MR/Prabhupada 0209 - पुन्हा घरी , ईश्वरधामी कसे जावे
Lecture on SB 6.1.16 -- Denver, June 29, 1975
तर मानवी जीवन हे या शुध्दीकरणासाठी मिळाले आहे. आपण आमची रोजची भाकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करत आहोत. लोकांना फक्त बसून त्यांचे पोट भरत नाही आहेत .ते शक्य नाही. ते फार मेहनत घेत आहेत. डेन्व्हरचं हे शहर खूप छान आहे. हे जंगल किंवा वाळवंटातून आपोआप निर्माण नाही झाले . या शहराला इतके छान, उत्तम स्थितीत उभे राहण्याकरिता कठोर मेहनत लागली आहे तर आम्हाला काम करावे लागते. जर आपल्याला आनंद हवा असेल तर आपल्याला काम करावे लागते. याबद्दल यात काही शंका नाही. परंतु कृष्ण म्हणतो की , यान्ति देव-व्रता देवान (भगी ९।२५) कोणीतरी या भौतिक वातावरणामध्ये आनंदी बनण्यासाठी कार्य करीत आहे, या जगातील अत्यंत मोठा माणूस होऊन किंवा अधिक बुद्धिमान , ते या जीवनात आनंदी नाहीत, पण ते पुढच्या आयुष्यात आनंदी होऊ इच्छितात. काहीवेळा ते उच्च ग्रहाच्या स्तरावर जातात. तर
- यान्ति देव-व्रता देवान पित्रन यान्ति पित्र-व्रता: (भगी ९।२५) .
जर आपण कठोर परिश्रम करत असाल , तर आपल्याला अपेक्षित परिणाम मिळेल . परंतु शेवटच्या ओळीत, कृष्ण म्हणतो,मद-याजिनो अपि यान्ति माम : "जर तू माझ्यासाठी कर्म केलेस किंवा तू माझी पूजा केली तर तू माझ्याकडे येशील ." मग कृष्णाकडे जाणे आणि या भौतिक जगात राहणे यात काय फरक आहे? फरक आहे ,
- अाब्रह्म-भुवनाल लोका: पुनर अावर्तिनो अर्जुन (भगी ८।१६)
या भौतिक जगामध्ये जरी आपण सर्वात उंच ग्रहावर गेला तरी, ब्रह्मालोक, तरीही, जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि आजार तिथे आहेतच .किंवा आपल्याला परत यावे लागेल . ज्याप्रमाणे हे लोक चंद्र ग्रहांकडे जात आहेत आणि पुन्हा इथे परत येत आहेत. तर या प्रकारचे जाणे आणि परत येणे चांगले नाही.
- यद गत्वा न निवर्तन्ते (भगी १५।६)
जर आपण अशा ग्रहावर गेलो जेथून पुन्हा अशा भौतिक जगात परत यावे लागणार नाही तर ही सर्वात उच्च परिपूर्णता आहे. ते म्हणजे कृष्णलोक. तर , कृष्ण म्हणतो , "जर आपण या भौतिक जगात आनंदी होण्यासाठी इतके कठोर परिश्रम करत असाल, तर समान श्रम करून तुम्ही माझी पूजा कराल, तर मग तुम्ही माझ्याकडे याल." मद-याजिनो अपि यान्ति माम . त्यात विशेष लाभ काय आहे?
