MR/Prabhupada 0279 - वास्तविक आपण पैशाची सेवा करत आहोत



Lecture on BG 7.2 -- San Francisco, September 11, 1968

आता इथे, या अध्यायात,स्पष्ट केले आहे, की कोण सर्वोच्च पूजनीय आहे. आपण आपल्या क्षमतेनुसार पूजन करत आहोत,आपण कोणाचीतरी पूजा करत आहोत. किमान आपण आपल्या मालकाची सेवा करत आहोत. समजा मी एका कार्यालयात किंवा कारखान्यात काम करतो, मला मालकाची सेवा करावी लागते, मला त्याच्या आज्ञा पाळणे आवश्यक आहे. तर प्रत्येकजण पूजन करत आहे. आता, कोण सर्वोच्च पूजनीय आहे, कृष्ण, कसा तो सर्वोच्च पूजनीय आहे,हे या अध्यायात स्पष्ट केले आहे. य स्वरूपं सर्व करम च यच च धियाम तद उभय-विषयकं ज्ञानं व्यक्तुम अत्र भक्ती-प्रतिज्ञाम. म्हणून जर आपण समजलो की इथे सर्वोच्च नियंत्रक,सर्वोच्च पूजनीय आहे. तर आपल्या जीवनातील समस्या सोडवता येते. आपण शोधात आहोत… एक दिवस,मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती,की मुहम्मद भक्त,त्याला सर्वात महान व्यक्तीची सेवा करायची होती. तो नवाबाची सेवा करत होता, मग तो सम्राट,बादशहाकडे गेला, नंतर सम्राटाकडून एक संत व्यक्ती,हरिदासकडे, आणि हरिदासांकडून वृंदावनातील कृष्णाची पूजा करायला गेला. म्हणून आम्ही जिज्ञासू आणि बुद्धिमान असायला हवे. आपण सेवा करतो. आपण प्रत्येकजण सेवा करतो, निदान आपण आपल्या इंद्रियांची सेवा करतो. प्रत्येकजण,प्रत्यक्षात, कोणत्याही मालकाची किंवा कोणत्याही गुरुची सेवा करत नाहीत,ते त्याच्या इंद्रियांची सेवा करतात. समजा,मी माझ्या मालकाच्या रूपात एखाद्याची सेवा करत आहे, प्रत्यक्षात मी त्या व्यक्तीची सेवा करत नाही,मी त्याच्या पैशाची सेवा करतो. जर तो म्हणाला,"उद्या तुला मोफत काम करावे लागेल. आता तुला वीस डॉलर मिळतात. उद्या माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत.तुला मोफत काम करावे लागेल. "नाही,नाही मालक. मी येणार नाही कारण मी तुमची सेवा करत नाही; मी तुमच्या पैशाची सेवा करतो." तर प्रत्यक्षात आपण पैशाची सेवा करतो. आणि आपण का पैशाची सेवा करतो? कारण पैशाने आपण आपल्या इंद्रियांना तृप्त करू शकतो. पैशाशिवाय,आपण या इन्द्रियांचे समाधान करू शकत नाही. जर मला प्यावयाचे असेल,जर मला एखाद्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल,तर मला पैशाची गरज आहे. म्हणून अखेरीस मी माझ्या इंद्रियांची सेवा करतो. म्हणून श्रीकृष्णांना गोविंद म्हणतात. आपल्याला अखेरीस आपल्या इंद्रियांना तृप्त करायचे आहे, आणि गो म्हणजे इंद्रिय. इथे सर्वोच्च व्यक्ती,भगवान आहे, जर तुम्ही श्रीकृष्णांची सेवा केलीत,तर तुमची इंद्रिये तृप्त होतील. म्हणून त्यांचे नाव गोविंद आहे. वास्तविक आपण आपल्या इंद्रियांची सेवा करू इच्छितो, पण वास्तविक इंद्रिय,दिव्य इंद्रिय श्रीकृष्णांची,गोविंदाची आहेत. म्हणून भक्ती, सेवा,म्हणजे इंद्रियांना शुद्ध करणे. सर्वोच्च पवित्रच्या सेवेत राहणे. परमेश्वर परमपवित्र आहे. भगवद् गीतेच्या दहाव्या अध्यायात तुम्हाला सापडेल की अर्जुनाने श्रीकृष्णांचे वर्णन केले आहे. पवित्रं परमं भवान: "तुम्ही परम पवित्र आहात." म्हणून जर आपल्याला परम पवित्रच्या इंद्रियांची सेवा करायची असेल, तर आपणही शुद्ध बनले पाहिजे. कारण त्याशिवाय… शुद्ध बनणे म्हणजे अध्यात्मिक. अध्यात्मिक जीवन म्हणजे शुद्ध जीवन, आणि भौतिक जीवन म्हणजे दूषित जीवन. ज्याप्रमाणे आपल्याला हे भौतिक शरीर मिळाले आहे, हे अशुद्ध शरीर आहे. म्हणून आपण रोग ग्रस्त होतो, वृद्ध होतो. आपण जन्म घेतो, आपला मृत्यू होतो. आणि आपल्या वास्तविक शुद्ध स्वरूपात, तिथे अशी दुःख नाहीत. तिथे जन्म,मृत्यू,जरा, व्याधी नाहीत. भगवद् गीतेत तुम्ही वाचले असेल, नित्यः शाश्वतो यं न हन्यते हन्यमाने शरीरे (भ गी २।२०) नित्य जरी मी सर्वात जुना असलो, कारण मी माझे शरीर बदलत आहे… मी, आत्मा,शुद्ध आहे. मला जन्म नाही, मला मृत्यू नाही, पण मी फक्त शरीर बदलत आहे. म्हणून मी सर्वात जुना आहे. जरी मी सर्वात वृद्धअसलो तरी, माझे शरीर तरुण आहे. मी नेहमी तरुण असतो. हे माझे स्थान आहे.