MR/Prabhupada 0247 - खरा धर्म म्हणजे भगवंतावर प्रेम करणे
Lecture on BG 2.9 -- London, August 15, 1973
तर भगवद् गीता संपते .
- सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं (भगवद् गीता १८.६६).
आणि तिथून भागवत सुरु होत. म्हणून भगवद् गीता श्रीमद् -भागवताचा प्रार्थमिक अभ्यास आहे. भागवत सुरु होत,
- धर्म: प्रोज्झितकैतवोSत्र
"आता,श्रीमद् -भागवतात,सर्व फसव्या प्रकारचे धर्म नाकारले आहेत,प्रोज्झित." इथे एक साखळी आहे. खरा धर्म म्हणजे देवावर प्रेम करणे. तो वास्तविक धर्म आहे. म्हणून भागवत सांगत
- स वै पुंसां परो धर्मो यतो भत्त्किरधोक्षजेः (श्रीमद भागवतम १.२.६)
"तो पहिल्या श्रेणीचा धर्म." त्याच अर्थ असा नाही की तुम्ही या धर्माचे किंवा त्या धर्माचे अनुसरण करा. तुम्ही कोणत्याही धर्माचे अनुसरण करा, त्यांनी काही फरक पडत, हिंदू धर्म किंवा ख्रिश्चन धर्म किंवा मुस्लिम धर्म,काहीही जो तुम्हाला आवडेल. पण आपण चाचणी घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी जो एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. कोणीही विचारत नाही, "तू कोणत्या महाविद्यालयातून तुझी परीक्षा उत्तीर्ण झालास. तू एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालास का? "ते ठीक आहे." आणि आमचा संबंध तुम्ही पदवीधर आहात का,पदव्यूत्तर याच्याशी आहे. एवढंच. कोणीही विचारत नाही,"कुठल्या महाविद्यालयातून,कोणत्या देशातून,कोणत्या धर्मातून,तू एम. ए.ची परीक्षा उत्तीर्ण झालास?" नाही. त्याचप्रमाणे, कोणी चोकशी करू नये, "तुम्ही कोणत्या धर्माचे आहात?" एखाद्याने पाहिलं पाहिजे की त्याने हि कला शिकली का, देवावर कसे प्रेम करायचे त्यात सर्व आलं. तो धर्म आहे. कारण इथे धर्म आहे:
- सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भ.गी. १८.६६)
भागवत सांगते हा धर्म आहे. धर्म: प्रोज्झितकैतवोSत्र " सर्व फसवे धर्म भागवतातुन काढून टाकले आहेत." केवळ निर्मत्सराणां, जे देवाचा मत्सर करत नाहीत... "मी का देवावर प्रेम करू? का मी देवाची पूजा करू? मी का देवला स्वीकारू?" ते सर्व असुर आहेत. त्यांना केवळ, श्रीमद् भागवत त्यांच्यासाठी आहे,जे कोणी खरोखरचं प्रामाणिकपणे देवावर प्रेम करत आहेत. अहैतुकी अप्रतिहता येनात्मा संप्रसीदति जीवनाचे वास्तविक यश हे जेव्हा तुम्ही देवावर कसे प्रेम करायचे शिकता ते आहे. मग तुमचे हृदय तृप्त होईल. यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः. जर आपण श्रीकृष्ण किंवा देव प्राप्त केल्यास... कृष्ण म्हणजे देव. जर तुम्हाला दुसरं देवाचं नाव मिळाले असेल,तर ते सुद्धा मान्य आहे.
पण देव, सर्वोच्च देव,सर्वोच्च व्यक्ती. जेव्हा तुम्हाला हे मिळालं... कारण आपण कोणावरतरी प्रेम करत आहोत. इथे प्रेमळ वृत्ती आहे. प्रत्येकामध्ये. पण चुकीच्या दिशेने आहे. म्हणून श्रीकृष्ण सांगतात,"हे सर्व प्रेमळ प्रकार सोडून द्या. माझ्यावर प्रेम करा." सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं (भ.गी. १८.६६) . अशा प्रकारे तुमची प्रेमिका कधीही तुमचे समाधान करू शकणार नाही. येनात्मा संप्रसीदति. जर तुम्हाला खरंच संतुष्ट व्हायचं असेल,मग तुम्ही कृष्णावर किंवा देवावर प्रेम करा. हे संपूर्ण तत्वज्ञान आहे... वैदिक तत्वज्ञान. किंवा कोणतेही तुम्ही घेतलेले तत्वज्ञान. कारण शेवटी, तुम्हाला तुमचे समाधान व्हायला हवंय, मनाचे पूर्ण समाधान. ते केवळ तेव्हाच साध्य करणे शक्य आहे जेव्हा तुम्ही देवावर प्रेम कराल. म्हणून पहिली श्रेणीचा धर्म तो आहे जो तुम्हाला शिकवतो, जो देवावर कसे प्रेम करायचे याचे मार्गदर्शन करतो. तो पहिल्या श्रेणीचा धर्म.
- स वै पुंसां परो धर्मो यतो भत्त्किर... (श्रीमद भागवतम १.२.६)
आणि असं प्रेम ज्यात कुठलाही हेतू नाही. ज्याप्रमाणे इथे या भौतिक जगात, "मी तुझ्यावर प्रेम करतो;तू माझ्यावर प्रेम कर." त्यापाठी काहीतरी हेतू आहे. अहैतुकी अप्रतिहता. अहैतुकी, हेतू नाही.
- अन्याभिलषिता शून्यं (भक्तीरसामृत सिंधू १.१.११).
इतर सर्व इच्छा शून्य बनतात.शून्य. ते भगवद्-गीतेत शिकवले आहे.