MR/Prabhupada 0197 - तुम्ही भगवद गीता जशी आहे तशी प्रस्तुत केली पाहिजे



Lecture on SB 5.5.30 -- Vrndavana, November 17, 1976


तुम्ही जर तुमचा सर्वोत्तम प्रयत्न केला , कृष्णा तुम्हाला शक्ती देईल. कृष्ण नेहमीच आपली मदत करायला तयार आहे जर आपण त्याची मदत घेऊ इच्छित असाल. तो सज्ज आहे. तो तुम्हाला मदत करण्यास आला आहे . नाहीतर कृष्णाचा इथे येऊन काय फायदा आणि सांगणे ,

सर्व-धर्मान परित्यज्य माम एकम(भ गी १८।६६) ?

ते आमच्या हितासाठी सांगितले आहे. तुम्ही कृष्णाकडे आत्मसमर्पण करा किंवा करू नका. कृष्णाला काही फरक पडत नाही . कृष्ण तुमच्या सेवेवर अवलंबून नाही. तो पूर्णपणे परिपूर्ण आहे. तो एका क्षणात तुमच्यासारखे लाखो सेवक तयार करू शकतो . मग त्याला आपल्या सेवेची आवश्यकता का आहे? त्याने आपल्या सेवेसाठी प्रचार का करावा ? त्याची सेवा तुमच्या अभावामुळे खंडित होत नाही आहे . परंतु, त्याला शरण जाणे तुमच्या हिताचे आहे . त्यातच तुमचे हित आहे. कृष्णाला हे पहायचं आहे, की आपण त्याला शरण जावे आणि परिपूर्ण व्हावे आणि परत घरी जावे , पुन्हा देवत्वाकडे . ते कृष्णाचे उद्दिष्ट आहे. तर या कृष्ण भावनामृत चळवळीचे हेच उद्दिष्ट आहे , प्रचार करणे .

दंते निधाय त्रनकम् पदयोर निपत्य
काकु-शश्टम क्रत्वा चाहम् ब्रवीमि
हे साधव: सकलम एव विहाय दूराद
चैतन्य-चंद्र-चरणे कुरुतानुरागम

हे आमचे ध्येय आहे, चैतन्य महाप्रभूंचे ध्येय . प्रबोधनंद सरस्वती का विनंती करीत आहेत , चैतन्य-चंद्र-चरणे कुरुतानुरागम : "तुम्ही केवळ चैतन्यांच्या चरणकमळांची सेवा करण्यास प्रवृत्त व्हा "? कारण ते वैयक्तिकरूपात कृष्ण आहेत आणि ते आपल्याला शिकवण्यासाठी आले आहेत की आपण कशा प्रकारे कृष्णाच्या जवळ जावे . ते चैतन्य आहेत. कृष्णाय कृष्ण-चैतन्य-नामने गौर-त्विशे नमः श्रील रूप गोस्वामि, ते समजले. सर्वभौम भट्टाचार्य , ते समजले..

वैराग्य विद्या-निज-भक्ति-योगा
शिक्षार्थम एक: पुरुश: पुराण:
श्री-कृष्ण-चैतन्य-शरीर-धारी
कृपामबुधिर यस तम अहम प्रपदये (चै च मध्य ६।२५४)

जर आपण चैतन्य महाप्रभुद्वारे कृष्णाला समजू... चैतन्य महाप्रभु म्हणतात की "तुम्ही गुरु व्हा ." कसे?

यारे देखा तारे कह कृष्ण उपदेश (चै च मध्य ७।१२८)

काही बदल करू नका , परिवर्तन करू नका. फक्त कृष्णाने जे म्हटले आहे त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न करा. हि चैतन्य महाप्रभूंची सूचना आहे. आपण जर या सूचनांचे पालन केले ... आपल्या तथाकथित शिकवलेल्या ज्ञानाचा वापर करून कोणताही बदल किंवा भर करू नका. ते आपल्याला मदत करणार नाही. आपण भगवद् गीता जशी आहे तशी सादर केली पाहिजे. यारे देखा तारे कह कृष्ण उपदेश . तिथे सर्वकाही आहे , अगदी सहजपणे केले जाऊ शकते , जर आपण परंपरा प्रणालीचे पालन केले तर. तर आपली कृष्ण भावनामृत चळवळ अत्यंत नम्रपणे पुढे गेली पाहिजे .

तृणाद अपि सुनिचेन
तरोर अपि सहिश्नुना
अमानिना मानदेन
कीर्तनीय सदा हरि: (चै च अादि १७।३१)

कीर्तनीय . असा प्रचार म्हणजे किर्तन. असे नाही कि आपण फक्त मृदंगाबरोबरच संगीत किर्तन करू शकतो. नाही. प्रचार देखील किर्तन आहे . अभवद वैयासकि-कीर्तने । वैयासकि, व्यासदेवांचा मुलगा ,शुकदेव गोस्वामि, त्यांनी फक्त श्रीमद-भागवतमचे वर्णन केले आणि परिपूर्ण झाले . अभवद वैयासकि-कीर्तने । श्री विष्णु-श्रवणे परिक्षीत . परिक्षीत महाराजांनी फक्त ऐकले; तेही परिपूर्ण झाले आणि शुकदेव गोस्वामींनी फक्त वर्णन केले आहे. ते देखील किर्तन आहे . तर हे देखील किर्तन आहे.


जसे प्रबोधनंद सरस्वती आम्हाला शिकवल्याप्रमाणे, हे साधव: सकलम एव विहाय दूराद चैतन्य-चंद्र-चरणे कुरुतानुरागम: "तुम्ही साधु आहात, सर्वोत्तम व्यक्ती आहात, उद्दात्त , परंतु माझी हि विनंती आहे " ही नम्रता आहे. तुम्ही जर असे म्हणत असाल की, "अरे तू कर्मी आहेस, तुम्ही मूढ आहात ..." खरेतर तो एक मूढ आहे, पण तसे बोलू नका ... सुरुवातीस, जर असे म्हणाल तर मग बोलण्याची संधी उरणार नाही. तो मूढ आहे, तिथे ... रात्रंदिवस डुक्कर आणि कुत्रयांसारखे काम करत आहे, नक्कीच तो मूढ , कर्मी आहे. त्याचप्रमाणे, ज्ञानी , ते फक्त कल्पना करतात. तो तर्क, काका-तलिया न्याय: " "सर्वप्रथम कावळा ताडाच्या फळावर बसला, मग ताडाचे फळ पडले का?" कि ताडाचे फळ खाली पडले; म्हणून कावळा ताडाच्या फळावर बसू शकला नाही? " तर्कशास्त्र. एक पंडित म्हणाला , "नाही, नाही. सर्व प्रथम, ताडाचे फळ खाली पडले आणि कावळा त्यावर बसू इच्छित होता, पण तो ते करू शकला नाही." आता दुसरा पंडित म्हणतो , "नाही, नाही. ताडाचे फळ तिथे होते आणि कावळा त्यावर बसला म्हणून ते खाली पडले." आता हा तर्क आहे. ते तर्क करण्यात आपला वेळ वाया घालवत आहेत.काका-तलिय न्याय । कुप-मंडुक-न्याय ।