MR/Prabhupada 0193 - आमचा संपूर्ण समाज या पुस्तकांमधून ऐकत आहे
Room Conversation with Professor Durckheim German Spiritual Writer -- June 19, 1974, Germany
डॉ. पी. जे. सहेर : तुम्ही कृपाकरुन तुमची पद्धती अधिक स्पष्ट् करून सांगू शकाल ... एखादा देवाच्या नावाचा जप करतो आणि आपण अधिक स्पष्ट करू शकाल का , विशिष्ट प्रकारे, किंवा ... (जर्मन) त्याव्यतिरिक्त अजून काय केले जाऊ शकते , किंवा ते कशा पद्धतीने केली जाते, आपल्या धार्मिक शिकवणींच्या संपूर्ण प्रणालीमध्ये ? प्रभुपाद: होय. हा भक्ती-मार्ग आहे, पहिली गोष्ट म्हणजे श्रवणम, ऐकणे. जसे लोकांना ऐकण्याची संधी देण्यासाठी हि पुस्तके दिली जात आहेत . ते प्रथम काम आहे .
जर आपण देवाबद्दल ऐकले नाही तर आपण केवळ कल्पना करत राहू. नाही. आम्ही देवाबद्दल ऐकले पाहिजे. आम्ही अशा प्रकारची ऐंशी पुस्तके प्रकाशित करीत आहोत, फक्त देवाबद्दल ऐकायला. मग जेव्हा आपण उत्तम प्रकारे ऐकता तेव्हा आपण इतरांना वर्णन करून सांगू शकता. त्याला म्हणतात किर्तनम, श्रवणम , किर्तनम. आणि जेव्हा ऐकून आणि जपून प्रगती होत जाते , कीर्तनम म्हणजे वर्णन करणे . आमच्यासारखे, हा संपूर्ण समाज या पुस्तकांमधून ऐकत आहे आणि ते वर्णन करण्यासाठी बाहेर जात आहेत. याला म्हणतात किर्तन. मग या दोन प्रक्रियांद्वारे , ऐकणे आणि जप करणे, तुम्ही स्मरण करा, स्मरणम . याचा अर्थ, आपण ईश्वराशी जोडले आहोत याचे नेहमीच स्मरण करणे . डॉ. पी. जे. साहेर: म्हणजे नेहमीच "माझे स्मरण करणे " प्रभुपाद: होय. होय.
- श्रवणम कीर्तनम विष्णो .स्मरणम पाद-सेवानम (श्री भ ७।५।२३)
त्यानंतर देवतेची पूजा करणे, परमेश्वराच्या चरणी फुल अर्पण करणे, हार घालणे, वेषभूषा करणे, पाद-सेवनम, अर्चनम् वन्दनम, प्रार्थना करना, दास्यम, सेवा , अशा प्रकारे, नऊ वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. डॉ. पी. जे. साहेर: ख्रिश्चनांमध्येही अशीच पद्धत आहे ... (जर्मन). प्रभुपाद: होय. ख्रिस्ती पद्धत, प्रार्थने करणे , ही भक्ती आहे, ती भक्ती आहे. (जर्मन) कली-युग म्हणजे संघर्ष. सत्य समजण्यास कुणालाही स्वारस्य नाही, पण ते फक्त लढत आहेत. "माझ्या मते, हे." मी म्हणतो, "माझे मत, हे." तुम्ही म्हणता, "त्याचे मत." तर अनेक मूर्ख मते आणि एकमेकांमध्ये लढा . असा काळ आहे . कोणतेही आदर्श मत नाही. प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. त्यामुळे विरोध आहे . प्रत्येक जण म्हणतो, "मला असे वाटते." मग तुमचे मूल्य काय आहे, तुम्ही असा विचार करत आहात ?ते कली-युग आहे. कारण आपल्याकडे मानक , आदर्श ज्ञान नाही.
एक मुलगा जर वडीलांना म्हणतो , "माझ्या मते, आपण असे करावे." ते मत स्वीकारावे का? जर त्याला काहीच माहिती नसेल तर तो आपले मत कसे देऊ शकेल? पण इथे, या युगात , प्रत्येकजण स्वत: च्या मतानुसार वागत आहे . म्हणून हा विरोध लढा. संयुक्त राष्ट्राप्रमाणे, सर्व मोठी माणसे एकजुट होण्यासाठी तिथे जातात, परंतु ते फक्त झेंडे वाढवत आहेत. लढाई , हा केवळ लढणारा एक समाज आहे. पाकिस्तान, हिंदुस्तान, अमेरिकन, व्हिएतनाम. ते ऐक्य होण्यासाठी आले होते परंतु ते लढाई संघटने मध्ये बदलत आहेत. बस. सर्व काही . कारण प्रत्येकजण अपूर्ण आहे, एखाद्याने त्याचे परिपूर्ण ज्ञान द्यावे. जर्मन लेडी: म्हणजे कलियुग नेहमी अस्तित्वात आहे का? प्रभुपाद: नाही. हा काळ आहे जेव्हा मूर्ख पुरुष विकसित झाले आहेत ( विराम ) ... उपाय शोधण्याऐवजी लढाया वाढत आहेत . कारण त्यांच्याकडे मानक ज्ञान नाही. म्हणूनच या ब्रह्मसूत्रात म्हटले आहे की परम सत्य काय आहे त्याची चौकशी करा. अथातो ब्रह्म जिज्ञासा, आता उत्तर, पुढील उल्लेख आहे, की ब्राह्मण, किंवा संपूर्ण सत्य हे आहे की, ज्याच्यापासून सर्वांची उत्पत्ती झाली आहे .
- अथातो ब्रह्म जिज्ञासा जन्मादि अस्य यत: (श्री भ १।१।१)
आता आपण कुठे आहोत हे शोधून काढा ... प्रत्येकजण हेच शोधण्याचा प्रयत्न करीत आहे की अंतिम कारण काय आहे. ते लक्ष्य असावे . कि आपण जर या तत्त्वज्ञानी उद्धरणांचे अनुसरण केले तर आपली लढाई थांबेल. आपण शांत व्हाल. हे वचन सुधा तत्त्व जिज्ञासा. तत्त्व जिज्ञासा म्हणजे परम सत्याबद्दल चौकशी करणे. खाली बसा , कारण समाजात पुरुषांचा एक वर्ग असावा, खूप ज्ञानी पुरुष्णाचा वर्ग , जे संपूर्ण सत्य बद्दल चर्चा करीत आहेत आणि ते इतरांना सांगतील, "हे संपूर्ण सत्य आहे, माझ्या प्रिय मित्रांनो, माझ्या प्रिय ... " तुम्ही असे करा . त्याची आवश्यकता आहे. पण इथे सर्व पूर्ण सत्यात आहेत . म्हणजेच लढत आहेत.