MR/Prabhupada 0285 - एकमेव प्रेम करण्याजोगी गोष्ट श्रीकृष्ण आणि त्यांची वृंदावन भूमी आहे



Lecture -- Seattle, September 30, 1968

तर श्रीकृष्ण गुरांना चरायला कुरणात आणि गोपी, घरी जायचे… त्या मुली किंवा बायका होत्या. त्या… बायकांना किंवा मुलींना काम करायची परवानगी नव्हती. हि वैदिक प्रणाली आहे. त्याना घरी राहिले पाहिजे, आणि त्याना वडील, पती, किंवा वयस्कर मुले यांनी संरक्षण दिले पाहिजे. त्या बाहेर पडण्यासाठी नसतात. त्यामुळे त्या स्वतः घरीच रहात. पण श्रीकृष्ण होते, समजा, मैलो दूर कुरणामध्ये, आणि घरी गोपी विचार करत, ओह कृष्णाची पावले फार मऊ आहेत. आता तो खडबडीत मैदानावर चालत आहे. छोटे दगड त्याच्या पायाला टोचतील तर त्यांना वेदना जाणवत असतील." अशाप्रकारे विचार करत,त्या रडत असत.जरा बघा. श्रीकृष्ण मैलो दूर आहेत, आणि श्रीकृष्ण काय अनुभवतात, त्या केवळ याच्या बद्दल विचार करत. "श्रीकृष्ण असे अनुभवत असतील की. हे प्रेम आहे. हे प्रेम आहे. त्या कृष्णांना सांगत नाहीत, माझ्या प्रिय कृष्णा तुम्ही माझ्यासाठी गवताच्या मैदानातून काय आणले? तुमचा खिसा कसा आहे? जरा मला बघू दे." नाही. केवळ श्रीकृष्णांबद्दल विचार करत, श्रीकृष्ण कसे संतुष्ट होतील. त्या स्वतःला तयार करत कारण… आणि श्रीकृष्णांसमोर छान कपडे घालून जात, "ओह, ते बघून खुश होतील." साधारणपणे, एक मुलगा किंवा मनुष्य त्याचा प्रियकर किंवा पत्नी चांगले कपडे घातलेले पाहून खुश होतो. ते आहे, म्हणून, चांगले कपडे घालणे बायकांचा स्वभाव आहे. आणि वैदिक प्रणालीनुसार, स्त्रीने तिच्या पतीला संतुष्ट करण्यासाठी चांगले कपडे परिधान केले पाहिजेत. ती वैदिक प्रणाली आहे. जर तिचा नवरा घरात नसेल, तर तिने चांगले कपडे घालून नटू नये. काही नियम आहेत. प्रोषित भर्त्रिका वेगवेगळे स्त्रियांचे पोशाख आहेत. पोशाख बघून एखाद्याला समजेल ती काय आहे. एखाद्याला ती अविवाहित मुलगी आहे हे पोशाख बघून समजेल. एखाद्याला केवळ पोशाख बघून समजेल ती विवाहित आहे. एखादा पोशाख बघून समजेल की ती विधवा आहे. एखादा पोशाख बघून समजेल की ती वेश्या आहे. तर पोशाख महत्वाचा आहे. तर प्रोषित भर्त्रिका. म्हणून आम्ही सामाजिक विषयाबद्दल चर्चा करणार नाही. आम्ही श्रीकृष्णांच्या प्रेम संबंधाबद्दल चर्चा करत आहोत. तर गोपी… कृष्ण आणि गोपी, नाते इतके घनिष्ट आणि शुद्ध होते. की श्रीकृष्णांनी स्वतः स्वीकार केले, माझ्या प्रिय गोपींनो, तुमच्या प्रेमाची परतफेड करण्याची माझी ताकद नाही. श्रीकृष्ण पूर्णपुरुषोत्तम भगवान आहेत. ते दिवाळखोर झाले, की माझ्या प्रिय गोपींनो, हे माझ्यासाठी शक्य नाही. तुमच्या