MR/Prabhupada 0213 - मृत्यूला थांबवा - मग मी तुमच्या गूढवादाला मानेन



Morning Walk -- June 17, 1976, Toronto


भक्त जीन: हे प्रभू ,यामुळे माझ्या मनात एक प्रश्न उद्भवत आहे . ख्रिश्चन धर्मात 100 च्या दशकापासून आतापर्यंत गूढवादाचा इतिहास आहे. आता काही प्रमुख गूढवादी, काही प्रमुख गूढवादी आहेत आणि काही महान प्रमुख असे नाहीत. आता आपण या लोकांना कसे वर्गीकृत कराल , हे ख्रिश्चन बुद्धीवादी, प्रोटेस्टंट तसेच कॅथोलिक?

प्रभुपाद: ते योगिक गूढवाद आहे. आध्यात्मिक जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यांना काही चमत्कार, सामान्यता, साधारण लोकांना ते पहायचे असते . तर या गूढ शक्ती, काही चमत्कार दाखवताट आणि त्यांना आश्चर्यचकित करतात .बस. आध्यात्मिक जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही.

भक्त जीन: कदाचित तुम्हाला माझा प्रश्न समजला नाही . मी खरोखर भक्तीवादी रहस्यमय गोष्टींचा उल्लेख करीत होते, जसे की सेंट जॉन ऑफ क्रॉस, असिसीचे सेंट फ्रान्सिस.

प्रभुपाद: जर तिथे भक्ती सेवा असेल, तर गूढवादांची गरज कुठे आहे? काही गरज नाही . भगवंत माझा स्वामी आहे , मी त्याचा सेवक आहे . मग मूर्ख गूढवादाची गरज काय आहे ?

भक्त जीन : मला वाटते गूढवाद नामक शब्द , इथे अनेक लोक त्याच्यासोबत खेळात आहेत , विशेषतः अमेरिकेमध्ये .

प्रभुपाद: अनेक लोक , आपल्याला या अनेक लोकांशी काही देणे घेणे नाही . जर तुम्ही खरंच देवाचे सेवक आहात , देव तिथे आहे आणि तुम्ही दास आहात . तर तुमचे काम तिथे आहे . केवळ परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करणे . बस . तुम्हाला गुढवादाची आवश्यकता का आहे? फक्त लोकां काही जादू दाखवण्यासाठी ? तुम्ही देवाची सेवा करा . त्यात सर्व आहे . आणि हे अगदी सोपे आहे, देव काय आज्ञा करत आहे .

मन मना भव मद-भक्तो मद-याजी माम नमस्कुरु (भ गी १८।६५)

गूढवादाचा प्रश्न कुठे आहे? तिथे गूढवादाचा प्रश्नच नाही. देव म्हणतो, "नेहमीच माझ्याबद्दल विचार करा, तुमची श्रद्धा ठेवा आणि माझी उपासना करा." बस . गूढवादाची गरज कुठे आहे? ते सर्व जुगारी आहे .

भारतीय माणूस: मी तुम्हाला सांगतो, तिथे एक संकल्पना आहे असे मला वाटते ....

प्रभुपाद: तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे विचार करा .

भारतीय माणूस: नाही, सर तिथे एक चुकीची संकल्पना आहे ...

प्रभुपाद: आपल्या विचारांमध्ये काही अर्थ नाही जोपर्यंत आपण सामान स्तरावर येत नाही .

भारतीय माणूस: नाही सर , तिथे चुकीची कल्पना आहे, की ते म्हणतात की गूढवाद आध्यात्मिक प्रगतीसह येतो . मला वाटतं की ते याबद्दल विचारत आहेत .

प्रभुपाद: समस्या ही आहे की आपण भौतिक जगात जन्मोजन्मी पासून पीडित आहोत, आणि आमचे ध्येय हे आहे की पुन्हा एकदा स्वस्वरूपाककडे , ईश्वर धामी कसे परत जावे. त्यांना हे माहिती नाही. ते काहीतरी गूढवाद दाखवत आहेत. ते काय ... मृत्यू थांबवा मग मी तुमची गूढवादी पाहतो . काय मूर्खपणाचा गूढवाद मांडला आहे? आपण मृत्यू थांबवू शकता का ? हे शक्य आहे का? मग गूढवादाचा अर्थ काय आहे? सर्व दिखावटी आहे . माझी समस्या अशी आहे की मी हे शरीर आणि दुःख स्वीकारत आहे, कारण जसे हे भौतिक शरीर मला मिळाले , मला दुःख सहन करावे लागेल . मग मी आणखी एक शरीर तयार करतो. मी मरण पावतो .

तथा देहान्तर-प्राप्ति: (भ गी २।१३)

आणि पुन्हा पुन्हा एक नवा अध्याय सुरू होतो. अशाप्रकारे, या गवतापासून ते यक्ष गंधर्वांपर्यन्त मी केवळ शरीर बदलत राहतो आणि मरण पावून पुन्हा जन्म घेतो . ही माझी समस्या आहे तर मग गूढवादी यात काय करेल? पण त्यांना माहिती नाही, समस्या काय आहे. हे भगवद् गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.

जन्म-मृत्यु-जरा-व्याधि-दुःख-दोषानुदर्शनम (भ गी १३।९)

ही तुमची समस्या आहे तुम्ही वारंवार जन्म घेत आहात आणि मरण पावत आहात, आणि तुम्ही जितके दिवस तिथे जगता त्यात इतके त्रास आहेत . जरा-व्याधि विशेषतः वृद्धत्व आणि रोग . तर ही समस्या आहे. गूढवाद तुम्हाला काय मदत करेल? गूढवाद तुमचा जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग थांबवू शकेल का? मग तो गूढवाद आहे अन्यथा, अशा मूर्ख गोष्टींचा काय उपयोग आहे? (विराम ) ... वास्तविक मार्गावरून दिशाभूल करणारे . त्यांना जीवनाचे लक्ष्य काय आहे , आयुष्यातील समस्या काय आहे हे माहित नाही आहे . ते काही गूढवाद निर्माण करतात आणि त्यांच्या नंतर काही मूर्ख लोक त्याच्यामागे असतात. बस . "हे गूढ आहे."

भारतीय: भक्तांचा संग किती महत्त्वाचा आहे?

प्रभुपाद: होय.

सताम प्रसंगान मम वीर्य सम्विदो भवन्ति ह्रत-कर्ण-रसायना: कथा: (श्री भ ३।२५।२५)

म्हणून साधू संगाची गरज आहे . भक्तांचा संग . त्याची गरज आहे . मग आपले जीवन यशस्वी होईल . गूढवादाने नाही .