MR/Prabhupada 0259 - श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेमाच्या स्तरावर पुन्हा स्थित होणे



Lecture -- Seattle, September 27, 1968

या सभेत कोणी म्हणू शकेल का,की तो कोणाचाही किंवा कशाचाही दास नाही? तो असला पाहिजे,कारण ती त्याची घटनात्मक स्थिती आहे. पण अडचण हि आहे की आपल्या इंद्रियांची सेवा करून, तिथे समस्यांवर,दुःखावर उपाय नाही. काही काळ मी स्वतःला समाधानी करू शकेन की मी ही नशा घेतली. आणि या नशेच्या प्रभावामुळे मला वाटते की "मी कोणाचाही दास नाही. मी मुक्त आहे," पण ते कृत्रिम आहे. नशा उतरल्यावर,तो पुन्हा त्याच ठिकाणी दास बनतो. परत दास.तर हि आपली स्थिती आहे. पण हा संघर्ष का आहे? मला सेवा करण्यास भाग पाडले जात आहे. पण मी सेवा करू इच्छित नाही. याला उपाय काय आहे? उपाय आहे कृष्णभावनामृत, ते जर तुम्ही श्रीकृष्णांचे दास बनलात,मग तुमची स्वामी बनण्याची महत्वाकांक्षा, त्याचवेळी तुमची स्वातंत्र्याची आकांक्षा, लगेच साध्य होते. जसे इथे तुम्हाला अर्जुन आणि श्रीकृष्णांचे चित्र दिसेल. श्रीकृष्ण भगवंत आहेत. अर्जुन सजीवप्राणी आहे,मानव. पण तो श्रीकृष्णांवर मित्र म्हणून प्रेम करतो. आणि त्याच्या मित्र प्रेमाच्या बदल्यात,श्रीकृष्ण त्याचे सारथी,सेवक. त्याचप्रमाणे, जर आपल्यापैकी प्रत्येकजण,श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेमाच्या स्तरावर पुन्हा स्थित झालो. तर आपली स्वामी होण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होईल ते सध्या ज्ञात नाही,पण जर आपण श्रीकृष्णांची सेवा करायला सहमत असलो, मग हळूहळू तुम्ही बघू शकाल की श्रीकृष्ण तुमची सेवा करत आहेत. हा आत्मसाक्षात्काराचा प्रश्न आहे. पण जर आपल्याला या भौतिक जगाच्या,इंद्रियांच्या सेवेतून बाहेर पडायची इच्छा असेल मग आपण आपली सेवा वृत्ती श्रीकृष्णांमध्ये बदलली पाहिजे. याला कृष्णभावनामृत म्हणतात. कामादीनां कती न कतिधा पालिता दुर्निदेशाः तेषां मयि न करुणा जाता. न त्रपा नोपशांति: सांप्रतम अहं लब्धबुद्धीस त्वाम आयात: नियुंक्ष्वात्मदास्ये. एक भक्त श्रीकृष्णांना प्रार्थना करतो की "इतके वर्ष,मी माझ्या आयुष्यात,इंद्रियांची सेवा केली." कामादीनां. काम म्हणजे इंद्रिय,वासना. "तर जे मी करायला नको होते,तरीही,मी माझ्या वासनेच्या आज्ञेचे पालन केले आहे." एखाद्याला करावे लागेल. जेव्हा तो गुलाम किंवा सेवक आहे. नंतर त्याला अशी कृती करण्यास भाग पाडले जाते जी कृती करणे त्याला आवडत नाही.ती सक्ती आहे. तर इथे भक्त स्वीकार करतो की "माझ्या वासनेच्या आज्ञेने,मी हे केले आहे. असे काहीतरी जे मी करायला नको होते,पण मी ते केले आहे." ठीक आहे,तू केले आहेस, तुझ्या इंद्रियांची सेवा केली आहेस. ते सर्व ठीक आहे. "पण अडचण आहे की तेषां मयि करुणा न जाता.न त्रपा नोपशांति: मी इतकी सेवा केली आहे, पण मला असे वाटत की ते समाधानी नाहीत. ते समाधानी नाहीत.ती माझी अडचण आहे. इंद्रियही तृप्त नाहीत आणि मी पण संतुष्ट नाही, त्याचप्रमाणे इंद्रिय मला आराम देत नाहीत,की आणि त्या सेवेचा मला काही उपयोग नाही. ती माझी स्थिती आहे." जर मी ते बघितलं असतं, नपेक्षा आपल्याला तसं वाटलं असतं, "मी अनेक वर्षे माझ्या इंद्रियांची सेवा केली,आता माझी इंद्रिय तृप्त झाली आहेत…" नाही ती समाधानी नाहीत.तरीही आज्ञा देत आहेत. तरीही आज्ञा देत आहेत. "मी खूप…" अर्थात,हे स्वाभाविक आहे, पण मी याच्यासह उघड करतो, माझे काही शिष्य सांगतात की,त्याची आई तिच्या वृद्धपकाळात लग्न करणार आहे. जरा बघा. तिला प्रौढ मुले आहेत. आणि कोणीतरी तक्रार केली की त्याच्या आजीने सुद्धा लग्न केले. का? जरा बघा.पंच्यातराव्या वयात,पंचावन्नाव्या वयात इंद्रिय इतकी बलवान आहेत. की तिला आज्ञा देत आहेत: "हो, तू हे केलंच पाहिजे."