MR/Prabhupada 0269 - काल्पनिक भाष्याने तुम्ही भगवद् गीता समजू शकत नाही



Lecture on BG 2.10 -- London, August 16, 1973

तर ऋषिकेश म्हणून श्रीकृष्णांना समजण्याचा प्रयत्न करा. तर ऋषिकेश, कृष्ण,हसायला लागले "हा माझा मित्र आहे,सतत सहयोगी,आणि अशा प्रकारची दुर्बलता. सर्व प्रथम तो उत्साही होता मला सांगत होता त्याचा रथ, सेनयोरुभयोर्मध्ये आता विषीदन्त,आता तो विलाप करत आहे." तर… आपण सर्व त्यासारखेच मूर्ख आहोत. अर्जुन मुर्ख नाही. अर्जुनाचे वर्णन गुडाकेश म्हणून केले आहे. तो कसा मूर्ख असू शकेल? पण तो मूर्खाची भूमिका करत होता. जर त्याने मुर्खाची भूमिका केली नसती, तर हि भगवद्-गीता श्रीकृष्णांच्या मुखातून कशी आली असती? जर त्याने मुर्खाची भूमिका केली नसती, तर हि भगवद्-गीता श्रीकृष्णांच्या मुखातून कशी आली असती? तर आदर्श शिक्षक आणि आदर्श शिष्य, अर्जुन. आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे… आपली स्थिती… अर्जुन आपल्यासारख्या सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करत आहे. आणि कृष्ण ऋषिकेश आहेत,सल्ला देत आहेत,आदर्श सल्ला. जर आपण स्वीकारला,जर आपण भगवद् गीता अर्जुनाप्रमाणे समजण्याच्या भावनेने वाचली.परिपूर्ण शिष्य, आणि जर आपण श्रीकृष्णांच्या सूचना आणि सल्ला मानला,परिपूर्ण शिक्षक, मग आपण जाणले पाहिजे की आपल्याला भगवद् गीता समजली आहे. मानसिक तर्काने, दुष्ट अर्थाने, आपली शिष्यवृत्ती दाखवून, आपण भगवद् गीता समजू शकत नाही. ते शक्य नाही.विनम्र. म्हणून भगवद् गीतेत सांगितलं आहे. तद्विद्धि प्रणिपातेन परीप्रश्नेन सेवया (भ गी ४।३४) तर आपण अर्जुनाप्रमाणे शरण गेलं पाहिजे,तो शरण गेला. शिष्यस्तेsहं शाधि मां त्वां प्रपन्नम् (भ गी २।७) "मी तुम्हाला शरण आलो आहे. मी तुमचा शिष्य बनतो." शिष्य बनणे म्हणजे शरण जाणे. स्वेच्छेने सूचना स्वीकारणे, सल्ला,अध्यात्मिक गुरूंचे आदेश. तर अर्जुनाने ते आधीच स्वीकारले आहे. तरीही तो बोलत आहे की ना योत्स्ये, "कृष्ण,मी लढणार नाही." पण गुरु, जेव्हा ते सर्व गोष्टी समजावून सांगतात.तेव्हा तो लढतो, गुरूंची आज्ञा. लढणार नाही, हि त्याची स्वतःची इंद्रिय संतुष्टी आहे. आणि जरी त्याची स्वतःची लढण्याची इच्छा नसली,तरी लढणार ते गुरूंच्या संतुष्टीसाठी. हे भगवद् गीतेचे सार आहे. तर कृष्ण, अर्जुनाला बघून, विषीदन्त खूप प्रभावित, विलाप, की तो आपले कर्तव्य करायला तयार नाही. म्हणून पुढच्या श्लोकात तो म्हणतो की: अशोच्यानन्वशोचस्त्वं प्राज्ञावादांच्श्र भाषसे: (भ गी २।११) "माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा मित्र आहेस. हरकत नाही, माया खूप बलवान आहे. तू माझा मित्र असलास तरीही,वैयक्तिक,तू खोट्या करुणेने भारावला आहेस. तर फक्त माझे एक." म्हणून ते सांगतात,अशोच्यान: "तू अशा गोष्टीसाठी विलाप करत आहेस जे चांगले नाही." अशोच्या.शोच्या म्हणजे विलाप, आणि अशोच्या म्हणजे एखाद्याने विलाप करू नये. अशोच्या. तर अशोच्यानन्वशोचस्त्वं प्राज्ञावादांच्श्र भाषसे "पण तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस." कारण तो बोलत होता. पण त्या गोष्टी बरोबर होत्या. अर्जुन काय सांगत होता,ते वर्ण-संकर, जेव्हा स्त्रिया दूषित होतात, जनसंख्या वर्ण-संकर आहे,ते खरं आहे. जे काही अर्जुनाने श्रीकृष्णांना संगितले ते युद्ध टाळण्यासाठी होते, तर त्या गोष्टी बरोबर होत्या. पण अध्यात्मिक दृष्टीने… त्या गोष्टी बरोबर किंवा चुकीच्या असू शकतात. पण अध्यात्मिक दृष्टीने,त्या खूप गंभीर समजल्या जात नाहीत. म्हणून अशोच्यानन्वशोचस्त्वं. कारण त्याचा विलाप जीवनाच्या शारीरिक संकल्पनेवर होता. जीवनाच्या शारीरिक संकल्पनेची, श्रीकृष्णांनी सूचना दिली आहे अगदी सुरवातीला, त्याची निंदा केली आहे. अशोच्यानन्वशोचस्त्वं (भ गी २।११) "तू जीवनाच्या शारीरिक संकल्पनेसाठी विलाप करत आहेस. कारण जो कोणी जीवनाच्या शारीरिक संकल्पनेत आहे, तो जनावरांपेक्षाही चांगला नाही.