MR/Prabhupada 0272 - भक्ती दिव्य आहे
Lecture on BG 2.7 -- London, August 7, 1973
तर हि कार्य आहेत. मूर्खपणाची कार्य. पण जेव्हा एखादा सत्वगुणात असतो,तो शांत असतो. तो समजू शकतो जीवनाचे मूल्य काय आहे,कसे जगले पाहिजे, जीवनाचा ध्येय काय आहे,जीवनाचे लक्ष्य काय आहे. जीवनाचे लक्ष्य ब्रह्मन समजणे आहे. ब्रम्ह जाणतीति ब्राह्मण: म्हणून चांगल्या गुणवत्तेचा अर्थ आहे ब्राम्हण. त्याचप्रमाणे, क्षत्रिय. तर ते आहेत गुण-कर्म विभागशः गुण. गुण ध्यानात घेतले पाहिजेत. म्हणून श्रीकृष्ण सांगतात: चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः (भ गी ४।१३) आपण काही प्रकारचे गुण स्वीकारले आहेत. हे खूप कठीण आहे. पण आपण ताबडतोब सर्व गुणांना पार करू शकतो. लगेच. कसे? भक्ती योगाच्या प्रक्रियेने. स गुणान्समतीत्यैतान्ब्रम्हभुयाय कल्पते (भ गी १४।२६)जर तुम्ही भक्ती योगाची पद्धत स्वीकारली,तर तुम्ही प्रभावित होणार नाही. या गुंणाच्या, सत्वगुण,रजोगुण,आणि तमोगुण. ते सुद्धा भगवद् गीतेत सांगितले आहे:मां च योsव्यभिचारेण भक्तीयोगेन सेवते. जोकोणी श्रीकृष्णांच्या भक्तीमय सेवेत गुंतला आहे, अव्यभिचारिणी, कशानेही विचलित न होता,कट्टर,,भक्तिपरायण, अशी व्यक्ती. मां च व्यभिचारिणी योगेन,मां च योsव्यभिचारेण योगेन भजते मां स गुणान्समतीत्यैतान (भ गी १४।२६) लगेच, तो सर्व गुणांच्या पार होतो. म्हणून भक्ती सेवा भौतिक गुणांच्या अधीन नाही. ती दिव्य आहे. भक्ती दिव्य आहे. म्हणून, तुम्ही श्रीकृष्ण किंवा भगवंतांना भक्ती शिवाय समजू शकत नाही. भक्त्या मामभिजानाति (भ गी १८।५५) । फक्त भक्त्या मामभिजानाति. नाहीतर ते शक्य नाही. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्र्चास्मि तत्वतः वास्तविकता,प्रत्यक्षात, जर तुम्हाला देव काय आहे हे जाणून घ्यायचे असल्यास, तर तुम्हाला हि भक्ती प्रक्रिया,भक्ती सेवा स्वीकारली पाहिजे. तरच तुम्ही पार करू शकाल. म्हणून, श्रीमद भागवतात नारद मुनी सांगतात की, त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर(श्री भ १।५।१७) जर कोणी, अगदी भावनेमध्ये व्यावसायिक कर्तव्यांचा त्याग केला त्याच्या गुणांनुसार… त्याला स्वधर्म म्हणतात… स्वधर्म म्हणजे एखाद्याला त्याच्या गुणवत्तेनुसार जे कर्तव्य त्याला प्राप्त झाले आहे. त्याला स्वधर्म म्हणतात. ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य,क्षुद्र,ते विभागले आहेत गुणकर्मविभागशः (भ गी ४।१३), गुण आणि कर्माने. तर इथे अर्जुन म्हणतो की कार्पण्यदोषोपहतस्वभावः (भ गी २।७) "मी क्षत्रिय आहे." तो समजतो की: मी चूक करत आहे,मी युद्धाला नकार देत आहे. म्हणून,ते कार्पण्यदोषो,कृपण." कंजूष म्हणजे मला खर्च करण्याची काही साधने आहेत,पण जर मी खर्च केला नाही तर त्याला कंजूष म्हणतात, कार्पण्यता, तर कार्पण्यता, इथे माणसांचे दोन वर्ग आहेत, ब्राम्हण आणि क्षुद्र. ब्राम्हण आणि क्षुद्र. ब्राम्हण म्हणजे तो कृपण नाही. त्याला संधी मिळाली आहे,या मानवी शरीराच्या रूपात उत्तम संपत्ती. अनेक लाखो डॉलर्स, हे मनुष्य… पण तो त्याचा वापर योग्य प्रकारे करत नाही. केवळ ते पहात आहे: "मी किती सुंदर आहे." एवढेच. केवळ आपली सुंदरता किंवा संपत्ती खर्च करा, मानव… तो ब्राम्हण आहे,उदारमतवादी.