MR/Prabhupada 0248 - श्रीकृष्णांना १६,१०८ बायका मिळवण्यासाठी जवळपास प्रत्येकवेळी लढावे लागले



Lecture on BG 2.6 -- London, August 6, 1973


प्रद्युम्न : "आपल्याला माहित नाही ते जिंकणे किंवा आम्ही जिंकणे यातील काय चांगलं आहे. धृतराष्ट्र पुत्र - त्यांची जर आम्ही हत्या केली, आम्ही जीविताची इच्छा करत नाही - आता रणांगणावर आमच्या समोर उभे आहेत."

प्रभुपाद: तर हे दोन चुलत भावंडांचे समूह... महाराज पांडूचे पाच पुत्र आणि धृतराष्ट्रांचे शंभर पुत्र तर हे कुटुंब आहे, एक कुटुंब, आणि ती त्यांच्यात समजूत होती. जेव्हा इतर कुटुंबातील लोक त्यांच्यावर हल्ला करायला येतील. ते १०५ भाऊ एक होतील आणि लढतील. पण जेव्हा त्यांच्यातच युद्ध होत - एका बाजूला शंभर भाऊ,दुसऱ्या बाजूला पाच भाऊ. कारण क्षत्रिय कुटूंब, असं समजलं जात त्यांना लढायला लागत. अगदी त्यांच्या लग्नातसुद्धा लढाई होते. क्षत्रिय कुटूंबात लढाई शिवाय लग्न होत नाही. श्रीकृष्णांना १६,१०८ बायका होत्या,जवळजवळ प्रत्येकवेळी पत्नी मिळावण्यासाठी त्यांना लढावे लागले. ती एक खिलाडूवृत्ती होती. क्षत्रियांसाठी ती एक खिलाडूवृत्ती होती. त्यामुळे तो गोंधळलेला आहे की अशाप्रकारची लढाई करावी किंवा नाही.

अशी एक बंगालीमध्ये म्हण आहे, खाबो कि खाबो ना यदी खाओ तू पौशे "जेव्हा तुम्ही गोंधळलेले असता, मी खाऊ किंवा न खाऊ,' न खाणं चांगल आहे." काहीवेळा आपण या ठिकाणापर्यंत येतो, "मी खुप भुकेला नाही,मी खाऊ की न खाऊ?" न खाण चांगलं आहे, असं नाही की तुम्ही खाल्लंच पाहिजे. पण जर तुम्ही खाल्लंतच, तर तुम्ही डिसेंबर, पौषेमध्ये खाऊ शकता का? बंगालमध्ये... बंगाल उष्णकटिबंधीय हवामान आहे. पण जेव्हा हिवाळ्याचा हंगाम असतो, असा सल्ला दिला जातो की "जर तुम्ही खाल्लंत तर ते हानिकारक नाही कारण ते पचले जाईल." रात्र खूप मोठी आहे, किंवा थंड हवामान, पचनशक्ती चांगली आहे. तर जेव्हा आपण गोंधळून जातो,"करू किंवा करू नको," "जेव्हा तुम्ही विचार करता, जाबो की जाबो ना यदि जाओ तू शौचे: 'मी खाऊ किंवा न खाऊ?' न खान उत्तम. पण जेव्हा निसर्गाच बोलावण असत, तेव्हा तुम्ही गेलंच पाहिजे." जाबो की जाबो ना यदि जाओ तू शौचे, खाबो कि खाबो ना यदी खाओ तू पौषे हे सामान्य ज्ञान आहे.

त्याचप्रमाणे,अर्जुन आता गोंधळाला आहे," मी लढावे किंवा लढू नये ?" ते सुद्धा सगळीकडे आहे. जेव्हा आधुनिक राजकारण्यांच्यामध्ये युद्ध घोषित होते,ते विचार करतात... शेवटच्या दुसऱ्या युद्धाप्रमाणे, जेव्हा हिटलर युद्धाची तयारी करत होता... प्रत्येकाला माहित होते की हिटलर बदला घेणार होता कारण पहिल्यावेळी त्याचा पराभव झाला. तर हिटलर परत तयारी करत होता. एक,माझा गुरुबंधू, जर्मन, तो १९३३ ला भारतात आला. तर त्यावेळी त्यांनी कळवले की "युद्ध होणारच आहे. हिटलर जोरदार तयारी करत आहे. युद्ध अटळ होत. तर त्यावेळी, मला वाटत, तुमच्या देशात पंतप्रधान श्री. चेंबरलैं आणि तो युद्ध थांबवण्यासाठी हिटलरला भेटायला गेला. पण ते घडल नाही. तर त्याचप्रमाणे, या युद्धात, शेवटच्या क्षणापर्यंत,श्रीकृष्णांनी युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानी दुर्योधनाला सुचवले की "ते क्षत्रिय आहेत,तुझे चुलत भाऊ. तू त्यांचं राज्य हिरावून घेतलंस. हरकत नाही,तू या नाहीतर इतर मार्गाने घेतलंस. पण ते क्षत्रिय आहेत. त्यांच्याकडे उपजीविकेचे काही साधन असणे आवश्यक आहे. तर त्या पाच भावांना पाच गाव दे. संपूर्ण जगाच्या साम्राज्यातून पाच गाव.दे ." तर तो... "नाही,मी न लढता एक इंच जमीनीचा भागही देणार नाही." म्हणून, अशा परिस्थितीत, युद्ध अटळ होत.