MR/Prabhupada 0214 - आपण भक्त आहोत तोपर्यंत हि चळवळ जलद गतीने पुढे जात राहील
Room Conversation 1 -- July 6, 1976, Washington, D.C.
प्रभुपाद: भारतामध्ये आम्हाला इतक्या जमिनी दिलया गेल्या आहेत . पण आमच्याकडे त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी माणसं नाहीत .
स्वरुप दामोदर: मला सुद्धा मणिपूरहून एक पत्र मिळाले. आजीवन सभासद , कुलविद सिंग, चिंतेत होते की तरुण लोक आता धार्मिक विचार सोडून देत आहेत, म्हणून त्यांना शाळा प्रकारचे शिक्षण स्थपन करायचे होते .
प्रभुपाद: त्या (अस्पष्ट) आपत्ती विवेकानंद यांनी व्यक्त केली होती , यतो मत ततो पथ (अस्पष्ट) .
स्वरूप दामोदरा: म्हणून जसे ... त्यांना इस्कॉन शाखेची सुरुवात करायची होती, आणि तो ...
प्रभुपाद: मला वाटतं ते कठीण होणार नाही. मणिपूर ...
स्वरूप दामोदर: हे खूप सोपे होईल कारण ...
प्रभुपाद: ... वैष्णव .. जर ते समजले तर ते खूप छान होईल.
स्वरूप दामोदारा: सर्व, अगदी सरकार सहभाग करत आहे. तर त्यांनी मला एक पत्र लिहिले होते की ते आम्हाला छान जमीन, प्लॉट आणि देऊ शकतात आणि ...
प्रभुपद : ओहो होय. ते गोविंदजीचे मंदिर?
स्वरूप दामोदार: गोविंदजीचे मंदिर सरकारच्या ताब्यात आहे, म्हणून मी त्यांच्याशी बोललो, मी एक पत्र लिहिले ...
प्रभुपाद: सरकार, ते व्यवस्थापन करू शकत नाहीत.
स्वरूप दामोदर: ते योग्यप्रकारे व्यवस्थापन नाही करत आहेत .
प्रभुपाद: ते नाही करू शकत . जेव्हा काहीही राज्याकडे जाते , विशेषत: भारतात, सरकारकडे जाते तेव्हा त्याची दुर्दशा होते . सरकार म्हणजे सर्व चोर आणि निष्काळजी . ते कसे सांभाळू शकतील . ते फक्त त्याने जे मिळेल ते हडप करतील . सरकार म्हणजे ...ते व्यवस्थापन नाही करू शकत नाहीत . ते भक्त नाहीत . हे भक्तांच्या हातात असले पाहिजे . तर (अस्पष्ट), विकलेला मनुष्य , त्यांना फक्त काही पैसे हवे आहेत . ते मंदिर कसे हाताळू शकतात? ते अशक्य आहे.
स्वरूप दामोदर : ही एक राजकीय समस्या बनली आहे.
प्रभुपाद: एवढच .एह? स्वरुप दामोदर: हे राजकारणात गुंतले आहे. म्हणूनच ... उपासनेशी काहीही संबंध नाही.
प्रभुपाद: असो , म्हणूनच शासनाने भक्तांच्या हाती द्यावे. आम्ही भक्त म्हणून ओळखले जातो इस्कॉन . जर त्यांना खरोखर व्यवस्थापन हवी असेल तर . भक्तांच्या योगदानामुळे आम्ही इतकी केंद्रे चालवत आहोत. या सर्व गोष्टी व्यवस्थापित करणे एका विकलेल्या मनुष्याला शक्य होणार नाही. हे शक्य नाही.
भक्त: नाही
प्रभुपाद: ते कधीच ... ते करणार नाहीत ... हे आंदोलन जलद गतीने पुढे जात आहे जोपर्यंत आपण भक्त आहोत , अन्यथा ते संपुष्टात आले असते . हे कोणत्याही बाहेरील लोकांद्वारे सांभाळले जाऊ शकत नाही. केवळ भक्त ते रहस्य आहे .
भक्त: आपण भक्ताला पैसे देऊ शकत नाही.
प्रभुपाद: एह? भक्त: आपण भक्ताला विकत घेऊ शकत नाही.
प्रभुपाद: ते शक्य नाही.
भक्त: आपण फरशी पुसण्यासाठी कोणीतरी विकत घेऊ शकता, परंतु आपण प्रचारक विकत घेऊ शकत नाही.
प्रभुपाद: नाही, ते शक्य नाही. ते शक्य नाही. जोपर्यंत आपण भक्त आहोत आपली चळवळ पुढे जात राहील कोणत्याही तपासणीशिवाय .
भक्त: भक्तांनी जगावर ताबा घ्यावा.
प्रभुपाद: होय, हे आहे ... हे जगासाठी चांगले आहे .
भक्त: होय.
प्रभुपाद : जर भक्तांनी संपूर्ण जग व्यवस्थापनासाठी घेतले तर प्रत्येकजण आनंदी होईल. यात काही शंका नाही कृष्णाची तो इच्छा आहे . त्याची इच्छा होती कि पांडव शासनाचे प्रभारी असावेत . त्यामुळे त्याने लढाईत भाग घेतला. "होय, आपण असावे ... सर्व कौरवांचा वध झाला पाहिजे ,आणि महाराज युधिष्ठिर स्थापित झाले पाहिजेत त्याने ते केले . धर्म-संस्थापनार्थाय .
- परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम (भ गी ४।८) .
त्याची इच्छा आहे सर्वकाही सुलभतेने व्हावे आणि लोक देवाविषयी जागरूक बनावेत. म्हणजे त्यांचे जीवन यशस्वी होईल. तीच कृष्णाची योजना आहे . कि , "हे दुष्ट दिशाभूल करणारे आणि त्यांच्या ... त्यांना मानवी जीवन मिळाले आणि त्याची दुर्दशा झाली ." म्हणून मी बोलत होतो "स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे? कुत्र्यांचे नृत्य ". जीवनाचे नुकसान झाले . आणि ते त्यांचे जीवन नाश करतील आणि पुढील जीवनात कुत्रा बनून आणि या मोठ्या , मोठ्या इमारतींकडे पाहत राहतील . पुढच्या आयुष्यात कुत्रे होणार आहेत अशा लोकांसाठी मोठ्या इमारती काय करणार आहेत ? एक सिद्धांत म्हणून, ज्यांनी या मोठ्या, मोठ्या इमारती उभारल्या आणि पुढील जीवनातं ते एक कुत्रा होणार आहेत.
स्वरुप दामोदर : पण त्यांना माहीत नाही की पुढील जीवनात ते कुत्रा होणार आहेत .
प्रभुपाद: तीच अडचण आहे. त्यांना ते माहित नाही . म्हणून माया