MR/Prabhupada 0222 - या चळवळीला पुढे नेण्याचे कार्य सोडू नका



His Divine Grace Srila Bhaktisiddhanta Sarasvati Gosvami Prabhupada's Disappearance Day, Lecture -- Los Angeles, December 9, 1968


तर ही खूप छान चळवळ आहे .

अहम त्वाम सर्व-पपेभ्यो मोक्षयिश्यामि मा शुच: (भ गी १८।६६)

भगवद्गीता म्हणते , भगवंत म्हणतो , लोक त्यांच्या पापयुक्त कर्मांमुळे दुःख भोगत आहेत . अज्ञान . अज्ञान हे पापयुक्त कर्माचे कारण आहे . जसे एखाद्या मनुष्याला माहित नसते . समजा माझ्यासारखा विदेशी अमेरिकेमध्ये येतो आणि त्याला माहित नाही . कारण भारतामध्ये .. जसे तुमच्या देशात गाडी उजव्या बाजूने चालवतात , भारतामध्ये , मी लंडन मध्ये सुद्धा पाहिले आहे , ते डाव्या बाजूने गाडी चालवतात . तर समजा त्याला माहित नाही , तो डाव्या बाजूने गाडी चालवतो आणि अपघात होतो , आणि त्याला पोलीस अटक करतात . आणि जर तो म्हणाला , " साहेब , मला माहित नव्हते की कार उजव्या बाजूने चालवतात ," त्याने त्याला माफी मिळणार नाही . कायदा त्याला शिक्षा करेल . तर अज्ञान हे पापयुक्त कर्मे करण्याचे किंवा कायदा मोडण्याचे कारण आहे . आणि जसे तुम्ही पापयुक्त कर्म कराल , तुम्हाला त्याचे फळ भोगावे लागेल .

तर संपूर्ण जग अज्ञानात आहे आणि या अज्ञानामुळे जीव इतक्या सर्व कर्म आणि त्यांच्या फळामध्ये गुंतला आहे , चांगले किंवा वाईट . या भौतिक जगामध्ये काही चांगले नाही , सर्व वाईट आहे . तर आपण काही चांगले काही वाईट निर्माण केले आहे . इथे ...कारण आपण भगवदगीतेमुळे समजू शकतो हे स्थान

दुःखालयम अशाश्वतम (भ गी ८।१५)

ही जागा दुःखाचे स्थान आहे . तर तुम्ही कसे म्हणू शकता , या दयनीय परिस्थितीत तुम्ही कसे म्हणू शकता , की " हे चांगले आहे " किंवा "हे वाईट आहे ". तर ते लोक ज्यांना भौतिक जीवनाची परिस्थिती माहीत नाही - ते काही निर्माण करतात . " हे चांगले आहे , हे वाईट आहे " , कारण त्यांना माहित नाही इथे सर्वच वाईट आहे , काही चांगले नाही . एखाद्याने या भौतिक जगात खूप निराशावादी असले पाहिजे . मग तो आध्यत्मिक जगात प्रगती करेल .

दुःखालय अशाश्वतम (भ गी ८।१५)

हे जग दुःखाने भरले आहे आणि जर तुम्ही नीट विश्लेषण केले , तुम्हाला केवळ दुःखी परिस्थिती आढळेल . म्हणून संपूर्ण समस्या ही आहे की आपण आपले भौतिक जीवन त्यागले पाहिजे , आणि कृष्ण भावनामृतात आपण आपला स्तर अधिक उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याद्वारे ईश्वर धामी पोहोचावे ,

यद गत्वा ना निवर्तन्ते तद धामम् परमम् मम (भ गी १५।६)

न जिथे जाऊन कोणीही या दुःखी जगात परत येत नाही . आणि तेच ईश्वराचे परमोच्च धाम आहे . तर भगवद गीतेमध्ये वर्णन आहे . तर ही कृष्ण भावनामृत चळवळ प्रमाणित आहे , खूप महत्त्वाची . आता तुम्ही अमेरिकन मुले आणि मुली ज्यांनी ही कृष्ण भावनामृत चळवळ स्वीकारली आहे , कृपया ही खूप गंभीरतेने घ्या ... ते भगवान चैतन्य आणि माझ्या गुरू महाराजांचे ध्येय आहे , आणि आपण शिष्य परंपरेने ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत . तुम्ही मला मदत करायला पुढे आले आहात .

मी तुम्हाला प्रार्थना करत आहे की तुम्ही जावे , पण तुम्ही अधिक जगावे . या चळवळीला जोर लावणे सोडू नका आणि तुम्हाला भगवान चैतन्यांचा आशिर्वाद मिळेल . आणि त्यांच्या दिव्य कृपेने भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभूपाद . खूप धन्यवाद .