MR/Prabhupada 0268 - श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त बनल्याशिवाय कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही



Lecture on BG 2.10 -- London, August 16, 1973

तर हे खूप कठीण आहे. श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त बनल्याशिवाय कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. कारण श्रीकृष्ण सांगतात, भक्त्या मामभिजानाति यावान्यश्र्चास्मि तत्त्वतः (भगी १८।५५) तत्त्वतः,सत्यात. तत्त्वतः म्हणजे सत्य. जर एखाद्याला श्रीकृष्णांना जाणायचे असेल, तर त्याला भक्तीची प्रक्रिया स्वीकारावी लागेल,भक्त,भक्ती. ऋषीकेश ऋषीकेश सेवनं भक्तिर उच्यते. (चैच मध्य १९।१७०) जेव्हा एखाद्याला ऋषिकेशांच्या सेवेत गुंतवले जाते,इंद्रीयांचे स्वामी स्वामी, आणि ऋषीकेश, जेव्हा तुमची इंद्रिय सुद्धा इंद्रियांच्या स्वामींच्या सेवेत गुंतवली जातात. मग तुम्ही सुद्धा इंद्रियांचे स्वामी बनता. तुम्ही सुद्धा. कारण तुमची इंद्रिय ऋषिकेशांच्या सेवेत गुंतली आहेत,इंद्रियांना व्यस्त होण्याची इतर कुठलीही संधी नसते.बंद. स वै मनः कृष्णपदारविन्दयो (श्रीभ ९।४।१८) तर हि भक्तीच्या सेवेची प्रक्रिया आहे. जर तुम्हाला इंद्रियांचा स्वामी बनायची इच्छा असेल, गोस्वामी,स्वामी. मग तुम्ही नेहमी ऋषिकेशांच्या सेवेत तुमच्या इंद्रियांना गुंतवले पाहिजे. तो एकच मार्ग आहे. नाहीतर हे शक्य नाही. जसे तुम्ही तुमची इंद्रिये इंद्रियांच्या स्वामीच्या सेवेत गुंतवण्यात थोडे जरी निष्काळजी झालात. ताबडतोब माया आहे, कृपया,चल." हि पद्धत आहे. कृष्ण भुलिया जीव भोग वांछा करे, पाशते माया तारे जापतिया धारे. जेव्हा केव्हा तुम्हाला श्रीकृष्णांचा विसर पडतो,अगदी एका क्षणासाठी, ताबडतोब माया तिथे आहे. "माझ्या प्रिय मित्र, कृपया इथे ये." म्हणून आपण खूप सावध असले पाहिजे. एका क्षणासाठीही आपण श्रीकृष्णांना विसरु शकत नाही. म्हणून जपाचा कार्यक्रम,हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण,हरे हरे,हरे राम,हरे राम, राम राम… नेहमी श्रीकृष्णांची आठवण ठेवा. मग माया तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. माया स्पर्श करू शकत नाही.हरिदास ठाकुरांप्रमाणे. ते ऋषिकेशांच्या सेवेत गुंतले होते. माया पूर्ण शक्तीने आली. तरीही ती पराभूत झाली; हरिदास ठाकूर पराभूत झाले नाहीत.