MR/Prabhupada 0266 - श्रीकृष्ण पूर्ण ब्रम्हचारी आहेत



Lecture on BG 2.10 -- London, August 16, 1973

प्रभुपाद: तर भीष्मदेव, राजसूय-यज्ञात,कबूल करतात की श्रीकृष्णांपेक्षा कोणीही श्रेष्ठ ब्रम्हचारी नाही. ते गोपीं बरोबर होते, पण ते ब्रम्हचारी राहिले. जर मी गोपीं बरोबर असतो, मला माहित नाही काय झालं असत, माझी काय अवस्था झाली असती. तर म्हणून श्रीकृष्ण परिपूर्ण ब्रम्हचारी आहेत, ऋषिकेश. आणि हे दुष्ट ते सांगतात की श्रीकृष्ण अनैतिक आहेत. नाही. श्रीकृष्ण परिपूर्ण ब्रम्हचारी आहेत. धीर. धीर म्हणजे एखादा विचलित न होणे. अगदी विचलित करणारी परिस्थिती असली तरी. तर श्रीकृष्ण हे असे ब्रम्हचारी आहेत. तरीही… केवळ त्यांच्या तरुणपणाच्या उंबरठ्यावर, वयाच्या १५,१६ व्या वर्षी, गावातील सर्व मुली मत्रिणी होत्या, त्या श्रीकृष्णांच्या सौन्दर्याकडे आकर्षित झाल्या होत्या. त्या गावात श्रीकृष्णाबरोबर नृत्य करायला यायच्या. पण ते ब्रम्हचारी होते. तुम्ही कधीही ऐकणार नाही की श्रीकृष्णांचे अवैध संबंध होते. नाही. अशी काही माहिती नव्हती. नृत्याचे वर्णन आहे. पण गर्भनिरोधक गोळी नाही. नाही. त्याचे इथे वर्णन नाही. म्हणून ते ऋषिकेश आहेत. ऋषिकेश म्हणजे परिपूर्ण ब्रम्हचारी. विकार-हेतू, अगदी तिथे विचलित होण्याचे कारण होते, ते विचलित झाले नाहीत. ते श्रीकृष्ण आहेत. त्यांना हजारो हजारो भक्त आहेत, काही भक्त, जर त्यांना श्रीकृष्ण प्रियकर हवे असले, श्रीकृष्ण स्वीकार करतात, पण त्यांना इतर कोणाची आवश्यकता नाही. त्यांना आवश्यकता नाही. ते आत्मनिर्भर आहेत. त्यांना आपल्या इंद्रिय संतुष्टी साठी कोण इतरांच्या मदतीची आवश्यकता नाही. म्हणून श्रीकृष्ण ऋषिकेश आहेत. इंद्रियांचे स्वामी. तर कमीतकमी श्रीकृष्णांचे भक्त… भक्तांची अनेक उदाहरणं आहेत. ते सुद्धा… का अनेक? जवळजवळ सर्व भक्त, ते इंद्रियांचे स्वामी,गोस्वामीआहेत. ज्याप्रमाणे हरिदास ठाकूर. तुम्हाला माहित आहे. हरिदास ठाकूर तरुण होते,आणि गावचा जमीनदार,तो मुसलमान होता. तर प्रत्येकजण हरिदास ठाकुरांचे कौतुक करत होता, एक महान भक्त. तर जमीनदार,गावचा जमीनदार,तो खूप मत्सर करू लागला. तर त्याने एका वेश्याला हरिदास ठाकूरांना अपवित्र करण्यासाठी पाठवले. आणि मध्य रात्री आली आकर्षक,छान कपडे घालून, ती तरुण होती,खूप सुंदर पण होती. तर तिने प्रस्ताव ठेवला की "मी तुमच्या सौन्दर्यावर भाळून इथे आले आहे." हरिदास ठाकूर म्हणाले, हो,ते ठीक आहे.ये. बस. मला माझा जप मग आपण आनंद घेऊ शकू." तर ती बसली. पण हरिदास ठाकूर जप करत होते, ते जप करत होते… आपण, आपण सोळा माळा जप करु शकत नाही, आणि ते तीन वेळा चौसष्ठ माळा जप करत होते. हे किती झाले रेवतीनंदन: १९६. प्रभुपाद: १९६ माळा हे त्यांचे एकमेव काम होते. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण… तर काहीवेळा कोणीकोणी हरिदास ठाकुरांचे अनुकरण करू इच्छितो,ते शक्य नाही. तर हरिदास ठाकूर,जेव्हा सकाळ झाली,वेश्या,"आता सकाळ झाली आहे." "हो,उद्या रात्री मी… उद्या रात्री ये.आज मी जप पूर्ण करू शकलो नाही." ती एक सबब होती. अशाप्रकारे तीन दिवस उलटले. मग वेश्येत बदल झाला, ती त्यांच्या चरणावर… "सर, मी तुम्हाला अपवित्र करायला आले. आता मला वाचवा,मी एवढी पतित आहे." तर हरिदास ठाकूर म्हणाले "हो, ते मला माहित आहे. मी हि जागा ताबडतोब सोडली असती, जेव्हा तू आलीस, पण माझी इच्छा होती की तू माझ्याकडे आली आहेस,तर तुझे एका वैष्णवात परिवर्तन करावे." तर वेश्या एक महान भक्त बनली कृपेने… हरिदास ठाकुरांनी सांगितले की "तू या जागी बस तू या तुळशी समोर बसून हरे कृष्णाचा जप कर. आता मी हि जागा सोडत आहे."