MR/Prabhupada 0196 - फक्त अध्यात्मिक गोष्टींची लालसा बाळगा



Lecture on BG 2.58-59 -- New York, April 27, 1966


तर अध्यात्मिक जीवनाची सुंदरता कशी पाहावी हे आपल्याला शिकावं लागेल. मग, नैसर्गिकरित्या आपण भौतिक गोष्टींपासून दूर जाऊ. अगदी लहान मुलाप्रमाणे. तो सर्व दिवस खेळत आहे,खोड्या करत आहे परंतु जर त्याला काही चांगले काम दिले तर ... शैक्षणिक विभागामध्ये , खूप साधने आहेत बालवाडी पद्धत किंवा हि पद्धत किंवा ती पद्धत . पण जर तो व्यस्त झाला " 'अ', काढणे ' ब' काढणे . तर तो एकाच वेळी अ ब क ड शिकतो, आणि त्याच वेळी त्याच्या चुकीच्या कृत्यांपासून दूर राहतो. इथेही सामान गोष्टी आहेत, अध्यात्मिक जीवनाची बालवाडी पद्धत . जर आपण आपले क्रियाकलापा अध्यात्मिक उपक्रमांमध्ये गुंतविला तरच या भौतिक क्रियाकलापांसून आपण दूर राहू शकतो.

क्रिया थांबवली जाऊ शकत नाही. क्रिया थांबवली जाऊ शकत नाही. तेच उदाहरण, अर्जुन ... किंबहुना ,भगवद् गीता ऐकण्याआधी तो निष्क्रिय झाला, लढायचं नाही . परंतु भगवद्गीता ऐकल्यानंतर तो अधिक सक्रिय झाले, परंतु दिव्या स्तरावर सक्रिय. तर अध्यात्मिक जीवन, किंवा अलौकिक जीवनाचा अर्थ असा नाही की आपण क्रियाकलाप पासून मुक्त होऊ . जर फक्त कृत्रिमपणे, आपण बसलो , "मी आता काहीच भौतिक करणार नाही. मी फक्त ध्यान करीन," ओह, तुम्ही कुठले ध्यान कराल? तुमचे ध्यान क्षणभंगुर असेल ज्याप्रमाणे विश्वामित्र मुनीं प्रमाणेच, ते त्यांचे ध्यान चालू ठेवू शकले नाहीत. आपल्याला नेहमीच, शंभर टक्के, आध्यात्मिक कार्यात गुंतले पाहिजे. तो आपल्या आयुष्याचा कार्यक्रम असावा. किंबहुना , आध्यात्मिक जीवनातून आपल्याला त्यातून बाहेर येण्यासाठी क्वचितच वेळ मिळेल. तुमच्याकडे इतकी कामं आहेत रस-वर्जम. आणि ते काम केवळ तेव्हा शक्य होऊ शकते जेव्हा आपण त्यामध्ये काही दिव्य आनंद मिळवू शकाल . तर ते केले जाईल. ते केले जाईल .

अादौ श्रद्धा तत: साधु-संग: (चै च मध्य २३।१४-१५)

अध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते, सर्व प्रथम, श्रद्धा, थोडीशी श्रद्धा. जसे तुम्ही कृपा करून इथे मला ऐकण्यासाठी येत आहात . तुमच्याकडे थोडी श्रद्धा आहे . ही सुरुवात आहे . श्रद्धेशिवाय आपण इथे थांबू शकत नाही कारण इथे कुठलाही सिनेमा चालू नाही . कुठल्याही राजकीय वार्ता नाही, काही नाही ... काहींसाठी हा अतिशय कोरडा विषय आहे. खूप कोरडा विषय (हसत) पण तरीही तुम्ही येताय . का? कारण तुमच्याकडे थोडीशी श्रद्धा आहे, "अरे, इथे भगवत-गीता आहे. आपण ऐकू या." तर श्रद्धा हि सुरुवात आहे. श्रद्धाहीन आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही. अादौ श्रद्धा . श्रद्धा. श्रद्धा हि सुरुवात आहे. आणि हि श्रद्धा , जितकी दृढ होत जाते तुम्ही प्रगती करत जाता . तर हि श्रद्धा दृढ झाली पाहिजे. सुरुवात श्रद्धा आहे . आणि आता, जसा आपला विश्वास अधिक दृढ होतो, तसे आपण अध्यात्मिक मार्गात प्रगतीशील व्हाल .

अादौ श्रद्धा तत: साधु-संग: (चै च मध्य २३।१४-१५)

जर तुमच्याकडे काही श्रद्धा असेल , मग तुम्ही साधूंचा शोध घ्याल, साधु किंवा एखादा संत, एखादा ऋषि जो तुम्हाला काही आध्यात्मिक ज्ञान देऊ शकतो .

