MR/Prabhupada 0273 - आर्य-समानचा अर्थ आहे कृष्णभावनामृत व्यक्ती



Lecture on BG 2.7 -- London, August 7, 1973

तो ब्राम्हण आहे,जो उदारमतवादी आहे. आणि... एतद् विदित्वा प्रयाति स ब्रह्मणः, ज्याला माहित आहे… आणि... म्हणून प्रल्हाद महाराज सांगतात: दुर्लभं मानुषं जन्म अध्रुवमर्थदम् (श्री भ ७।६।१) ते आपल्या वर्गातील मित्रांमध्ये, प्रचार करीत होते. त्यांचा जन्म आसुरी कुटुंबात झाला होता,हिरण्यकश्यपू. आणि त्यांचे वर्ग मित्र,ते सुद्धा,त्याच श्रेणीतील. तर प्रल्हाद महाराज त्यांना सल्ला देतात: "माझ्या प्रिय बंधुनो,आपण कृष्ण भावनामृत स्वीकारले पाहिजे. तर इतर मुले, त्यांना कृष्ण भावनामृताबद्दल काय माहित आहे…? प्रल्हाद महाराज जन्मापासूनच मुक्त आहेत. तर ते म्हणाले: "कृष्ण भावनामृत म्हणजे काय?" त्यांना समजू शकत नाही. तर ते त्यांना समजावत होते: दुर्लभं मानुषं जन्म तदप्यध्रुवमर्थदम्. हे मानवी शरीर दुर्लभं आहे. लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहूसम्भवान्ते (श्री भ ११।९।२९)। मानवी शरीर हे भौतिक प्रकृतीद्वारे दिलेली एक मोठी सवलत आहे. लोक इतकी नीच आणि मूर्ख असतात. त्याना समजत नाही की या मानवी जीवनाचे मूल्य काय आहे. ते हे शरीर कुत्र्या आणि मांजरांप्रमाणे इंद्रिय तृप्ती करण्यात गुंतवतात. म्हणून शास्त्र सांगते: "नाही,हे मानवी शरीर डुक्कर आणि कुत्रांसारखे वाया घालवण्यासाठी नाही." नायं देहो देहभाजां नृलोके. प्रत्येकाला शरीर मिळाले आहे, भौतिक शरीर. पण नृलोके, मानवी समाजात,हे शरीर खराब होऊ देऊ नका. नायं देहो देहभाजां नृलोके कष्टान्कामानर्हते विड्भुजां ये (श्री भ ५।५।१) हे मानवी जीवन, केवळ रात्रंदिवस मेहनत करायची,इंद्रिय तृप्तीसाठी. हे डुक्कर आणि कुत्रांचे काम आहे. ते सुद्धा हीच गोष्ट करत आहेत, संपूर्ण दिवस आणि रात्र,मेहनत केवळ इंद्रिय तृप्तीसाठी. तर म्हणून मानवी समाजामध्ये विभाजन व्यवस्था असली पाहिजे. त्याला वर्णाश्रम धर्म म्हणतात. ती वैदिक संस्कृती आहे. त्याला खरेतर आर्य समाज म्हणतात. आर्य समाजाचा अर्थ बदमाश आणि मूर्ख बनणे आणि ईश्वराचे अस्तिव नाकारणे असा होत नाही. ते अनार्य आहे. जसे श्रीकृष्णांनी अर्जुनाला दटावले: अनार्यजुष्ट. "तू अनार्यांसारखे बोलत आहेस." एखादा जो कृष्ण भावनामृत नाही,तो अनार्य आहे. अनार्य. आर्य म्हणजे ज्याने कृष्णभावनामृत मध्ये प्रगती केली आहे तर खरोखरच आर्य-समान म्हणजे कृष्णभावनामृत व्यक्ती. नाहीतर,बनावट,बनावट आर्य-समान. कारण इथे भगवद् गीता सांगते,कृष्ण अर्जुनाला दटावताना. कारण तो युद्धाला नकार देतो,कारण त्याला त्याचे काय कर्तव्य आहे हे माहित नाही. परत अर्जुन इथे स्वीकार करतो कि कार्पण्य दोषोपहृत स्वभावः(भ गी २।