प्रेमाचे ऋण फेडणे, जे तुम्ही माझ्यावर प्रेम करून निर्माण केले आहे. तर हि प्रेमाची सर्वाधिक परिपूर्णता आहे. रम्या काचिद उपासना व्रजवधू. मी फक्त चैतन्य महाप्रभूंच्या मिशनचे वर्णन करत आहे. ते आपल्याला सूचना देत आहेत, त्यांचे कार्य, कृष्ण आणि त्यांचे वृन्दावन ती फक्त प्रेमळ गोष्ट आहे. आणि त्यांच्यावर प्रेम करण्याच्या प्रक्रियेचे ज्वलंत उदाहरण गोपी आहेत, कोणीही पोहोचू शकत नाही. भक्तांचे वेगवेगळे स्तर आहेत, आणि असं मानलं जात की गोपी उच्च स्थानी आहेत. आणि गोपींमध्ये सर्वोच्च राधाराणी आहे. म्हणून कोणीही राधाराणीच्या प्रेमाला पार करू शकत नाही. रम्या काचिद उपासना व्रजवधू वर्गेन या कल्पिता श्रीमद-भागवतं अमलं पुराणं. आता देवावर प्रेम करायचे हे शास्त्र शिकण्यासाठी, काही पुस्तके असली पाहिजेत, काही अधिकृत साहित्य,होय. चैतन्य महाप्रभु सांगतात, श्रीमद भागवतम् अमल पुराणं. श्रीमद भागवतं, निष्कलंक वर्णन आहे हे समजण्यासाठी की देवावर कसे प्रेम करायचे. दुसरे कोणतेही वर्णन नाही. सुरवातीपासून ते देवावर कसे प्रेम करायचे शिकवत आहे. ज्यांनी श्रीमद भागवताचा अभ्यास केला आहे, पहिल्या सर्गातील पहिला श्लोक आहे जन्माद्यस्य यत:, सत्यं परं धीमहि (श्रीभ १।१।१) सुरवात अशी आहे की "सर्वोच्चला माझी शुद्ध भक्ती प्रस्तुत करत आहे, ज्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले आहे." जन्माद्यस्य यत:. तर हे आहे,तुम्हाला माहित आहे हे एक महान वर्णन आहे. पण,श्रीमद भागवतं… जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल कसे देवावर,किंवा श्रीकृष्णांवर प्रेम करायचे,मग श्रीमद भागवताचा अभ्यास करा. आणि श्रीमद भागवत समजण्यासाठी,प्रार्थमिक अभ्यास भगवद गीतेचा आहे. तर भगवद गीतेचा अभ्यास करा,वास्तविक प्रकृती समजण्यासाठी किंवा ईश्वर आणि तुम्ही स्वतः आणि तुमचे संबंध जाणण्यासाठी, आणि मग जेव्हा तुम्ही चांगले परिचित होता,जेव्हा तुम्ही तयार होता, की "होय, श्रीकृष्ण एकमेव प्रेम करण्याजोगी व्यक्ती आहे. मग पुढचे पुस्तक तुम्ही घ्या, श्रीमद भागवतं.आणि पुढे जात रहा. ज्याप्रमाणे भगवद गीता जशी आहे तशी, प्रवेशद्वार आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थी, ते शालेय परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात प्रवेश करतात. तर कसे देवावर प्रेम करायचे, भगवद गीता जशी आहे तशी चा अभ्यास करून तुम्ही तुमची शालेय परीक्षा उत्तीर्ण व्हा, मग श्रीमद भगवताचा अभ्यास करा,आणि… तो पदवी अभ्यासक्रम आहे, आणि जेव्हा तुम्ही प्रगती करता, पदव्युत्तर, मग भगवान चैतन्यांच्या शिकवणीचा अभ्यास करा.