MR/Prabhupada 0246 - कोणीही जो कृष्णाचा भक्त बनतो सर्व चांगले गुण त्याच्या शरीरात प्रकट होतात



Lecture on BG 2.9 -- London, August 15, 1973


हे भौतिक जग तथाकथित प्रेम,समाज,स्मिता आणि प्रेम सगळंकाही त्या इंद्रिय संतुष्टीसाठी. मैथुनादी, सुरुवात लैगिक कामनेपासून. यन्मैथुनादिगृहमेधिसुखं हि तुच्छं तर जेव्हा एखादा मुक्त होतो त्याच्या मैथुनादी सुखंमधून, तो मुक्त होतो,तो मुक्त होतो,स्वामी,गोस्वामी. जोपर्यंत एखादा मैथुनादीला संलग्न असे आहे, कामवासना,तो स्वामीही नाही किंवा गोस्वामीही नाही. स्वामी म्हणजे जेव्हा एखादा इंद्रियांचा स्वामी बनतो. जसे श्रीकृष्ण इंद्रियांचे स्वामी आहेत, तर जेव्हा एखादा कृष्णभावनामृत बनतो,तो इंद्रियांचा स्वामी बनतो. इंद्रियांना थांबवणे असे नाही. नाही. ते नियंत्रित करणे आवश्यक आहेत. "जेव्हा मला पाहिजे, मी त्याच वपर करीन;नाहीतर नाही." तो इंद्रियांचा स्वामी. "मी इंद्रियांना प्रेरणा देत नाही. इंद्रिय माझ्या निर्देशनाखाली कार्य करतात." तो स्वामी आहे. म्हणून अर्जुन गुडाकेश म्हटलंय. तो त्यांचा स्वामी आहे... जेव्हा तो पसंद करतो, तो सुद्धा. तो भ्याड नाही,पण तो दयाळू आहे कारण तो भक्त आहे. कारणं तो श्रीकृष्णांचा भक्त आहे... जोकोणी श्रीकृष्णांचा भक्त बनतो,सगळे चांगले गुण त्याच्या शरीरात प्रकट होतात.

यस्यास्ति भत्त्किर्भगवत्यकिञ्चना सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुराः (श्रीमद भागवतम ५.१८.१२)

सर्व दैवीगुण. म्हणून अर्जुन, तो देखल आहे... नाहीतर तो समान स्थितीत कसा श्रीकृष्णांचा जिवलग मित्र बनेल? मैत्री तेव्हाच घट्ट होते जेव्हा दोन्ही मित्र समान पातळीवर (आहेत). समान वय,समान शिक्षण,समान प्रतिष्ठा,समान सौन्दर्य. स्थितीतील साम्यता, मग मैत्री होते. मजबूत. तर अजुर्नही श्रीकृष्णांच्या समान पातळीवर होता. ज्याप्रमाणे एखादा राष्ट्राध्यक्षांचा मित्र,राजाचा किंवा राणीचा मित्र झाला. तर तो सामान्य माणूस नाही. तो नक्कीच समान पातळीवर असला पाहिजे. ज्याप्रमाणे गोस्वामी. जेव्हा गोस्वामी त्यांच्या कौटुंबिक जीवनाच त्याग करतात... श्रीनिवास आचार्यांनी वर्णन केलंय, त्यक्त्वा तूर्णं अशेष,मंडल पति श्रेणिं सदा तुच्छवत् मंडल पति,मोठे मोठे नेते,मंडल पति. मोठे मोठे नेते,जमीनदार,मोठी मोठी मोठी माणसं. ते मंत्री होते. जोपर्यंत तो मोठा माणूस नाही तोपर्यंत त्याचा कोण मित्र बनेल? तर रूप गोस्वामीनी त्याची संगत सोडली.

ज्यावेळी रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींचा श्री चैतन्य महाप्रभूंशी परिचय झाल्यावर, लगेच त्यांनी ठरवलं की "आपण या मंत्रिमंडळातून निवृत्त होऊ आणि श्रीचैतन्य महाप्रभूंना मदत करण्यासाठी सामील होऊ." त्याची सेवा करायला त्यांना मदत करायला नाही. श्री चैतन्य महाप्रभूंना कोणच्याही मदतीची आवश्यकता नाही. पण जर आपण त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची सेवा करायचा प्रयत्न केला. मग आपलं जीवन यशस्वी बनेल. ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी सांगितलंय... श्रीकृष्ण भगवद् गीता सांगण्यासाठी आले.

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं (भ.गी. १८.६६)

ते त्यांचं कार्य होत. ते "हि मूर्ख अनेक गोष्टींचे सेवक बनतात: समाज,मित्र,प्रेम,धर्म,हे ,ते,अनेक गोष्टी,राष्ट्र,जमात. त्यामुळे या दुष्टांनि हि सर्व मूर्ख काम थांबवली पाहिजेत." सर्वधर्मान्परित्यज्य: "मूर्खपणा सोडून द्या.केवळ मला शरण या" हा धर्म आहे. नाहीतर श्रीकृष्ण कसा सल्ला देतील की

सर्वधर्मान्परित्यज्य (भ.गी. १८.६६)

"तुम्ही सर्व धार्मिक प्रणाली सोडून द्या ?" ते आले - धर्म-संस्थापनार्थाय. ते धार्मिक तत्वांची पुनर्स्थापना करण्यासाठी आले. आता ते सांगतात,सर्वधर्मान्परित्यज्य: "सर्व सोडून द्या." ते म्हणजे कृष्णभावनामृतशिवाय, देव भावनामृतशिवाय,ते सर्व फसवे धर्म आहेत. ते धर्म नाहीत. धर्म म्हणजे धर्मं तु साक्षाद्भगवत्प्रणितं सर्वोच्च देवाचा आदेश. जर आपल्याला माहित नसेल सर्वोच्च देव कोण आहे, जर आपल्याला माहित नाही सर्वोच्च देवाचा काय आदेश आहे, मग धर्म कुठे आहे? तो धर्म नाही. ते धर्माच्या नावावर चालू आहे, पण ती फसवणूक आहे.