MR/Prabhupada 0280 - भक्तिमय सेवा म्हणजे इंद्रियांना शुद्ध करणे



Lecture on BG 7.2 -- San Francisco, September 11, 1968

तर कृष्णभावनामृत,किंवा भक्तिमय सेवा,म्हणजे इंद्रियांचे शुद्धीकरण. एवढेच. आपल्याला संपवायचे नाही,विषयासक्त क्रियाकल्पातून बाहेर यायचे आहे. नाही. आपल्याला फक्त इंद्रियांना शुद्ध करायचे आहे. कसे इंद्रियांमधून तुम्ही बाहेर पडू शकता? करणं तुम्ही जीव आहात,इंद्रिय आहेत. पण गोष्ट अशी आहे की सध्याच्या क्षणी,कारण भौतिकदृष्ट्या आपण दूषित आहोत. आपल्या इंद्रियांना पूर्ण समाधान मिळत नाही. हे सर्वात शास्त्रोक्त आहे. तर भक्तिमय सेवा म्हणजे इंद्रियांना शुद्ध करणे. सर्वोपाधि-विनिर्मुक्तं तत् परत्वेन निर्मलम (चै च मध्य १९।१७०) निर्मलम म्हणजे शुद्धी. तुम्ही तुमच्या इंद्रियांना कसे शुद्ध करू शकता? ते नारद-भक्ती-सूत्रामध्ये स्पष्ट केले आहे. असं म्हटलं जात की सर्वोपाधि विनिर्मुक्तम. इंद्रियांची शुद्धी म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या हुद्द्यांपासून मुक्त असले पाहिजे. आपले जीवन पूर्ण पदनामित आहे. ज्याप्रमाणे मी विचार करतो "मी भारतीय आहे," मी विचार करतो "मी संन्यासी आहे," तुम्ही विचार करता तुम्ही अमेरिकन आहात, तुम्ही विचार करता "पुरुष," तुम्ही विचार करता "स्त्री," तुम्ही विचार करता "गोरा," तुम्ही विचार करता "काळा," अशी अनेक पदनाम आहेत. हि सर्व पदनाम आहेत. तर इंद्रियांचे शुद्धीकरण म्हणजे पद शुद्ध करणे. आणि कृष्णभवनामृतचा अर्थ असा की "मी भारतीय नाही,युरोपियन नाही किंवा अमेरिकनही नाही हे पण नाही आणि ते पण नाही. मी सदा सर्वकाळ श्रीकृष्णांशी संबंधित आहे. मी श्रीकृष्णांचा अंश आहे. जेव्हा आपली पूर्ण खात्री पटते की "मी श्रीकृष्णांचा अंश आहे." ते कृष्णभावनामृत आणि तुमच्या इंद्रियांचे शुद्धीकरण आहे. तर श्रीकृष्णांचे अंश म्हणून आपल्याला श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे. तो आपला आनंद आहे. आता आपण आपली इंद्रिय,भौतिक इंद्रिय तृप्त करत आहोत. जेव्हा तुम्ही बनता…,स्वतः अनुभवता की तुम्ही श्रीकृष्णांचे अंश आहात. मग तुम्ही श्रीकृष्ण,गोविंदांची इंद्रिय तृप्त कराल. आणि त्याची इंद्रिय संतुष्ट करून,तुमची इंद्रिय संतुष्ट होतील. अपक्व उदाहरणाप्रमाणे - हे अध्यात्मिक नाही - ज्याप्रमाणे पतीला उपभोक्ता समजले जाते, आणि पत्नीला उपभोग्य समजले जाते. पण जर पत्नीने पतीच्या इंद्रियांना संतुष्ट केले,तर तिची सुद्धा इंद्रिय संतुष्ट होतात. त्याचप्रमाणे, जसे तुमच्या शरीराला खाज येत असेल, आणि तुमच्या शरीराचा भाग,बोट,शरीराच्या त्या भागावर खाजवले, बोटांना सुद्धा समाधान जाणवते. असं नाही की फक्त शरीराचा विशिष्ट भाग समाधान अनुभवतो. पण संपूर्ण शरीर समाधान अनुभवते. त्याचप्रमाणे, श्रीकृष्ण पूर्ण म्हणून,जेव्हा तुम्ही श्रीकृष्ण,गोविंदांची इंद्रिय संतुष्ट करता, तेव्हा पूर्ण विश्वाचे समाधान होते. हे शास्त्र आहे. तस्मिन तुष्टे जगत तुष्टे. दुसरे उदाहरण ज्याप्रमाणे जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरातील पोटाला तृप्त करता, तेव्हा संपूर्ण शरीर तृप्त होते. अन्नपदार्थ पचल्यावर पोट अशी शक्ती निर्माण करते. ते रक्तामध्ये परिवर्तित होत,ते हृदयात येईल,आणि हृदयातून ते संपूर्ण शरीरात पसरेल, आणि संपूर्ण शरीराला आलेली मरगळ नाहीशी होईल. त्याचे समाधान होईल. तर हि कृष्णभावनामृताची प्रक्रिया आहे. हे कृष्णभावनामृताचे शास्त्र आहे, आणि श्रीकृष्ण व्यक्तिशः हे स्पष्ट करतात. तर यज्ञत्वा, जर आपण कृष्णभावनामृताचे शास्त्र समजलो,तर काहीच अज्ञान राहणार नाही. सर्वकाही ज्ञात होईल. हि एक चांगली गोष्ट आहे.