MR/Prabhupada 0210 - संपूर्ण भक्ती-मार्ग ईश्वर कृपेवर अवलंबून आहे



Lecture on SB 1.15.30 -- Los Angeles, December 8, 1973


म्हणून जर आपण भगवद्गीता समजून घ्यायची असेल, तर ज्या व्यक्तीने प्रत्यक्षरित्या ऐकली त्याप्रमाणेच आपण ती समजून घेतली पाहिजे. याला परंपरा प्रणाली म्हणतात. समजा मी माझ्या आध्यात्मिक गुरुकडून काहीतरी ऐकलं आहे, तर मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगतो. तर हि परंपरा प्रणाली आहे. माझ्या अध्यात्मिक गुरुने जे सांगितले आहे त्याची आपण कल्पना करू शकत नाही. किंवा आपण काही पुस्तके वाचली तरीही, आपण समजू शकत नाही जोपर्यंत आपण ते माझ्याकडून समजून घेत नाही याला परंपरा प्रणाली म्हणतात. आपण सरळ वरिष्ठ गुरूकडे जाऊ शकत नाही, माझे म्हणणे आहे सध्याच्या आचार्यांना सोडून आधीचे गुरु. जसे आपले , हे गौ ..., चैतन्य महाप्रभूंचा पंथ; आपण चैतन्य महाप्रभूंना थेट समजू शकत नाही. ते शक्य नाही. आपल्याला गोस्वामींद्वारे समजून घ्यावे लागेल . म्हणूनच तुम्हाला चैतन्य-चरितामृतात आणि आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आढळेल , लेखक म्हणतो, रूप-रघुनाथे-पदे ... ते काय आहे? कृष्णदास .

रूप-रघुनाथे-पदे सदा यार अाशा
चैतन्य-चिरतामृत कहे कृष्ण-दास.

ही प्रक्रिया आहे. ते असे म्हणत नाहीत की "मला भगवान चैतन्य महाप्रभू प्रत्यक्षपणे समजले आहे." नाही .ती समज नाही .तो मूर्खपणा आहे चैतन्य महाप्रभु म्हणजे काय ते आपण समजू शकत नाही. म्हणूनच ते वारंवार म्हणतात, रूप-रघुनाथ-पदे सदा यार अाशा चैतन्य-चिरतामृत कहे कृष्ण-दास. "मी तो कृष्णदास आहे , कवीराज, जो नेहमी गोस्वामींच्या अधीन असतो ." हि परंपरा प्रणाली आहे. त्याचप्रमाणे नरोत्तम दास ठाकूर देखील म्हणतात, एइ छाय गोसाई जार तार मुइ दास, , "मी त्या व्यक्तीचा सेवक आहे ज्याने हे सहा गोस्वामी आपले गुरु म्हणून स्वीकारले आहेत . मी कोणत्याही अन्य व्यक्तीचा सेवक होऊ शकणार नाही ज्याने हा मार्ग स्वीकारला नाही. आणि इतर साधने ... "म्हणून आम्ही म्हणतो किंवा आपण आपल्या अध्यात्मिक गुरुला प्रार्थना अर्पण करतो,

रूपानुग-वराय ते, रुपानुग-वरायते

कारण तो रुप गोस्वामिंचे अनुसरण करतो , म्हणून आपण अध्यात्मिक गुरु स्वीकारतो . असे नाही की एखादा रुप गोस्वामी किंवा त्याहूनही अधिक झाले आहेत ... नाही .

तांदेर चरण-सेबि-भक्त-सने-वास.

हि परंपरा प्रणाली आहे. आता इथेही पुन्हा अशीच पुनरावृत्ती झाली आहे - अर्जुनाने, ज्याने थेट कृष्णाकडून ऐकले आहे काहीवेळा, काही लोक म्हणतात- हे चुकीचे आहे- "अर्जुनाने कृष्णाकडून थेट ऐकले आहे, परंतु कृष्ण आमच्या सोबत नाही , तर मी ते कसे स्वीकारावे?" इथे थेट उपस्थितीचा प्रश्न नाही आहे , कारण तुम्हाला परम ज्ञानाविषयी कल्पना नाही आहे . कृष्णाचे शब्द, भगवद्गीता, कृष्णापासून भिन्न नाही. ती कृष्णापेक्षा वेगळी नाही. जेव्हा आपण भगवद् गीता ऐकता, तेव्हा आपण थेट कृष्णाकडून ऐकत आहात कारण कृष्ण भिन्न नाही. कृष्ण शाश्वत परिपूर्ण आहे . कृष्ण , कृष्णाचे नाव , कृष्णाचे स्वरूप , कृष्णाचे गुण , कृष्णाचा उपदेश , कृष्णाच्या सर्व गोष्टी , ते सर्व कृष्णच आहे . ते सर्वच कृष्ण आहेत . हे समजणे आवश्यक आहे. ते कृष्णापेक्षा वेगळे नाहीत . म्हणून इथे कृष्णाचे स्वरूप आहे , तो कृष्ण आहे. तो केवळ मूर्ती नाही नाही "तो एक संगमरवरी पुतळा आहे?" नाही. तो कृष्णच आहे . तो तुमच्या समोर आला आहे कारण आपण कृष्णाला पाहू शकत नाही. तुम्ही दगड, लाकूड पाहू शकता; म्हणून तो त्या स्वरूपात आला आहे . तुम्हाला वाटते की तो दगड आणि लाकूड आहे. पण तो दगड आणि लाकूड नाही. तो कृष्ण आहे . याला परम सत्य म्हणतात. त्याचप्रमाणे, कृष्णाचे शब्दही कृष्णापेक्षा वेगळे नाहीत. जेव्हा कृष्णाचे शब्द भगवद्गीतेत आहेत, ते कृष्णच आहेत .

