MR/Prabhupada 0263 - जर तुम्ही हे सूत्र चांगल्या प्रकारे स्वीकारले असेल,तर तुम्ही प्रचार करत राहाल



Lecture -- Seattle, September 27, 1968

प्रभुपाद: होय, मधुद्विश: प्रभुपाद, चैतन्य महाप्रभूंनी कली युगाच्या सुवर्ण काळाचा अंदाज वर्तवला तेव्हा त्यांनी नक्की काय वर्तवले, (अस्पष्ट) केव्हा लोक हरे कृष्णाचा जप करतील? प्रभुपाद : हो,लोक… ज्याप्रमाणे आपण आता हरे कृष्णाचा प्रचार करतो. तुमच्या देशात तिथे असा प्रचार नाही. तर आम्ही आमचे शिष्य यूरोप,जर्मनी, लंडनला पाठवले आहेत. - तुम्ही देखील प्रसार करत आहात. अशा प्रकारे, केवळ १९६६ पासून प्रत्यक्षपणे आमचे कार्य सुरु आहे. आम्ही १९६६ ला या संघटनेची नोंदणी केली आहे, आणि हे ६८ आहे. तर हळूहळू आम्ही प्रसार करत आहोत, मी म्हातारा माणूस आहे.मी मरु शकीन. जर तुम्ही हे सूत्र चांगल्या प्रकारे स्वीकारले असेल,तर तुम्ही प्रचार करत राहाल. आणि ते संपूर्ण जगात पसरेल खूप सोपी गोष्ट. फक्त थोड्या हुशारीची आवश्यकता आहे.एवढेच. तर कोणताही बुद्धिमान माणूस स्वीकारेल. पण एखाद्याला फसवलं जायला हवं असेल,जर एखाद्याची फसवले जाण्याची इच्छा असेल, तर तो कसा वाचू शकेल? मग त्याला पटवणे फार कठीण आहे. पण जे खुल्या मनाचे आहेत, ते खात्रीने हि छान कृष्णभावनामृत चळवळ स्वीकारतील.हो. जय गोपाल: जेव्हा आपण अपरा प्रकृती, शाश्वत शक्ती श्रीकृष्णांच्या सेवेत गुंतवतो. ती अध्यात्मिक होईल, नाही का? प्रभुपाद: नाही जेव्हा तुम्ही तुमची शक्ती लागू करता,तेव्हा ती भौतिक राहत नाही; ती अध्यात्मिक होते. ज्याप्रमाणे तांब्याची वायर विजेच्या संपर्कत आल्यावर, ती तांब्याची राहात नाही, ती विद्युत होते. तर श्रीकृष्णांची सेवा म्हणजे जेव्हा तुम्ही श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये स्वतःला गुंतवता, तेव्हा तुम्ही श्रीकृष्णांपासून वेगळे रहात नाही. ते भगवद् गीतेत सांगितले आहे: मां च योsव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सेवते हा शब्द. स गुणान्समतीत्यैतान्ब्रह्मभूयाय कल्पते(भ गी १४।२६) । शब्द. स गुणान्समतीत्यैतान्ब्रह्मभूयाय कल्पते भ.गी. १४.२६). "जो कोणी माझ्या सेवेत स्वतःला प्रामाणिकपणे गुंतवतो, लगेचच तो भौतिक गुणांवर दिव्य बनतो आणि तो ब्रह्मन् स्तरावर असतो." ब्रम्हभूयाय कल्पते. तर जेव्हा तुम्ही तुमची शक्ती श्रीकृष्णांच्या सेवेत लागू करता तेव्हा, तुम्ही असा विचार करु नका की तुमची भौतिक शक्ती तिथे आहे. नाही. ज्याप्रमाणे हि फळे. हि फळे, एखादा विचार करतो,"हा काय प्रसाद आहे? हे फळ विकत घेतले आहेत, आपण सुद्धा घरी फळं खातो, आणि हा प्रसाद आहे?" नाही. कारण ती श्रीकृष्णांना अर्पण केली आहेत, लगेच ती भौतिक रहात नाही. परिणाम? तुम्ही कृष्ण प्रसाद ग्रहण करा आणि तुमची कृष्ण चेतनेत कशी प्रगती होते ते पहा. जर वैद्य तुम्हाला औषधे देतात आणि तुम्ही बरे झालात, तर तो औषधांचा प्रभाव आहे. आणखी एक उदाहरण की कशा भौतिक गोष्टी अध्यात्मिक होतात. एक खूप चांगले उदाहरण. ज्याप्रमाणे तुम्ही मोठ्या प्रमाणात दूध घेतलंत. तर तुमच्या पोटात काही विकार आहे. तुम्ही वैद्याकडे जाता. किमान, वैदिक पद्धतीनुसार…,ते तुम्हाला दही खायला सांगतील ते दुधापासून तयार केलेलं आहे. ते दही थोड्या औषधाबरोबर बरे करेल. आता तुम्हाला आजार दुधामुळे झाला आहे, आणि तो बरा सुद्धा दुधामुळे झाला. का? तो वैद्यांनी सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे,प्रत्येक गोष्ट… उच्च स्तरावर पदार्थांचे काही अस्तिव नाही; तो केवळ भ्रम आहे. ज्याप्रमाणे आज सकाळी मी सूर्य आणि धुक्याचे उदाहरण देत होतो. तिथे धुकं आहे; सूर्य पाहू शकत नाही. मूर्ख व्यक्ती म्हणेल की "तिथे सूर्य नाही आहे. ते फक्त धुकं आहे." पण बुद्धिमान व्यक्ती म्हणेल की " तिथे सूर्य आहे,पण धुक्याने आमचे डोळे झाकले गेले आहेत. आपण सूर्य पाहू शकत नाही. त्याचप्रमाणे, खरतर,प्रत्येकगोष्ट श्रीकृष्णांची शक्ती आहे,तिथे भौतिक काही नाही. केवळ आपल्या मानसिकतेमुळे आपण सगळ्यावर राज्य करू इच्छितो.ते असत्य आहे,भ्रम. हेच श्रीकृष्णांबरोबरच्या आपल्या संबंधाला झाकत आहे. सेवोन्मुखें हि जिव्हादौ स्वयमेव स्फुरत्यद: (भक्तिरसामृतसिंधू १.२.२३४). जेव्हा तुमच्या सेवावृत्तीत प्रगती होईल, सर्वकाही स्पष्ट होईल. की कशी तुमची ऊर्जा अध्यात्मिक बनली आहे.