७) "हो, मी आर्य आहे. मी अनार्य बनलो आहे. कारण मी माझ्या कर्तव्य विसरलो आहे." तर प्रत्यक्षात आर्य-समाज म्हणजे कृष्णभावनामृत समाज, आंतराष्ट्रीय सोसायटी कृष्ण… ती आर्य आहे. बनावट नाही. तर इथे,अर्जुन समजावत आहे,स्वतःला त्या स्थितीत मांडून: "हो, कार्पण्यदोषो. कारण मी माझे कर्तव्य विसरत आहे.म्हणून उपहत स्वभावः, मी माझ्या नैसर्गिक प्रवृतींमध्ये गोंधळलो आहे. क्षत्रिय नेहमी सक्रिय असावा. जेंव्हा युद्ध असते,जेंव्हा लढत असते,ते खूप उत्साही असले पाहिजेत. एखाद्या क्षत्रियाला दुसऱ्या क्षत्रियाने सांगितले:"मला तुझ्याशी लढायचे आहे." तर तो,नाकारू शकत नाही. "हो,चल ये. लढ.घे तालावर." ताबडतोब: "चल." तो क्षत्रिय आहे. आता तो लढायला नकार देत आहे. म्हणून तो समजू शकेल… तू या बाजूला उभा राहू शकतोस,समोर नाही. तो स्वतःचे कर्तव्य विसरत आहे,क्षत्रिय कर्तव्य. म्हणून, तो मान्य करतो: हो, कार्पण्यदोष. कार्पण्य दोषोपहृत स्वभावः (भ गी २।७) । "माझे नैसर्गिक कर्तव्य मी विसरत आहे. म्हणून मी कृपण बनलो आहे. म्हणून मी…" जेव्हा तुम्ही कृपण बनता, ती आजारी अवस्था आहे. मग तुमचे कर्तव्य काय आहे? मग तुम्ही अशा व्यक्तीकडे जा जो… ज्याप्रमाणे तुम्ही आजारी पडत,तुम्ही वैद्याकडे जात आणि त्याला विचारता "मी काय करू? मी या आजारामुळे ग्रस्त आहे."हे तुमचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे,जेव्हा आपण आपल्या कर्तव्याबाबत गोंधळलेलो असतो, किंवा आपण आपले कर्तव्य विसरतो. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडे जाणे आणि त्याला काय करू म्हणून विचारणे हे खूप चांगले आहे. तर श्रीकृष्णांपेक्षा वरिष्ठ व्यक्ती कोण असू शकेल? म्हणून अर्जुन म्हणतो: पृच्छामि त्वाम,"मी तुम्हाला विचारत आहे. कारण हे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या कर्तव्यात कमी पडत आहे,चुकीचा. तर हे चांगले नाही.तर मला कोणाकडेतरी विचारणा केली पाहिजे जे माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. ते कर्तव्य आहे.तद विज्ञानार्थं स गुरुं एव अभिगच्छेत (मु.उ.१.२.१२). हे वैदिक कर्तव्य आहे. प्रत्येकजण गोंधळलेला आहे. प्रत्येकजण या भौतिक जगात दुःखी आहे,गोंधळलेला आहे. पण तो अध्यात्मिक गुरुंना शोधत नाही. तो कर्पण्यदोष आहे. तो कार्पण्यदोष आहे. इथे अर्जुन कार्पण्यदोषातून बाहेर येत आहे.कसा? आता तो श्रीकृष्णांना विचारत आहे. पृच्छामी त्वाम. "माझ्या प्रिय कृष्णा, तुम्ही सर्वात वरिष्ठ व्यक्ती आहात. ते मला माहित आहे. तुम्ही श्रीकृष्ण आहात. तर मी गोंधळलेलो आहे. प्रत्यक्षात,मी माझे कर्तव्य विसरलो आहे. म्हणून,मी विचारत आहे."