MR/Prabhupada 0194 - इथे आदर्श पुरुष आहेत
Lecture on SB 7.6.4 -- Toronto, June 20, 1976
तर आपण शास्त्र-विधीचे अनुसरण करणे आवश्यक आहे, तीच संस्कृतीची वास्तविक उन्नती आहे. कारण जन्म जन्मानंतर आपण भगवंताशी असलेल्या नातेसंबंधाबद्दल विसरलो आहोत , आणि हे एकमेव संधी आहे, मनुष्य जीवन , आपण भगवंताशी आपले नाते पुनरुज्जीवित करू शकतो. चैतन्य-चरितामृतमध्ये असे म्हटले आहे की: अनादि बहिर-मुख जीव कृष्ण भुलि गेला अतैव कृष्ण वेद-पुराण करिला हि वेद, पुराणे का आहेत ? विशेषत: भारतामध्ये, आपल्याकडे इतके वैदिक साहित्य आहे. सर्व प्रथम, चार वेद - साम, यजुर्वेद, ऋग्, अथर्व . मग त्यांचे सारांशरूप तत्त्वज्ञान, वेदांत-सूत्र . मग वेदांत स्पष्टीकरण, पुराण. पुराण म्हणजे पुरक . सामान्य व्यक्ती, त्यांना वैदिक भाषा समजू शकत नाही. म्हणून ऐतिहासिक संदर्भांवरून वैदिक तत्त्वे शिकवली जातात. त्याला पुराण म्हणतात. आणि श्रीमद-भागवतमला महा-पुराण असे म्हणतात. हे निर्दोष पुराण आहे , श्रीमद -भागवतम , कारण इतर पुराणामध्ये भौतिक विधी आहेत , परंतु या महा-पुराणात , श्रीमद-भागवतम मध्ये, फक्त अध्यात्मिक विधी आहेत. त्याची आवश्यकता आहे.
तर नारदांच्या मार्गदर्शनाखाली हे श्रीमद -भागवतम व्यासदेवांनी लिहिलेले होते. महा-पुराण . तर आपल्याला त्याचा फायदा घेतला पाहिजे .इतके मौल्यवान साहित्य. मानवी जीवन त्या साठी आहे आपण का दुर्लक्ष करीत आहात? आमचा, आमचा प्रयत्न आहे, हि कृष्ण भावनामृत चळवळ आहे की वेद आणि पुराणांचे ज्ञान कसे पसरवायचे , ज्यायोगे मनुष्यमात्र त्याचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांचे जीवन यशस्वी होऊ शकेल. नाहीतर, जर तो दिवसरात्र डुकरासारखा कठोर परिश्रम करत राहिला तर ... डुक्कर दिवस रात्र खूप कठोर परिश्रम करीत असतो हे शोधण्यासाठी "विष्ठा कुठे आहे? कोठे आहे?" आणि विष्टा खाल्ल्यानंतर जेव्हा ते थोडे जाडे होतात ... म्हणून डुक्कर जाडे असतात, कारण विष्ठेमध्ये अन्नपदार्थाचा मूल असते. वैद्यकीय विज्ञानाच्या मते विष्टा हायड्रोफॉस्फेट्ने भरलेली असते . तर हायड्रोफॉस्फेट चांगले टॉनिक आहे. त्यामुळे एखाद्याला आवडत असल्यास ते घेऊ शकतात (हशा) पण प्रत्यक्षात हे खरं आहे. डुक्कर जाडे होतात कारण ती विष्टा असते. तर हे जीवन डुक्कर बनण्यासाठी नाही आहे . एखाद्याने संत वृत्तीचे व्हायला हवे. ती मानवी संस्कृती आहे. म्हणूनच वैदिक संस्कृतीमध्ये - ब्राह्मण, प्रथम श्रेणीतील पुरुष. आता या समाजात प्रथम श्रेणीतील पुरुष नाहीत. सर्व तिसरा वर्ग, चौथा वर्ग, पाचवा वर्ग आहे.
- सत्य-शम-दम-तितीक्श अार्जव ज्ञानम्-
- विज्ञानम् अास्तिक्यम् ब्रह्म-कर्म स्वभाव-जम (भ गी १८।४२)
हा प्रथम श्रेणीचा पुरुष आहे. खरा, अतिशय शांत, ज्ञानाने पूर्ण, अतिशय साधा, सहनशील आणि शास्त्रामध्ये विश्वास ठेवणारा . हि प्रथम श्रेणीतील पुरुषांची लक्षणे आहेत. तर मग संपूर्ण जगात असा प्रथम श्रेणीचा माणूस कुठे आहे? (ब्रेक) ... कृष्ण भावनामृत चळवळ किमान एक विभाग, प्रथम श्रेणीतील पुरुष तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून लोक पाहू शकतील, "अरे, इथे आदर्श पुरुष आहेत." म्हणूनच या कृष्ण भावनामृत चळवळीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना माझी विनंती आहे , त्यांनी स्वतःला प्रथम श्रेणीतील पुरुष म्हणून काळजी घेतली पाहिजे . लोक प्रशंसा करतील आणि ते अनुसरण करण्याचा प्रयत्न करतील .
यद यद अचरति श्रेष्ठस तत तद एवतरो जना: (भ गी ३।२१)
पुरुषांचा एक वर्ग असेल , प्रथम श्रेणीतील , मग लोक प्रशंसा करतील. किमान (ते) अनुसरण करण्याचा प्रयत्न करतील , जरी (ते) पहिल्या वर्गातील होऊ शकत नाहीत . तरीही ते पालन करण्याचा प्रयत्न करतील. तत तद एव, स यत प्रमानम् कुरुते लोकस तद अनुवर्तते त्यामुळे प्रथम श्रेणीतील मनुष्यांची गरज आहे. जर त्याने कृती केली तर इतर लोक अनुसरण करतील . शिक्षकाने धूम्रपान केले नाही तर , विद्यार्थी नैसर्गिकरित्याही धूम्रपान थांबवतील. पण जर शिक्षक धूम्रपान करीत असेल, तर विद्यार्थी कसे ...? ते देखील वर्गात धुम्रपान करत आहेत. मी न्यू यॉर्क मध्ये पाहिले आहे. कमीत कमी भारतामध्ये हे अद्याप सुरु झाले नाही. ते सुद्धा सुरू होईल कारण ते सुद्धा प्रगती करत आहेत (हशा) . हे मूर्ख लोक प्रगती करत आहेत, नरकात जाण्यासाठी (हशा) तर , प्रह्लाद महाराज सल्ला देतात , तथाकथित आर्थिक विकास आणि मूर्खपणाच्या उपक्रमांमध्ये आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका. मुकुंदाचे भक्त होण्याचा प्रयत्न करा , मग आपले जीवन यशस्वी होईल.