MR/Prabhupada 0261 - भगवंत आणि भक्त, ते एकाच पातळीवर आहेत



Lecture -- Seattle, September 27, 1968

प्रभुपाद: आता तुमच्या देशात ही मुले कृष्णभावनामृत चळवळीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच माझी नम्र विनंती आहे की उदात्त जीवनाचे महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करा. नुसता हरे कृष्णाचा जप करून, तुम्ही हळूहळू दिव्य प्रेमळ वृत्ती विकसित कराल. आणि जेव्हा तुम्ही श्रीकृष्णांवर प्रेम करायला लागत तेव्हा तुमचे सर्व त्रास… ते म्हणजे तुम्ही पूर्ण समाधान अनुभवू शकाल. समस्या आणि संकटे मानसिक असतात. एका माणसाला दर महिन्याला $६००० मिळतात; एका माणसाला दर महिन्याला $२०० मिळतात. पण कलकत्यामध्ये मी एक सज्जन पहिला,तो ६००० कमवत होता; त्याने आत्महत्या केली. आत्महत्या का? ते पैसे त्याला समाधान देऊ शकले नाहीत. त्याला काहीतरी वेगळे हवे होते. हे भौतिक वातावरण,भरपूर पैसे कमवून, तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही.कारण आपल्यापैकी प्रत्येकजण इंद्रियांचा दास आहे. इंद्रियांची सेवा करण्याची वृत्ती बदलून श्रीकृष्णांची सेवा करण्याकडे वळवली पाहिजे. आणि नंतर तुम्हाला सर्व समस्या सोडवल्याचे जाणवेल. आभारी आहे. (भक्तगण दंडवत करतात.) काही प्रश्न? भक्त: प्रभुपाद,श्रीकृष्णांचे चित्र परीपूर्ण आहे,बरोबर? ते श्रीकृष्ण आहेत. त्याचप्रकारे एका शुद्ध भक्ताचे चित्र परीपूर्ण आहे का? प्रभुपाद: भक्ताचे चित्र? भक्त: शुद्ध भक्त. प्रभुपाद: हो. भक्त: तशा अर्थाने परिपूर्णच आहे… प्रभुपाद: हो. भक्त: असं म्हणू प्रल्हाद महाराज आणि नृसिंहदेव यांचं सुद्धा चित्र… जोपर्यंत नृसिंहदेव आहे तोपर्यंत प्रल्हाद आहे. प्रभुपाद: हो. भगवंत आणि भक्त, ते एकाच पातळीवर आहेत.त्यापैकी प्रत्येकजण. भगवंतांचे नाव,त्यांचे रूप,त्यांचे गुण, त्यांचे पार्षद,त्यांची साधन सामुग्री. सर्वकाही,ते परिपूर्ण आहे. नाम गुण रूप लीला परी…आणि दिव्य लीला. ज्याप्रमाणे आपण श्रीकृष्णांबद्दल ऐकतो,ते श्रीकृष्णांपासून निराळे नाही. जेव्हा हरे कृष्णाचा जप होतो,हे हरे कृष्ण,हे स्पंदन, श्रीकृष्णांपासून वेगळे नाही. सगळंकाही परिपूर्ण आहे. म्हणून श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त श्रीकृष्णांपासून वेगळा नाही. हा दिव्य अचिंत्य भेदाभेद सिद्धांत आहे. हे तत्वज्ञान समजून घेणे आवश्यक आहे, की श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ शक्तिमान पुरुष आहेत. आणि सर्वकाही,जे काही आपण पाहतो,जे काही आपण अनुभवतो,त्या सगळ्या श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत. आणि शक्ती आणि शक्तिमान वेगळे करणे शक्य नाही. म्हणून ते सर्व परिपूर्ण पातळीवर आहेत. फक्त,जेव्हा ते माया किंवा अज्ञानाने झाकले जाते, तेव्हा ते वेगळे असते.एवढेच.