीय आहे, कृष्ण हिंदू आहे. मग ख्रिश्चन का इच्छुक आहेत? ते हिंदू आहेत का? नाही. कृष्ण ना हिंदू आहे , ना मुस्लिम आहे ना ख्रिश्चन आहे . कृष्ण हा कृष्ण आहे. आणि तुम्ही कृष्णचाच भाग आहात . हि समाज कि "मी हिंदू आहे," "मी मुस्लिम आहे," "मी ख्रिश्चन आहे," "मी अमेरिकन आहे," "मी भारतीय आहे" - हि सर्व पदे आहेत. वास्तविक मी आत्मा आहे, अहं ब्रह्मास्मि. आणि कृष्ण हा सर्वोच्च ब्राह्मण आहे ,

परम ब्रह्म परम धाम परमम पवित्रम भवान (भ गी १०।१२)

तर आपले कृष्णासोबत घनिष्ट नाते आहे. हे सनातन सत्य आहे. फक्त आपल्याला पुनरुज्जीवित करावे लागेल. श्रवणादि- शूद्ध-चित्ते करये उदय . आपल्याला तयार करावे लागेल . जसे एखाद्या तरुणाला तरुण मुलीवर प्रेम करावसं वाटतं आणि तरुण मुलीला तरुण मुलावर प्रेम करावंसं वाटतं. ते स्वाभाविक आहे. ते स्वाभाविक आहे. परंतु जेव्हा ते पुन्हा भेटतात, तेव्हा ते पुनरुज्जीवित होते. हे काहीतरी नवीन लादले नाही , ते तिथे आहे. पण काही कारणामुळे किंवा कोणत्याही प्रकारे, जेव्हा ते संपर्कात असतात, प्रेम प्रवृत्ती वाढते. प्रेम वाढते. तर कृष्णसोबतचे आपले नाते, हे नैसर्गिक आहे.ते अनैसर्गिक नाही . नित्य-सिद्ध. नित्य-सिद्ध म्हणजे हे सनातन सत्य आहे.फक्त ते झाकलेले आहे. ते झाकलेले आहे. ते आवरण दूर करायचे आहे. मग आपण त्वरित नैसर्गिक रित्या कृष्णासोबत जोडले जातो. ते कृष्ण चैतन्याची परिपूर्णता आहे .