त्या दक्षिण भारतीय ब्राह्मणाप्रमाणे जसे तो उघडतो ... तो अशिक्षित असतो , तो भगवद्गीता वाचू शकत नाही. परंतु त्यांचे गुरु महाराज त्याला सांगतात की, तू दररोज भगवद्गीतेच्या अठरा अध्यायांचे वाचन कर." तर तो गोंधळात पडला की, "मी अशिक्षित आहे, मला शक्य नाही ... ठीक आहे, मी घेऊन बघतो ..., भगवद्गीता." तर तो रंगनाथ मंदिरात असतो . त्याने भावद्गीता घेतली आणि पाने अशी पालटू लागला . त्याला वाचता येत नव्हते . तर त्याचे मित्र जे त्याला ओळखत होते , ते मस्करी करू लागले ," अच्छा , ब्राह्मणा , तू भगवदगीता कशी वाचत आहेस ?" त्याने उत्तर दिले नाही कारण त्याला माहीत होते त्याचे मित्र मस्करी करत आहेत कारण " मला वाचता येत नाही , मी अशिक्षित आहे ." पण जेव्हा चैतन्य महाप्रभु आले ते सुद्धा आश्चर्यचकित झाले , " ब्राह्मणा , तू भगवद्गीता वाचत आहेस ?" तो म्हणाला "प्रभू मी अशिक्षित आहे , मी वाचू शकत नाही . ते शक्य नाही " पण माझ्या गुरु महाराजांनी मला वाचायची आज्ञा केली आहे . मी काय करू शकतो? मी हे पुस्तक घेतले आहे " हा गुरूंचा कट्टर आज्ञाधारक शिष्य आहे . तो अशिक्षित आहे . तो वाचू शकत नाही . तिथे शक्यता नाही. पण त्याच्या गुरु महाराजांनी आज्ञा केली आहे , " तू नेहमी भगवद्गीतेचे अठरा अध्याय वाचलेच पाहिजेत ." तर हे काय आहे . याला म्हणतात व्याव्सायित्मिका बुद्धी: मी कदाचित अपूर्ण असू शकते. काही फरक पडत नाही. परंतु जर मी माझ्या गुरु महाराजांच्या शब्दांचे पालन करण्याचा प्रयत्न केला, तर मी पूर्ण होतो . हे रहस्य आहे.

यस्य देवे परा भक्तिर यथा देवे तथा गुरौ ( श्वे उ ६।२३)

एखाद्याला सर्वोच्च परमेश्वरावर अतूट विश्वास असेल आणि तितकाच विश्वास त्याच्या गुरूवर असेल , यथा देवे तथा गुरौ , मग शास्त्रवचन प्रकट होऊन स्पष्ट होतात . हे शिक्षण नाही. ही शिष्यवृत्ती नाही. हे कृष्ण आणि गुरुंवरचा विश्वास आहे. म्हणूनच चैतन्य-चरितामृत म्हणते की

गुरु कृष्ण-कृपाय पाए भक्ति-लता-बीज (चै च मध्य 19.151)

शिक्षणाद्वारे नाही, शिष्यवृत्तीद्वारे नव्हे, कधीही नाही. चैतन्य महाप्रभु म्हणतात, गुरु कृष्ण-कृपाय गुरूंच्या कृपेने, कृष्णाच्या कृपेने . हा कृपेचा प्रश्न आहे . हा शिष्यवृत्ती किंवा समृद्धता किंवा श्रीमंतीचा प्रश्न नाही . नाही. संपूर्ण भक्ती -मार्ग ईश्वर कृपेवर अवलंबून आहे . म्हणून आपल्याला कृपा मिळवण्याची गरज आहे.

अथापि ते देव पदांबुज-द्वया-प्रसाद-लेशानुग्रहीत एव हि, जानाति तत्वम (श्री भ 10.14.29)

प्रसाद-लेशा, लेष म्हणजे अंश . ज्याला परमेश्वराच्या दयाळूपणाचा थोडा जरी अंश मिळाला आहे तो समजू शकतो. इतर, न चान्य एको अपि चिरम विचिन्वन . इतर, ते लाखो वर्ष अनुमान काढू शकतात. पण त्यांना समजणे शक्य नाही. म्हणून भगवत-गीता जशी आहे तशी आपण सादर करत आहोत . कारण जशी ती अर्जुनाला समजली त्याचा भावात आपण प्रस्तुत करत आहोत . आम्ही डॉ. राधाकृष्णन , हा विद्वान , तो विद्वान, हा मूर्ख , तो मूर्ख यांच्याकडे जात नाही . नाही , आम्ही जात नाही . ते आमचे काम नाही. हि परंपरा आहे .