MR/Prabhupada 0267 - श्रीकृष्ण काय आहेत व्यासदेवानी वर्णन केले आहे



Lecture on BG 2.10 -- London, August 16, 1973

तर कृष्ण-भक्ती अशी आहे. इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण. जसे श्रीकृष्णांचे इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण आहे, त्याचप्रमाणे, जे खरोखरचं श्रीकृष्णांचे भक्त आहेत,त्यांचेपण इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण आहे. ऋषिकेश. ज्याप्रमाणे यमुनाचार्य. ते प्रार्थना करत आहेत,ते बोलत आहेत. यदवधी मम चित्त: कृष्णपदारविन्दे, नवनव-धामन्यूद्यतं रंन्तुमासीत् "श्रीकृष्णांच्या पदकमलांचा आश्रय घेतल्यापासून. माझे चित्त दिव्य आनंद अनुभवायला लागले आहे." यदवधी मम चित्त: कृष्णपदारविन्दे, कृष्णपदारविन्दे म्हणजे श्रीकृष्णांचे पदकमल. "जेव्हापासून माझे चित्त, माझे हृदय,श्रीकृष्णांच्या चरणांशी आकर्षित झाले आहे." तदवधि बत नारीसंगमे, "जेव्हापण मी लैगिक सुखाचा विचार करतो," भवति मुखविकारः, "मी द्वेष करतो, त्यावर मी थुकतो." हि कृष्ण भक्ती. कृष्ण भक्ती हि अशी आहे. भक्ती: परेशानुभवो विरत्त्किरन्यत्र स्यात. या भौतिक जगात सर्वात मुख्य आकर्षण लैगिक जीवन आहे. हाच लैगिक जीवनाचा पाया आहे. हि सर्व लोक दिवस आणि रात्र एवढे कष्ट करत आहेत केवळ लैगिक सुखासाठी. यन मैथुनादि- गृह… ते खूप धोका पत्करत आहेत. ते काम करत आहेत, कर्मी, ते खूप कष्ट करत आहेत. त्यांच्या जीवनाचा आनंद काय आहे? जीवनाचा आनंद लैगिक सुख आहे. यन्मैथुनादिगृहमेधिसुखं हि तुच्छं खूप घृणास्पद काम, पण तो त्यांचा आनंद आहे. हे भौतिक जग आहे. तर श्रीकृष्ण तसे नाही आहेत. पण दुष्ट,ते असं चित्र रंगवतात,आणि त्या चित्राचे खूप कौतुक होते,की श्रीकृष्ण गोपींना आलिंगन देत आहेत. कोणीतरी मला सांगत होते की.. शेवटी… कोण आले होते? ते श्रीकृष्णांचे चित्र तर श्रीकृष्ण पुतनाला मारतात,ते चित्र रंगवत नाहीत, किंवा कंसाला मारले, किंवा… श्रीकृष्णांची अनेक चित्र आहेत. अशी चित्र हे कलाकार नाही रंगवणार. गोपीं बरोबरचे त्याचे गोपनीय व्यवहार अशी चित्र फक्त ते रंगवतील. एखादा जो श्रीकृष्णांना समजू शकत नाही, कृष्ण काय आहेत. जे व्यासदेवानी वर्णन केले आहे नऊ सर्गामध्ये, श्रीकृष्णांना समजण्यासाठी. आणि नंतर दहाव्या सर्गात त्यांनी श्रीकृष्णांच्या जन्मापासून सुरवात केली आहे. पण हि दुष्ट,ते ताबडतोब रास-लीलावर उडी मारतात. सर्वात पहिले श्रीकृष्णांना समजा. ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या मोठ्या माणसाचे मित्र झालात, तर सर्व प्रथम त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही त्याच्या परिवार बद्दल किंवा गोपनीय गोष्टी समजण्याचा प्रयत्न करा. पण हि लोक रास लीलेवर उडी मारतात. आणि चुकीचा समज होतो. आणि म्हणून ते काहीवेळा म्हणतात,"श्रीकृष्ण अनैतिक आहेत." श्रीकृष्ण कसे अनैतिक असू शकतात? स्वीकार करुन,श्रीकृष्णांच्या नावाचा जप करून, अनैतिक व्यक्ती नैतिक होते, आणि श्रीकृष्ण अनैतिक आहेत. जरा पहा मूर्खपणा. केवळ श्रीकृष्णांच्या नावाचा जप करून, सर्व अनैतिक लोक नैतिक बनतात. आणि श्रीकृष्ण अनैतिक आहेत. आणि हे एका बदमाश प्राध्यापकाने बोलले आहे.