MR/Prabhupada 0200 - लहानशी चूक संपूर्ण योजना खराब करू शकते



Lecture on CC Adi-lila 1.11 -- Mayapur, April 4, 1975


तर संपूर्ण वैदिक प्रणाली अशा प्रकारे बनविली आहे की शेवटी आपण जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग या प्रक्रियेतून मुक्त होऊ . बर्याच वर्षांपूर्वी जेव्हा विश्वामित्र मुनी दशरथ राजाकडे , राम-लक्ष्मण यांना मागण्यासाठी आले, त्यांना जंगलात नेण्यासाठी , कारण एक राक्षस त्यांना त्रास देत होता.. ते मारू शकत होते, परंतु वध करणे हे क्षत्रियांचे काम होते . हि वैदिक सभ्यता आहे ते ब्राह्मणांचे काम नाही. तर महाराज दशरथांकडून विश्वामित्र मुनींना पहिले स्वागत असे मिळाले कि , ऐहिस्थम् यत पुनर-जन्म-जयाय : "आपण ... आपण महान ऋषी, संत व्यक्ती आहात , तुम्ही प्रपंच सोडला आहे. आपण जंगलामध्ये एकते राहत आहात. काय उद्देश आहे ? उद्देश आहे पुनर-जन्म-जयाय :, जन्म मृत्यूच्या चक्रावर विजय मिळवणे" तो उद्देश आहे. त्याचप्रमाणे, आपले, हे कृष्ण भावनामृत आंदोलन याच उद्देशासाठी आहे, पुनर-जन्म-जयाय , जन्म मृत्यूच्या चक्रावर विजय मिळवण्यासाठी . आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. लहानशी चूक संपूर्ण योजना खराब करू शकते ,लहान चूक . निसर्ग खूप बलवान आहे.

दैवी हि एश गुणमयी मम माया दुरत्यया (भ गी ७।१४)

खूप, खूप बालवान . तर तुम्ही सर्वजण, मुले आणि मुली, जे अमेरिकेहून आले आहेत, मी तुमचा खूप आभारी आहे . पण कमी गंभीर होऊ नका . खूप गंभीर व्हा. आणि मी विशेषतः अमेरिकन्सना विनंती करेन की, अमेरिकेला जगाला वाचविण्यासाठी चांगली क्षमता मिळाली आहे, तर आपण आपल्या देशात खूप छानपणाने प्रचार केलात तर ... आणि त्या सर्वांनाच आवड नसेल , पण जर त्यातील तुमच्या देशातील काही लोक , तुम्ही त्यांना कृष्ण भावनामृता कडे वळवू शकाल तर , संपूर्ण जगाला त्याचा खूप लाभ होईल. पण उद्दीष्ट तेच आहे पुनर-जन्म-जयाय: या जन्म, मृत्यू आणि वृद्धत्व या प्रक्रियेवर विजय प्राप्त करणे . हे काल्पनिक नाही; हे खरं आहे. पण लोकं गंभीर नाहीत. पण तुम्ही तुमच्या लोकांना शिकवू शकता. अन्यथा, संपूर्ण मानवी समाज धोक्यात आहे . ते पशुवत आहेत ...विशेषत: हि साम्यवादी चळवळी फारच धोकादायक आहे - मोठे पशू बनवण्यासाठी. . ते आधीच प्राणी आहेत, आणि ही चळवळ अजून मोठे प्राणी बनवत आहे . तर मी अमेरिकेला सांगतोय कारण या कम्युनिस्ट चळवळीच्या विरोधात अमेरिका थोडी गंभीर आहे. आणि याचे उत्तर दिले जाऊ शकते कारण प्रक्रिया खूप, खूप दीर्घ काळापासून चालू आहे.


देव असुरा , देवासुर, देव आणि असुर यांच्यातील लढा. तर तसाच लढा आहे पण नाव वेगळे आहे "कम्युनिस्ट आणि भांडवलदार". परंतु भांडवलदार देखील ऐंशी टक्के आहेत, नव्वद टक्के असुर आहेत . होय . कारण त्यांना परमेश्वराचे विज्ञान माहीत नाही. हे आसुरी तत्त्व आहे. त्यामुळे आपल्या देशात त्यांना तयार करण्यासाठी किंवा त्यांची आसुरी तत्त्वे सुधारण्याची चांगली संधी आहे . आणि मग ते इतर असुरांशी लढण्यास सक्षम होतील . कारण जर आपण जेव्हा देव बनतो .. देव म्हणजे वैष्णव बनतो . विष्णु-भक्तो भवेद देव अासुरस तद-विपरयय: जे भगवान विष्णूचे भक्त आहेत, त्यांना देव किंवा देवगण म्हणतात. आणि जे विपरीत आहेत ... उलट संख्या देखील आहे, त्यांचे ही काही देव आहेत . जसे असुर , ते विशेषत: प्रभू शिवाची उपासना करतात. जसे रावण ... आम्ही अनावश्यकपणे आरोप करत नाही आहोत . रावण एक महान राक्षस होता, पण तो भक्त होता ... भगवान शिवाच्या भक्तीचा अर्थ काही भौतिक लाभ प्राप्त करणे . आणि विष्णूच्या भक्तिनेहि भौतिक मिळतो. ते विष्णूद्वारे दिले जाते . ते कर्म नाही. पण वैष्णव, ते कोणत्याही भौतिक लाभाचे महत्वाकांक्षी नाहीत. भौतिक लाभ आपोआप येतात . परंतु, ते त्यांची इच्छा करत नाहीत.

अन्याभिलाशिता -शून्यम (ब्रास 1.1.11)

भौतिक लाभ हे त्यांचे आयुष्याचे ध्येय नाही. त्यांचे जीवनातील ध्येय असते - विष्णू, भगवान विष्णूंना कसे संतुष्ट करावे. ते वैष्णव आहेत . विष्णुर् अस्य देव: न ते..... आणि असुर , त्यांना माहित नाही, की जीवनाची उच्चतम परिपूर्णता वैष्णव बनण्यात आहे . त्यांना हे माहित नाही . असो , आमची अशी विनंती आहे की आपण सर्व तरुण , ज्यांनी हा वैष्णव मार्ग स्वीकारला आहे , आणि आपल्या देशामध्ये या पंथाचा उपदेश देण्याची खूप चांगली संधी आहे, त्यामुळे जरी इतर देशांमधे खूप यशस्वी झाला नाहीत तरी आपण आपण आपल्या देशात खूप यशस्वी व्हाल. तिथे चांगले सामर्थ्य आहे आणि आसुरी तत्त्वांशी लढण्यासाठी आपल्या सामर्थ्याला मजबूत बनविण्याचा प्रयत्न करा. खूप धन्यवाद .