याला म्हणतात साधू संग(चै च मध्य २२।८३)

अादौ श्रद्धा . मूल तत्व आहे श्रद्धा, आणि पुढची पायरी म्हणजे साधु-संग . आत्मज्ञान झालेल्या पुरुषाचा संग . त्याला साधू असे म्हणतात ..अादौ श्रद्धा तत: साधु-संग: अथ भजन क्रिया . आणि जर खरा आत्मज्ञान झालेल्या पुरुष असेल , तर तो तुम्हाला काही अध्यात्मिक क्रिया करायला देईल. त्याला भजन-क्रिया म्हणतात. अादौ श्रद्धा तत: साधु-संग: अथ भजन क्रिया तत: अनर्थ निव्रति: स्यात . आणि जसे आपण अधिक आणि अधिक अध्यात्मिक कार्यात गुंतत जाता , तितक्या प्रमाणात आपली भौतिक कार्ये आणि भौतिक कार्यांची आसक्ती कमी होत जाईल . प्रतिक्रिया . जेव्हा आपण अध्यात्मिक कार्यात व्यस्त होता , तेव्हा तुमच्या भौतिक क्रिया कमी होतात . पण हे लक्षात ठेवा. भौतिक उपक्रम आणि अध्यात्मिक उपक्रम यांच्यात फरक असा आहे कि ... समजा की आपण वैद्यकीय मनुष्य म्हणून काम करत आहात . तुम्ही असे समजू नका की "जर मी अध्यात्मिक गोष्टींमध्ये गुंतलो तर मला माझा व्यवसाय सोडून द्यावा लागेल." नाही, नाही. तसे नाही. तुम्हाला तुमच्या व्यवसायाला अध्यात्मिकतेत बदलावे लागेल . अर्जुनाप्रमाणेच , तो लष्करी अधिकारी होता. तो अध्यात्मिक बनला . याचा अर्थ त्याने आपल्या लष्करी कारवायांना आध्यात्मिक रूपात बदलले . तर ह्या पद्धती आहेत.

अादौ श्रद्धा तत: साधु-संग: अथ भजन क्रिया तत: अनर्थ निव्रति: स्यात (चै च मध्य २३।१४-१५)

अनर्थ म्हणजे ते जे माझ्या दुःखाची निर्मिती करते . भौतिक क्रिया माझी दु: खे वाढवत राहतील . आणि जर आपण आध्यात्मिक जीवन स्वीकराले तर आपली भौतिक दुःखे हळूहळू कमी होत जातील . आणि जेव्हा आपण प्रत्यक्षात भौतिक आसक्तीतून मुक्त व्हाल तेव्हा आपले वास्तविक अध्यात्मिक जीवन सुरु होईल . अथासक्ति . आपण आसक्त होता. आपण आता ते सोडू शकत नाही. जेव्हा तुमची अनर्थ निव्रति: , जेव्हा तुमची भौतिक कामं पूर्णपणे थांबतात , मग तुम्ही सोडू शकत नाही . अथासक्ति ।

अादौ श्रद्धा तत: साधु-संग: अथ भजन क्रिया तत: अनर्थ निव्रति: स्यात ततो निश्ठा (चै च मध्य २३।१४-१५)

निष्ठा म्हणजे तुमची श्रद्धा अधिक दृढ, घट्ट आणि स्थिर बनते . ततो निश्ठा ततो रुची: रुची . रुचि रुची म्हणजे तुम्ही फक्त अध्यात्मिक गोष्टींची लालसा बाळगाल . तुम्हाला अध्यात्मिक संदेश सोडून दुसरे काहीही ऐकण्याची इच्छा होणार नाही . तुम्हाला अध्यात्मिक कार्यांशिवाय दुसरे काही करण्याची इच्छा होणार नाही. तुम्हाला असे काही खाणे आवडणार नाही जे अध्यात्मिक नाही. ततो निश्ठा अथासक्ति: मग ओढ , मग भाव. मग तुम्ही दिव्य आनंदात म्हणजे परमानंदा स्वाद घ्याल. काही दिव्य आनंद अनुभव होईल. आणि ते ... अध्यात्मिक जीवनातील सर्वोच्च व्यासपीठासाठी हे वेगवेगळे स्तर आहेत. ततो भाव: । ततो भाव: । भाव: , भाव , ती भाव अवस्था , योग्य मंच आहे जिथून तुम्ही थेट परमात्म्याशी बोलू शकता.