MR/Prabhupada 0187 - नेहमी तेजस्वी प्रकाशात रहा



Lecture on SB 2.8.7 -- Los Angeles, February 10, 1975


तर हे अज्ञान चालूच आहे. म्हणूनच भविष्यातील मार्गदर्शनासाठी परिक्षित महाराजांनी हा प्रश्न विचारला, की "जीवाला हे भौतिक शरीर कसे प्राप्त होते ? ते आपोआपच होते कि काही कारणामुळे किंवा कुठल्याही कारणाशिवाय होते ? परंतु कारणांमुळे ... ते समजावता येईल.ते नाही ... जेव्हा कारण असेल ... ज्याप्रमाणे आपण जर आजाराने संक्रमित झालो तर आपोआप त्या आजाराने ग्रस्त होऊ . हे आपोआप येईल ते आपोआप होते . परंतु तुमचे संक्रमित होणे हे कारण आहे. म्हणून जर आपण सावध होऊ संक्रमित होण्यापासून , तर खालचा जन्म किंवा दुःखाचे कारण टाळू शकता येईल . म्हणूनच आम्ही हा समाज, समाज सुरु केला आहे. समाज म्हणजे तुम्ही इथे तरच याल जर तुम्ही उन्नत असाल . जसे अनेक संस्था आहेत , समान स्तरावरच्या माणसांची . जसे समान पंखांचे पक्षी एकाच थव्यात असतात . तशीच इथे एक संस्था आहे , या कळपात कोण येणार ? कोण इथे यणार आहेत ? कारण हि संस्था मुक्ती करता आहे . जिवनातील भौतिक कारणांमुळे लोकं त्रस्त आहेत . कोणीही सुखी नाही . हे सत्य आहे . कारण ते अज्ञानात आहेत , ते दुख सुख म्हणून स्वीकारत आहेत . याला म्हणतात माया , हि आहे माया .

यन मैथुनादि-ग्रहमेधि-सुखम हि तुच्छम (SB ७।९।४५).

हि माया मैथुनाच्या रुपात खूप प्रबळ आहे . ते स्वीकारतात कि संभोग जीवन छान आहे, पण त्यानंतर तिथे तणाव आहे . वैध किवा अवैध , त्याने फरक पडत नाही . वैध तणाव किवा अवैध तणाव , पण तो तणावाच आहे . आपल्या सर्वाना माहित आहे. म्हणून, सर्व काही ... वाईट सौद्याचा उत्तम वापर करणे. आपल्याला हे भौतिक शरीर मिळाले आहे. कारण तिथे होते. कारण आहे कारण आम्ही आनंद घेऊ इच्छित होतो आणि मला कृष्णाची सेवा करायला आवडत नव्हतं. हे कारण आहे. कृष्ण-बहिरमुख हना भोग वान्छा करे. आम्ही कृष्णाची सेवा करत आहोत. हे आमचे, माझे असे म्हणणे आहे की जागा , घटनात्मक पद आहे, कृष्णाची सेवा करण्यासाठी , पण कधीकधी आम्ही अशी इच्छा करतो की: "मी कृष्णाची सेवा का करावी ? मी आध्यात्मिक गुरुची सेवा का करू? मी आनंद भोगला पाहिजे . पण तो आनंद होता कृष्णाची सेवा करण्यात ,पण त्याने कृष्णापासून मुक्त होऊन आनंद उपभोगायची इच्छा बाळगली. हे पतनाचे कारण आहे. कृष्णासोबत आपण खूप छान आनंदित राहू शकता. तुम्ही चित्र पाहिले आहे, कसे गोपी छानपणे नाचत आहेत , आनंद घेत आहेत ; गोप मुले खेळत आहेत, आनंद घेत आहेत. कृष्णासोबत , हा तुमचा वास्तविक आनंद आहे.

पण कृष्णाशिवाय ,जेव्हा आपण आनंद घेऊ इच्छितो तेव्हा ती माया आहे. ती माया आहे. तर माया हि नेहमीच तीथे आहे आणि आपण ... कारण जोपर्यंत अंधकार नाही तोपर्यंत, आपण प्रकाशाच्या गुणवत्तेची प्रशंसा करू शकत नाही; म्हणून कृष्णाने अंधार निर्माण केला , माया , जेणेकरून तुम्ही प्रकाश काय आहे त्याची दाद देऊ शकता.. दोन गोष्टी आवश्यक आहेत. प्रकाशाशिवाय, अंधाराचे महत्त्व समजू शकत नाही आणि अंधार ... अंधाराशिवाय, प्रकाशाची महत्ता समजू शकत नाही. दोन गोष्टी आहेत, शेजारी शेजारी. जसे सूर्यप्रकाश आहे आणि इथे छाया आहे, शेजारी शेजारी. आपण सावलीमध्ये राहू शकता; आपण सूर्यप्रकाशात राहू शकता ती आपली निवड आहे. जर आपण अंधारात राहिलो तर आपली जीवन दुःखी आहे आणि जर आपण प्रकाश, तेजामध्ये ... तर वेदिक साहित्य आम्हाला निर्देश देतात , तमसी मा: "अंधारात राहु नका." ज्योतिर गमा: "प्रकाशाकडे जा." तर हा प्रयत्न, कृष्ण भावनामृत चळवळ , लोकांना अंधारापासून प्रकाशात आणण्याचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे या संधीचा गैरवापर करू नका. कुठल्यातरी मार्गाने , आपण या आंदोलनाच्या संपर्कात आलो आहोत. याचा योग्य वापर करा . अंधारात राहू नका. नेहमी तेजस्वी प्रकाशात रहा. खूप धन्यवाद.