MR/Prabhupada 0206 - वैदिक काळात तिथे पैशाचा प्रश्नच नाही
Morning Walk -- October 16, 1975, Johannesburg
प्रभुपाद: " सर्व धूर्तांना घ्या " , मग त्यांना प्रशिक्षित करा. त्याची गरज आहे . सर्वांना धूर्त समजा . येथे प्रश्न असा नाही की "हा बुद्धिमान माणूस आहे, हा धूर्त आहे , हा ..." नाही. सर्वप्रथम त्यांना धूर्त म्ह्णून घ्या आणि नंतर त्यांना प्रशिक्षित करा. त्याची गरज आहे . त्याची गरज आहे . सध्याच्या क्षणी संपूर्ण जग धूर्तांनी भरले आहे. आता, जर ते कृष्ण भावनामृताकडे येतील , त्यांच्यामधले काही निवडा. ज्याप्रमाणे मी प्रशिक्षण देत आहे. तुम्ही प्रशिक्षणाद्वारे ब्राह्मण आहात. तर जो ब्राह्मण म्हणून प्रशिक्षित होण्यास तयार आहे, त्याला ब्राम्हणामध्ये वर्गीकृत करा. एखाद्याला क्षत्रिय म्हणून प्रशिक्षण दिले जाते, त्याचे वर्गीकरण करा . अशा प्रकारे , चातुर-वर्न्यम मया श्र ...
हरिकेश : आणि ते क्षत्रिय इतरांना शूद्राच्या रुपात घेऊन आणि नंतर त्यांच्यामधून निवड करतील .
प्रभुपादः हम्म ?
हरिकेश : सुरुवातीला ते निवडतील ...
प्रभुपाद: नाही, नाही, नाही. तुम्ही निवडा ... तुम्ही सर्वाना शूद्र म्हणून घ्या . मग ...
हरिश्चंद्रः निवड
प्रभुपाद:निवडा आणि इतर , जे ब्राह्मण किंवा क्षत्रिया किंवा वैश्य नाहीत , मग ते शूद्र आहेत . बस , अतिशय सोपी गोष्ट आहे. जर त्याला अभियंता म्हणून प्रशिक्षित केले जाऊ शकत नाही, तर तो एक सामान्य माणूस राहिल . तिथे सक्ती नाही , हा समाज व्यवस्थित करण्याचा मार्ग आहे. तिथे कुठलीही सक्ती नाही शूद्र देखील आवश्यक आहेत.
पुष्ट कृष्ण : आता आधुनिक समाजात शिक्षित होणे किंवा अभियंता झाल्यानंतर मोबदला आहे पैसा. वेदिक संस्कृतीचा काय लाभ आहे?
प्रभुपाद: पैशांची गरज नाही. ब्राह्मण सर्व काही मोफत शिकवितो . पैशाचा प्रश्नच नाही. कोणीही ब्राह्मण किंवा क्षत्रिय किंवा वैश्य म्हणून शिक्षण घेऊ शकतो . तिथे ... वैश्याना कोणत्याही शिक्षणाची गरज नाही. क्षत्रियांसाठी थोडी आवश्यकता असते. ब्राह्मणांना आवश्यकता आहे पण ते विनामूल्य आहे. केवळ एक ब्राह्मण गुरु शोधा आणि तो तुम्हाला मोफत शिक्षण देईल. बस .हा समाज आहे . आता, जसे ... सध्याच्या क्षणी, जेव्हा एखाद्याला शिक्षण घ्य्याचं असेल तेव्हा त्याला पैशांची गरज असते. परंतु वेदिक समाजात पैशाचा प्रश्नच नाही. शिक्षण विनामूल्य होते .
हरिकेश : मग मोबदला आहे समाजातील आनंद ?
प्रभुपाद: होय, ... प्रत्येकजण त्याच्यामागे उत्सुक आहे. "आनंद कुठे आहे?" हा आनंद असेल . जेव्हा लोक शांतताप्रिय असतील , आपल्या राहणीमानात आनंदी असतील, तेव्हा सुख प्राप्ती होईल . अशी कल्पना करून नाही कि "मी गगनचुंबी इमारतीत राहेन आणि मी आनंदी होईन ," आणि मग उडी मारून आत्महत्या करेन . ते चालू आहे. ते विचार करत आहेत की "जर माझ्याजवळ गगनचुंबी इमारत असेल तर मी आनंदी असेन ," आणि जेव्हा तो निराश असेल तेव्हा तो खाली उडी मारतो. ते चालू आहे इथे आनंद आहे. म्हणजे सर्व धूर्त , त्यांना माहीत नाही आनंद काय आहे . म्हणून प्रत्येकाला कृष्णाकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. ते कृष्ण भावनामृत आहे. आता आपण असे म्हणत होता की इथे आत्महत्याचे प्रमाण उच्च आहे?
पुष्ट कृष्ण : होय.
प्रभुपाद: का? ही सोन्याची खाण असलेला देश आहे, आणि ते का असे करत आहेत ...? आणि आपण असं म्हटलं आहे की इथे गरीब होणं कठीण आहे.
पुष्ट कृष्ण : होय. तुम्हाला इथे गरीब मनुष्य बनण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल .
भुपाद: होय. आणि तरीही आत्महत्या होत आहेत , का? प्रत्येक मनुष्य श्रीमंत आहे आणि तो आत्महत्या का करत आहे ? हम्म? आपण उत्तर देऊ शकता का?
भक्त: त्यांच्यात केंद्रीय सुख नाही?
प्रभुपाद: होय. तिथे आनंद नाही.