MR/Prabhupada 0207 - बेजबाबदारपणे जगू नका
Lecture on SB 6.1.16 -- Denver, June 29, 1975
आपण शुध्दीकरण प्रक्रियेवर चर्चा करीत आहोत. विविध पद्धतींचे वर्णन केले गेले आहे, प्रायश्चित्त आणि तपस्याद्वारे . आपण चर्चा केली. आणि मग केवलया भक्त . भक्ती मध्ये सर्वकाही येते - कर्म, ज्ञान, योग, सर्वकाही. हि विशेषतः सूचविली जाते , तपस्या आणि इतर पद्धतींनी तिथे शक्यता आहे, परंतु कदाचित यशस्वी होऊ शकत नाही. पण जर आपण या प्रक्रियेचा अवलंब केला, भक्तीची सेवा केली, तर हे निश्चितच आहे. तर ही शुद्धिकरण प्रक्रिया म्हणजे निवृत्ती -मार्ग . आणि प्रवृत्ती-मार्गा म्हणजे कुठलेही ज्ञान नसताना आम्ही जात असतो, धावत असतो - आम्ही सर्व काही करीत आहोत, जे काही आपल्याला आवडते ते. याला प्रवृत्ती -मार्ग म्हणतात. सामान्यत: लोक प्रवृत्ती -मार्गामध्ये व्यस्त असतात. विशेषत: या वयात, पुढे काय होणार आहे याची त्यांना काळजी नाही. म्हणूनच त्यांना दिलासा वाटतो की "मृत्यूनंतर जीवन नाही. चला आपण हे जीवनावाचा उत्तम क्षमतेनुसार उपभोग घेऊया. मृत्यूनंतर काय होईल ते नंतर पाहू ." सर्व प्रथम, ते पुढील जीवनावर विश्वास करण्यास नकार देतात. आणि जरी पुढचे आयुष्य आहे, आणि जरी मी मांजर आणि कुत्रा बनलो तरी त्यांची काही हरकत नाही. हा आधुनिक युगाचा अनुभव आहे , बेजबाबदार जीवन . परंतु आमचे कृष्ण भावनामृत आंदोलन लोकांना शिकवत आहे की "बेजबाबदारपणे जगू नका."
उदाहरणार्थ, तुम्ही असे म्हणू शकता, "पुनर्जन्म नाही." पण जर मी युक्तिवाद केला, "समजा तिथे जीवन आहे ..." आता हे सुद्धा अनुमानच आहे, पण कारण कोणीच नाही ... जे अज्ञानात आहेत , त्यांना माहीत नाही कि पुनर्जन्म आहे कि नाही . तर तुम्ही वाद करत आहात, "जीवन नाही", परंतु तुम्हाला जीवन आहे की नाही हे माहिती नाही. ते तुमच्या माहितीत नाही . त्यामुळे समजा आपण दोन्ही मार्ग स्वीकारून दोन्हीचा विचार करू .. तुम्ही त्या मुद्द्यावर विचार करत आहात की तिथे जीवन नाही आहे . आता, तुम्ही माझे विधान का नाही घेत कि "तिथे जीवन आहे ?" कारण आपण खात्री नाही की, जीवन आहे की नाही. आम्ही म्हणतो की जीवन आहे. आम्ही उदाहरण घेऊ: जसे की या बाळाचे पुढचे आयुष्य आहे . बाळ म्हणेल, " पुढील जीवन नाही." पण प्रत्यक्षात हे खरं नाही . सत्य हे आहे कि , जीवन आहे बाळा हे शरीर बदलेल आणि तो एक मुलगा होईल. आणि मुलगा ते शरीर बदलेल; तो तरुण माणूस होईल. ते खरं आहे. पण केवळ हट्टापोटी तुम्ही म्हणत असाल कि पुढे जीवन नाही... ते तुम्ही म्हणू शकता.
परंतु हा युक्तिवाद करा कि : जर जीवन असेल तर, किती बेजबाबदारपणे, आपण आपले भवितव्य इतके अंधारमय करत आहोत ? तेच उदाहरण: जर मूल शाळेत गेले नाही , शिक्षण घेतले नाही, जर त्याने विचार केला तर, "या जीवनापेक्षा दुसरे आयुष्य नाही, मी सर्व दिवस खेळत राहीन. मी का शाळेत जावे ?" तो असे म्हणू शकतो, पण जीवन आहे, आणि जर तो शिक्षण घेत नसेल, तर पुढच्या जन्मात, जेव्हा तो तरुण असेल, तो एखाद्या चांगल्या पदावर नसेल तर तो दुःखी होईल .हे बेजबाबदार जीवन आहे. तर आपण पुढच्या जीवन घेण्यापूर्वी सर्व पापी जीवनापासून मुक्त असणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला चांगले जीवन मिळने शक्य नाही . विशेषत: ईश्वराकडे परत जाण्यासाठी घरी परत जाण्यासाठी एखाद्याला आपल्या पापयुक्त जीवनाचे परिणाम इथेच समाप्त करणे आवश्यक आहे. . भगवद्गीते मध्ये तुम्हाला सापडेल ,
- येशाम त्व अंत-गतम पापम्
- जनानाम् पुणय-कर्मणाम
- ते द्वन्द्व-मोह-निर्मुक्त
- भजन्ते माम दृढ-व्रता: (भगी ७।२८)
कृष्णाचा एक कट्टर भक्त भक्त बनण्यासाठी, कृष्णाचा परीपूर्ण भक्त, त्याचा अर्थ , तो पापी जीवनाच्या सर्व प्रतिक्रियांपासून मुक्त झाला आहे येशाम अंत-गतम पापम् . आणखी आणखी कुठलेही पापयुक्त कर्म न आचरणे . आणि पूर्वीच्या जीवनात त्याने जे काही पाप केले होते, त्याच्यापासून सुद्धा मुक्त होतो. तेसुद्धा नष्ट होतात त्यांचा अजून भोग उरत नाही . येशाम त्व अंत-गतम पापम् जनानाम् पुणय-कर्मणाम . तर लोक एकतर पापी क्रियाकलापांमध्ये किंवा धार्मिक वृत्तीच्या कृतींमध्ये गुंतलेले आहेत. म्हणून ते ज्यांनी अजून आपल्या पूर्व पाप कर्मांची फळे भोगली नाहीत . परंतु सध्याच्या क्षणी ते फक्त धार्मिक वृत्तीच्या कार्यात मग्न आहेत , अशा व्यक्ती, येशाम त्व अंत-गतम पापम् जनानाम् पुणय-कर्मणाम, ते, अशा व्यक्ती , द्वन्द्व-मोह-निर्मुक्त, कोणताही संकोच ना करता , कोणतीही शंका न करता, भजन्ते माम दृढ-व्रता: ते आहे, म्हणून जो कोणी कृष्णाच्या सेवेत निष्ठेने आणि भक्तीने कार्यरत असेल , हे समजू शकतो की तो आता पापी क्रियाकलापांच्या प्रतिक्रियेपासून मुक्त आहे.