- माम उपेत्य कौन्तेय दुःखालय अशाश्वतम नाप्नुवन्ति (भगी ८।१५)
"जो माझ्याकडे येतो तो पुन्हा या भौतिक जगात परत जात नाही." तर आमची कृष्ण भावनामृत चळवळ परत घरी , ईश्वरीय धामात , कृष्णाकडे कसे जावे ते लोकांना शिकवत आहे. ते लोकांना शाश्वत काळ आनंदमग्न ठेवेल. तर या जीवनातही, कृष्ण जागरूक लोक, ते दुःखी नाहीत. आपण प्रत्यक्ष पाहू शकता आम्ही एक अतिशय छान कक्षेत बसलो असून हरे कृष्ण जपत प्रसादम घेत आहोत . दु: ख कुठे आहे? तिथे दुःख नाही . आणि इतर प्रक्रियेत ,त्यांना इतक्या अनेक दुःखी प्रक्रियांचा सामना करावा लागतो. येथे, कृष्ण भावनामृतात , काहीच दुःख नाही आहे . तसे भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे:
- सुसुखम कर्तुम अव्ययम (भगी ९।२)
सुसुखम जेव्हा आपण भक्ती सेवेत असतो तेव्हा ते केवळ सुख नसते - सुखम म्हणजे आनंद . - पण आणखी एक शब्द जोडला आहे सुसुखम, "खूप सुखात , अतिशय आनंदी." कर्तुम , भक्तीची सेवा बजावणे,यात खूप आनंद आहे, महान आनंद आहे. आणि अव्ययम. अव्ययम म्हणजे जेकाही तुम्ही कराल ती तुमची शाश्वत संपत्ती राहील इतर गोष्टी, त्या नष्ट होणाऱ्या आहेत. समजा आपण खूप सुशिक्षित व्यक्ती आहात. आपण एम.ए., पीएच.डी. आणि असे , काहीतरी पास केले आहे. पण ते अव्ययम नाही; ते व्ययम आहे. व्ययम म्हणजे ते संपू शकते. जसे आपले शरीर समाप्त होईल तसेच आपले तथाकथित पदव्या सर्व नष्ट होतील . नंतर पुन्हा पुढच्या जीवनात , आपण मानव असाल तर ... पुन्हा नक्कीच एम.ए., पीएचडी होण्याची शक्यता आहे, परंतु या जन्मातली एम.ए., पीएच.डी.पदवी , ती संपुष्टात येईल . म्हणून आपण जे काही इथे मिळवत आहोत, ते अव्ययम नाही. व्यायम म्हणजे खर्च आणि अ म्हणजे "नाही", जे खर्च होत नाही. जर तुमच्याकडे काही पैसे असतील आणि तुम्ही खर्च केला तर ते आहे व्ययम , जे काही काळानंतर संपते . अव्ययम म्हणजे आपण कितीही खर्च केला तरी ते संपत नाही. ते आहे अव्ययम . तर कृष्णाची भक्ती सेवेला म्हटले आहे सुसुखम कर्तुम अव्ययम. तुम्ही जे काही करता, दहा टक्के यश प्राप्त केले असेल तर ते दहा टक्के कायम राहतील. म्हणूनच भगवद् गीतेत नमूद केले आहे,
- शुचीनाम् श्रीमताम् गेहे योग-भ्रष्टो सन्जायते (भगी ६।४१)
जे या जीवनात भक्ती-योग पूर्ण करू शकले नाहीत, त्यांना मनुष्य जीवनाची दुसरी संधी मिळते. केवळ मानवी जीवनच नाही तर असे म्हंटले आहे कि ते स्वर्गीय ग्रहावर जातात, तेथे आनंद घेतात , आणि नंतर पुन्हा या ग्रहामध्ये परत येतात . आणि हे देखील सामान्य माणूस म्हणून नाही . शुचीनाम् श्रीमताम् गेहे: तो शुद्ध आचरण असलेल्या कुटुंबात जन्म घेतो . जसे ब्राह्मण -वैष्णव, शुचीनाम् श्रीमताम् अतिशय शुद्ध आणि श्रीमंत घराण्यात . मग ते त्याचे कर्तव्य आहे. तर जे श्रीमंत जन्माला आले आहेत ... तुम्ही अमेरिकन्स, तुम्ही जन्मता श्रीमंत समजले जाता . प्रत्यक्षात तसे आहे. म्हणून आपण अशा प्रकारे विचार केला पाहीजे , "आमच्या पूर्वीच्या भक्ती सेवेमुळे , कृष्णाच्या कृपेमुळे आम्हाला या देशात जन्म मिळाला आहे . इथे दारिद्र्य नाही. श्रीमताम . म्हणून आपण कृष्ण भावनामृताला खूप गांभीर्याने घेतले पाहिजे. आपल्याला संधी मिळाली आहे. तुम्ही गरिबीपासून मुक्त आहात. तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवावा लागत नाही, "अन्न कुठे आहे? अन्न कुठे आहे? अन्न कुठे मिळेल ?" जसे इतरा दारिद्र्यग्रस्त देशात ते अन्नासाठी चिंतीत आहेत . परंतु आपण खूप भाग्यवान आहात, म्हणून वाया जाऊन ही संधी गमावू नका. वाया घालवू नका. भक्त व्हा, कृष्णाचे भक्त बना . कृष्ण भावनामृत चळवळ आहे, आणि आपली अनेक केंद्रे आहेत. फक्त या कृष्ण चेतनेचे विज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपले आयुष्य परिपूर्ण करा .
ही आमची विनंती आहे.
खूप धन्यवाद .