MR/Prabhupada 0216 - कृष्ण प्रथम श्रेणीत आहे आणि त्याचे भक्तसुद्धा प्रथम श्रेणीत मोडतात
Lecture on SB 1.7.47-48 -- Vrndavana, October 6, 1976
हा वैष्णवांचा दृष्टीकोन आहे . परा-दुख-दुखी . वैष्णव परा-दुख-दुखी असतो . हि वैष्णवांची योग्यता आहे . तो स्वताच्या असुविधेविषयी विचार करत नाही . पण हा , वैष्णव इतरांचे दुख पाहून चिंतीत , दुखी होतो . तो वैष्णव आहे . प्रह्लाद महाराज म्हणाले ,
- नैवोद्विजे पर दुरत्यय-वैतरन्यास
- त्वद-वीर्य-गायन-महामृत-मग्न-चित्त:
- शोचे ततो विमुख-चेतसा इन्द्रियार्थ-
- माया-सुखाय भरम उद्वहतो विमूढान (श्री भ ७।९।४३)
प्रह्लाद महाराज त्यांच्या वादिलांद्वारे इतके छळले गेले , आणि त्यांच्या वडिलांचा वध झाला . आणि तरीही , जेव्हा त्यांना देवद्वारे वरदान मिळाले , नृसिंह देवद्वारे , त्यांनी ते स्वीकारले नाही . ते म्हणाले , स वै वणिक . माझ्या प्रभू , आम्ही रजो गुण , तमो गुण असलेल्या कुटुंबात जन्म घेतला आहे . रजो गुण , तमो गुण . असुर , ते खालच्या दोन गुणांद्वारे प्रभावित असतात , रजो गुण आणि तमो गुण . आणि जे देव आहेत , ते सत्त्व गुणाद्वारे प्रभावित असतात . भौतिक जगात तीन गुण अस्तित्वात आहेत सत्व-गुण ...
त्रि-गुणमयी दैवी हि एश गुणमयी (भ गी ७।१४)
गुणमयी, त्रैगुणमयी । या भौतिक जगात सत्व-गुण, रजो-गुण, तोमो-गुण जे सत्वागुनाच्या प्रभावाखाली आहेत ते प्रथम श्रेणीत येतात प्रथम श्रेणी म्हणजे या भौतिक जगातील प्रथम श्रेणी अध्यात्मिक जगातील नाही . अध्यात्मिक जग वेगळे आहे ते निर्गुण आहे . भौतिक गुण तिथे नाहीत . तिथे प्रथमी श्रेणी , द्वितीय श्रेणी , तृतीय श्रेणी नाही . प्रत्येक जण प्रथम श्रेणीत आहे . ते शाश्वत आहे . कृष्ण हा प्रथम श्रेणीतला आहे आणि त्याचे भक्त सुद्धा झाड प्रथम श्रेणीत आहे, पक्षी प्रथम श्रेणीत आहेत , गायी प्रथम श्रेणीतले आहेत , वासरू प्रथम श्रेणीत आहेत . म्हणून त्याला शास्वत असे म्हणतात. सापेक्ष ची संकल्पना नाही , द्वितीय वर्ग , तृतीय वर्ग , चतुर्थ वर्ग . नाही . सर्वकाही प्रथम वर्ग .
आनंद-चिन्मय-रस-प्रतिभाविताभि : ( ब्र स ५।३७)
प्रत्येक गोष्ट आनंद-चिन्मय-रस आहे . तिथे वर्गीकरण नाही . एखादा दास्य रसात असतो किंवा साख्य रसात असतो . किंवा वात्सल्य रस किंवा माधुर्य रस , ते सर्व एकच आहे . तिथे असा फरक नाही . पण तिथे विविधता आहे . तुला हा रस आवडतो , मला तो रस आवडतो , ते मान्य आहे . तर इथे भौतिक जगात , ते अशा रासाद्वारे प्रभावित आहेत . आणि प्रह्लाद म,हाराज , हिरण्यकशिपू चा पुत्र असला कारणाने ते स्वताला समजतात कि " मी रजो गुनाद्वारे आणि तमो गुणाद्वारे प्रभावित आहे ." ते वैष्णव आहेत . ते सर्व गुणांच्या पलीकडे आहेत , पण वैष्णव कधीही त्याच्या गुणांवर अभिमान करत नाही . वास्तवात , त्याला असे वाटत नाही , कि तो प्रगत आहे , तो आत्मज्ञानी आहे . त्याला नेहमी वाटते " मी सर्वात खाली आहे "
- तृनाद अपि सुनिचेन
- तरोर अपि सहिश्नुना
- अमानिना मानदेन
- कीर्तनीय सदा हरि: (चै च अदि १७।३१)
हा वैष्णव आहे.