MR/Prabhupada 0260 - इंद्रियांचे ऐकल्यामुळे जन्मजन्मांतर आपण पापकर्म करत आहोत



Lecture -- Seattle, September 27, 1968

इंद्रिय किती बलवान आहेत हे प्रत्यक्षपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. असं नाही की केवळ तरुण पुरुष इंद्रियांचे दास आहेत. अगदी पंचाहत्तर वर्षांचे, ऐंशी वर्षांचे, किंवा मृत्यू समयी,ते सर्व इंद्रियांचे दास आहेत. इंद्रिय कधीही समाधानी होत नाहीत. ती भौतिक हुकूमशाही आहे. म्हणून मी गुलाम आहे. मी माझ्या इंद्रियांचा गुलाम आहे,आणि माझ्या इंद्रियांची सेवा करून, ना मी संतुष्ट आहे, ना माझी इंद्रिय तृप्त आहेत, ती माझ्यावर खुश आहेत. गोंधळ आहे. तर हि अडचण आहे. तर सर्वोत्तम गोष्ट… म्हणून श्रीकृष्ण सांगतात,

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:
(भ गी १८।६६)

अनेक जन्म तुम्ही तुमच्या इंद्रियांची सेवा केलीत ८,४००,००० योनी. पक्षी,त्यांच्यावर सुद्धा इंद्रियांचे नियंत्रण आहे.प्राणी, त्यांच्यावर सुद्धा इंद्रियांचे नियंत्रण आहे. पुरुष,मनुष्यप्राणी,आणि प्रत्येकजण, देव,या भौतिक जगातील ते सर्वजण इंद्रियांची सेवा करत आहेत. पण श्रीकृष्ण सांगतात की "तुम्ही केवळ मला शरण या. केवळ माझी सेवा करायचं मान्य करा. "मग मी तुमची काळजी घेईन." एवढंच. अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: कारण इंद्रियांचे ऐकल्यामुळे जन्मजन्मांतर आपण पापकर्म करत आहोत. म्हणून आपण वेगवेगळ्या शरीरांच्या श्रेणीत आहोत. असं समजू नका की प्रत्येकजण समान पातळीवर आहे. नाही एखाद्याला त्याच्या कामानुसार ठराविक प्रकारचे शरीर मिळते. तर वेगवेगळ्या दर्जाच्या इंद्रिय तृप्तीमुळे हि निरनिराळ्या प्रकारची शरीरं आहेत. तर इंद्रिय तृप्ती डुक्करांच्या जीवनात सुद्धा आहे. त्याला डुक्कराचे शरीर का मिळाले? इंद्रियसुखात इतका गर्क आहे की कोण आई आहे,कोण बहीण आहे,किंवा हा आहे,किंवा तो कोण आहे, असा भेदभाव करत नाही. हे व्यावहारिक आहे,तुम्हाला दिसेल. कुत्रा आणि डुक्कर,ते असेच आहेत. मनुष्य समाजात सुद्धा असे बरेचजण आहेत जे कोण आई आहे,कोण बहीण आहे,किंवा हा कोण आहे याची काळजी करत नाहीत. इंद्रिय इतकी बलवान आहेत.आणि हे आपल्या सर्व दुःखांचे कारण आहे,समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्रिविध ताप की जे आपण भोगत आहोत,आम्ही त्याचे निरसन करण्याचा प्रयत्न करत आहोत. जे इंद्रियांच्या हुकमशाहीमुळे आहे. त्यामुळे श्रीकृष्ण इथे आहेत. श्रीकृष्ण आहेत.त्यांचे नाव मदन-मोहन आहे. जर तुम्ही तुमचं प्रेम इंद्रियांऐवजी श्रीकृष्णांकडे वळवण्याचा प्रयत्न केलात,मग तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल. ताबडतोब तुम्हाला सापडेल. सेवोन्मुखे हि जिव्हादौ (भक्तिरसामृतसिंधू. १.२.२३४). तर हे खोटे प्रयत्न, की "मला सर्वेक्षण करणाऱ्या सर्वांचा स्वामी व्हायचं आहे," "मी सर्व सर्वेक्षण करणाऱ्यांचा राजा आहे." हा दृष्टिकोन सोडला पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकजण घटनात्मकदृष्ट्या सेवक आहे. सध्या,सध्याच्या क्षणी, आपण इंद्रियांचे दास आहोत. आता,ही सेवाभावीवृत्ती श्रीकृष्णांकडे वळवली पाहिजे. सेवोन्मुखे हि जिव्हादौ स्वयमेव स्फुरत्यदः आणि जेव्हा तुम्ही तुमची सेवाभावीवृत्ती श्रीकृष्णांकडे वळवलीत, मग हळूहळू,जेव्हा तुम्ही प्रामाणिक व्हाल तेव्हा,श्रीकृष्ण तुम्हाला विषद करतील, आणि श्रीकृष्ण आणि तुमच्यामधील सेवेची देवाण घेवाण इतकी छान होईल. एकतर तुम्ही त्यांच्यावर मित्र,किंवा स्वामी,किंवा प्रेमी म्हणून प्रेम कराल किंवा… इतक्या सर्व गोष्टी आहेत. कोणत्याही प्रकारे तुम्ही त्यांच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करू शकता आणि तुम्ही किती समाधानी आहात ते बघा. ही कृष्णभावनामृत चळवळ आहे. कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा.