MR/Prabhupada 0215 - तुम्हाला वाचावे लागेल , मग तुम्हाला कळू शकेल
Interview with Newsweek -- July 14, 1976, New York
मुलाखतकार: तुम्ही मला तुमच्या पार्श्वभूमीबद्दल थोडीशी सांगू शकाल, जेव्हा तुम्ही लहान होता , तुम्ही कोणत्या प्रकारच्या गोष्टी केल्या आणि काय ...
प्रभुपाद: मी तुम्हाला का सांगावे ?
मुलाखतकार: मला क्षमा करा ?
प्रभुपाद: मी तुम्हाला का सांगावे ?
मुलाखतकार: तुमची इच्छा असल्यास.
प्रभुपाद: माझी इच्छा का होईल ?
मुलाखतकार: पहा , पत्रकारांना अशी प्रश्ने विचारावी लागतात. अन्यथा माझा व्यवसाय बंद होईल .
हरि-शौरी: प्रभुपाद अशी आशा करीत आहे की आपण त्यांना काही संबंधित प्रश्न विचारावेत .
रामेश्वर: श्रीला प्रभुपाद , लोक तुमच्याबद्दल जाणून घेऊ इच्छितात . आणि जर ते आपल्यामध्ये स्वारस्य घेतील , तर त्यांना आपोआपच आपल्या पुस्तके मध्ये स्वारस्य येईल . ते आम्ही विकतो त्या सर्व पुस्तकांच्या लेखकांविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
प्रभुपाद: पण ही पुस्तके, पुस्तके ... आपण पुस्तकांबद्दल बोलूया . लेखक आधी काय करत होता यावर ते अवलंबून आहे का ?
मुलाखतकार: मी जे काही समजलो आहे त्यातून आपण बर्याच पुस्तकांचे भाषांतरकार आहात.
प्रभुपाद: होय. त्यामुळे ते भाषांतर, पुस्तक, मी अनुवादित कसे केले आहे ते बोलणार आहे.
मुलाखतकार: हम्म मी विचार करत होतो ...
प्रभुपाद: तुम्ही पुस्तके वाचलीत तर तुम्हाला समजेल मला विचारण्याऐवजी, तुम्ही पुस्तके वाचलीत तरी बरे होईल . ती खरी समज असेल .
मुलाखतकार : मी उत्सुक होतो जाणून घेण्यास की त्यांना वैयक्तिकरित्या यात स्वारस्य कसे आले किंवा ते कसे सहभागी झाले , आणि त्याच्या चेतन साधनेचा मार्ग काय होता?
रामेश्वर : अच्छा . त्या आपले आपल्या गुरु महाराजांशी असणाऱ्या संबंधांबद्दल विचारत आहे, आपल्याला कृष्ण भावनामृत चळवळ सुरू करण्यासाठी आणि कित्येक पुस्तकं लिहिण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली ?
प्रभुपाद: या गोष्टींचे उत्तर तुम्ही देऊ शकता. लोकांसाठी हे फार महत्त्वाचे नाही.
रामेश्वर : मला वाटतं की लोक नेहमी चळवळीच्या मागे असलेल्या व्यक्तीबद्दल माहिती घेण्यास उत्सुक असतात.
महिला अतिथी : हो, त्याची मदत होते . लोकांना यात रूची आहे. लोक आपल्यासारख्या मनुष्याच्या विकासात इच्छुक आहेत कारण ते त्याचाशी स्वतःला जोडू शकतात आणि अशाप्रकारे ते आपण काय लिहिता त्याचे वाचन करण्याचा निर्णय घेतात.
प्रभुपाद: पहिली गोष्ट अशी की जर आपल्याला आमच्या पुस्तकात रस असेल तर आपण आमची पुस्तके वाचली पाहिजेत . मग आपण समजू शकाल
मुलाखतकार: तुम्हाला समजू शकू ?
प्रभुपाद: होय.
मुलाखतकार: तुम्ही असे म्हणत आहात का ?
प्रभुपाद: होय
मुलाखतकार : ते तेच म्हणत आहेत का ?
प्रभुपाद: जेव्हा माणूस बोलतो तेव्हा त्याची ओळख होते . तो बोलतो तेव्हा .
- तावच च शोभते मूर्खो यावत किन्चिन न भाशते :
"मूर्ख जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तो सुंदर आहे ." जेव्हा तो बोलतो , तेव्हा तो काय आहे हे तुम्ही समजू शकता. तर माझी भाषणे पुस्तकात आहेत आणि जर तुम्ही बुद्धिमान असाल तर तुम्ही समजू शकाल . तुम्हला विचारण्याची गरज लागणार नाही . बोलणे ... जसे कोर्टात . मोठा वकील तेव्हा ओळखला जातो जेव्हा तो बोलतो . अन्यथा प्रत्येकजण चांगला वकील आहे . परंतु जेव्हा तो न्यायालयात बोलतो , तेव्हा कळते की तो चांगला वकील आहे किंवा नाही. त्यामुळे तुम्हाला ऐकावे लागेल . वाचावे लागेल . मग तुम्ही समजू शकाल . वास्तविक समज ती आहे .