MR/Prabhupada 0223 - हि संस्था संपूर्ण मानव समाजाला शिक्षित करण्यासाठी असली पाहिजे
Room Conversation with Ratan Singh Rajda M.P. "Nationalism and Cheating" -- April 15, 1977, Bombay
प्रभूपाद : काय हरकत आहे ?
श्रीयुत राजदा : काही हरकत नसली पाहिजे ।
प्रभूपाद : भगवद गीतेचा स्वीकार झाला आहे , आज जितके मला समजते , जेव्हा मोरारजी यांना अटक होणार होती , ते म्हणाले होते " मला माझे भगवद गीतेचे वाचन आधी पूर्ण करूद्या " मी पेपर मध्ये वाचले होते ।
श्रीयुत राजदा : हो ते म्हणत होते ।
प्रभूपाद : मग ...ते भगवद गीतेचे उपासक आहेत आणि असे अनेक इतर जण आहेत । तर का हा उपदेश संपूर्ण जगाला दिला जाऊ नये ?
श्रीयुत राजदा : मला आता कळले , ते साधारणतः पहाटे ३.३० वाजता उठायचे , त्यांचे धार्मिक कार्य आधी करून घ्यायचे , भगवद गीतेचे वाचन इत्यादी । आणि ते कार्य दोन ते तीन तास चालत असे । मग सात वाजता ते स्नान करून त्यांच्या खोलीच्या बाहेर यायचे । मग ते भेटायचे ।
प्रभूपाद : आणि ही विदेशी मुले , त्यांचा भगवद्गीता सराव ३.३० ते ९.३० चालू करतात । त्यांना इतर उद्योगात रस नाही । तुम्ही पहा । तुम्ही आमचे हे गिरीराज त्यांचा अभ्यास । संपूर्ण दिवस तो हेच करत आहे । ते सर्व यावरच भर देतात । सकाळी ३.३० ते ९.३० जोपर्यंत ते थकत नाहीत , केवळ भगवद गीता ।
श्रीयुत राजदा : अप्रतिम ।
प्रभूपाद : आणि आमच्याकडे इतके साहित्य आहे । जर आम्ही केवळ एका ओळीवर संभाषण केले , तथा देहांतर प्राप्ती (भ.गी २.१३) , तरी ते समजून घ्यायला पूर्ण दिवस जातो ।
श्रीयुत राजदा : ओह ।
प्रभूपाद : आता , जर हे सत्य आहे , तथा देहांतर प्राप्ती आणि हन्यते ना हन्यमाने शरीरे (भ.गी. २.२०), आपण त्याकरता काय करत आहोत ? ही भगवद गीता आहे । न जायते ना म्रीयते वा कदाचीन ना हन्यते हन्यमाने शरीरे (भ.गी. २.२०) |
तर जेव्हा माझे शरीर नष्ट होईल , मी जात आहे ...( अवकाश ) ...मे स्वतः दारोदार जाऊन पुस्तके विकत आहे आणि पैसे पाठवत आहे । आम्ही आमच्या ध्येयाला एक प्रकारे पुढे नेत आहोत । मला सरकार किंवा लोकांकडून काही मदत मिळत नाही आहे । आणि बँक ऑफ अमेरिका मध्ये नोंद आहे की मी किती विदेशी पैसे आणत आहे । या दुर्बल अवस्थेत सुद्धा , मी रात्री कमीत कमी चार तास काम करत आहे । आणि हे सुद्धा मला मदत करत आहेत ।
तर हा आमचा वैयक्तिक प्रयत्न आहे । इथे का येऊ नये ? जर तुम्ही भगवद गीतेचे गंभीर शिष्य आहात , तुम्ही इथे येऊन मदत का नाही कार्य करत ? आणि हराव अभक्तास्य कुतो महद गुणा मनोरथे नासती धावतो(श्रीमद भागवतम ५.१८.१२) | तुम्ही केवळ कायद्याने लोकांना प्रामाणिक नाही बनवू शकत । ते शक्य नाही । विसरून जा । ते शक्यच नाही । हराव अभक्तास्य कुतो ...यस्यास्ति भक्तीर भागावत्य अकिनचना सर्वंयेव । जर तुम्ही , जर एखादा भगवंताचा भक्त झाला , सर्व चांगले गुण त्यावह्यात येतील । आणि हराव अभक्तास्य कुतो महद ... जर तो भक्त नसेल ... आता इतक्या सर्व गोष्टी , मोठ्या मोठ्या नेत्यांवर निषेध होत आहेत । आजचा पेपर मी पाहिला । "हा माणुस , तो माणूस , नाकारले जात आहे " का ? हराव अभक्तास्य कुतो ।
जर तो भक्त नसेल तर मोठा नेता होण्याचा काय उपयोग ? (हिंदी) तू बुद्धिमान आणि तरुण आहेस , म्हणून मी तुला काही कल्पना देत आहे , आणि तू जर या कल्पेनेला काही आकार देऊ शकलास ...ते आधीच तिथे आहे । यात काही गुपित नाही । फक्त आपण प्रामाणिक असले पाहिजे , की ही संस्था संपूर्ण मानव समाजाला ज्ञान देण्यासाठी असली पाहिजे । आकडा लहान असेल , काही हरकत नाही । त्याने फरक पडत नाही । पण तिथे आदर्श असला पाहिजे