MR/Prabhupada 0286 - तुम्ही आणि श्रीकृष्णांमधील शुद्ध प्रेमाचे हे विकृत प्रतिबिंब आहे
Lecture -- Seattle, September 30, 1968
इथे काही अडचण नाही. खरे म्हणजे आपण कसे श्रीकृष्णांवर प्रेम करायचे हे शिकले पाहिजे. तर दिशा आहे आणि पद्धतही आहे. आणि शक्य तितकी आपली सेवा करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही आमची मुले तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी रस्त्यावर आणि गावात पाठवत आहोत. आणि जर तुम्ही संधी स्वीकारलीत,तर आपले आयुष्य यशस्वी होईल. प्रेमा पुमार्थो महान. कारण हे मनुष्य जीवन देवावरील प्रेम विकसित करण्यासाठी आहे. कारण इतर सर्व जीवनात, आपण प्रेम केले आहे, आपण प्रेम केले आहे. आपण आपल्या मुलांवर प्रेम केले, आपण आपल्या पत्नीवर प्रेम केले,आपण पक्षी जीवनात आपल्या घरट्यावर प्रेम केले, पशु जीवनात. प्रेम आहेच. पण ते आपल्या मुलांवर प्रेम कसे करावे हे पक्षी किंवा पशूंना शिकवण्याची आवश्यकता नाही. त्याची आवश्यकता नाही,कारण ते नैसर्गिक आहे. आपल्या घरावर प्रेम करणे,आपल्या देशावर प्रेम करणे, आपल्या पतीवर प्रेम करणे, आपल्या मुलांवर प्रेम करणे, आपल्या पत्नीवर प्रेम करणे,आणि असेच,इतर, हे सर्व प्रेम, जास्त किंवा कमी ते सर्व प्राणिमात्रांमध्ये आहेत. पण त्या प्रकारचे प्रेम आपल्याला आनंद देणार नाही. तुम्ही निराश व्हाल कारण हे शरीर तात्पुरते आहे. म्हणून हे सर्व प्रेमळ व्यवहार तात्पुरते आहेत आणि ते शुद्ध नाहीत. तुम्ही आणि श्रीकृष्णांच्या मधील शुद्ध प्रेमाचे, हे केवळ विकृत प्रतिबिंब आहे, म्हणून खरोखरच जर आपल्याला शांतता हवी असेल, जर तुम्हाला समाधान हवे असेल, जर तुम्हाला गोंधळून जायचे नसेल,तर श्रीकृष्णांवर प्रेम करायचा प्रयत्न करा. हा साधा कार्यक्रम आहे. मग तुमचे जीवन यशस्वी होईल. हि कृष्णभावनामृत चळवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी किंवा लोकांना फसवण्यासाठी तयार केलेली नाही. हि सर्वात अधिकृत चळवळ आहे. वैदिक साहित्य,भगवद गीता, श्रीमद भागवतं, वेदांत सूत्र, पुराण, आणि अनेक संत लोकांनी हि साहित्य स्वीकारली आहेत. आणि याचे ठळक उदाहरण चैतन्य महाप्रभु आहेत. तुम्ही त्यांचे चित्र पहा, ते नृत्य करत आहेत. तर आपण हि कला शिकली पाहिजे,मग आपले जीवन यशस्वी होईल. कृत्रिम आणि काल्पनिक गोष्टींचा अभ्यास करून आणि मेंदूला त्रास देऊन तुम्हाला काही मिळत नाही आणि... इतरांवर प्रेम करण्याचा आपला उपजत स्वभाव आहे. हे स्वाभाविक, नैसर्गिक आहे, फक्त आपण चुकीच्या ठिकाणी प्रेम करत आहोत आणि त्यामुळे आपण निराश आहोत. निराश. गोंधळलेले. म्हणून जर तुमचा गोंधळ व्हायला नको असेल, जर आपण निराश होऊ इच्छित नसाल, तर श्रीकृष्णांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही स्वतः जाणू शकाल की कशी तुम्ही शांततेने, आनंदाने प्रगती करत आहात. तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टींमध्ये. धन्यवाद.