MR/Prabhupada 0289 - जे कोणी भगवद् धामातून येतात - ते सर्व सारखे असतात



Lecture -- Seattle, September 30, 1968

प्रभुपाद: होय? स्त्री: राम आणि जिझस समानार्थी आहे का? भक्त:"राम आणि जिझस समानार्थी आहे का? प्रभुपाद: समानार्थी…, समानार्थी नाही,पण एकसारखे आहेत. समानार्थी शब्द म्हणता येणार नाही. स्त्री: असं, एकसारखे. प्रभुपाद: होय. परिपूर्ण स्तरावर सर्वकाही समान आहे. तुलनात्मक जगात सुद्धा. तुम्ही घेतलेल्या कुठल्याही, ती भौतिक आहे. म्हणून भौतिक ओळख. त्याचप्रमाणे, अध्यात्मिक जगात सर्व गोष्टी अध्यात्मिक आहे. म्हणून अध्यात्मिक जगात भगवंत आणि भगवंतांचा मुलगा किंवा भगवंतांचा मित्र किंवा भगवंतांचा प्रेमी,कोणीही, आहे… ते एकाच स्तरावर आहेत, अध्यात्मिक. म्हणून ते एकसारखे आहेत. स्त्री: पण असं नाही का रामाचा उल्लेख एक मनुष्य म्हणून जन्माला आला होता… मी नाही… भारतात किंवा कुठेतरी, आणि ख्रिस्ताचा जन्म यूरोपमध्ये झाला होता? दोन वेगळे पुरुष, पण तरीही समान,सारखे… प्रभुपाद: होय. भारतात रोज सूर्य उगवतो, यूरोपमध्ये उगवतो,अमेरिकेमध्ये उगवतो. त्याचा अर्थ असा होतो का की तो भारतीय किंवा अमेरिकन किंवा चायनीज आहे? स्त्री: नाही, मला असे म्हणायचे नव्हते. प्रभुपाद: मग? म्हणून ते असेच आहे. जेव्हा… हे आपले मर्यादित ज्ञान आहे. आपल्याला अशाप्रकारे शिकवले आहे, की देव महान आहे. ज्याप्रमाणे सूर्य महान आहे; म्हणून भारतामध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा चायनामध्ये सूर्य दिसतो. कुठूनही, जगातील कोणत्याही भागातून, विश्वातील कोणत्याही भागातून, सूर्य एक आहे. कोणीही असे म्हणू शकत नाही, "अरे, हा अमेरिकन सूर्य आहे" किंवा हा भारतीय सूर्य आहे." म्हणून एकतर जिझस ख्रिस्त किंवा राम किंवा कृष्ण, जे कोणी भगवद् धामातून येतात, ते समान आहेत. त्यांच्यात काही फरक नाही. पण फरक इतकाच आहे, ज्याप्रमाणे आपल्या देशात सूर्याचे तापमान कमी आहे. आणि उष्णकटिबंधीय देशात सूर्याचे तापमान जास्त आहे याचा अर्थ असा आहे का की सूर्याचे तापमान बदलले आहे? ते स्विकारण्यानुसार आहे. या देशाचे वातावरण इतके वाढले आहे की आपल्याला योग्य रीतीने सूर्य प्रकाश मिळू शकत नाही. पण सूर्यप्रकाश सगळीकडे सारखाच प्रकाश वाटतो. त्याचप्रमाणे, देशानुसार, परिस्थितीनुसार, ग्रहानुसार, देव वेगळ्याप्रकारे प्रकट झाला आहे. परंतु तो वेगळा नाही. तुम्ही तुमच्या शरीराला काही हिवाळी वस्त्रांनी आच्छादित केले आहे. त्याच वेळी भारतातून तार, ओ, ते पंखे चालवत आहेत. तापमान वेगळे का आहे? म्हणून जे काही प्रभू ख्रिस्त सांगेल, किंवा जे काही श्रीकृष्ण सांगतील, किंवा राम काय सांगतील, ठिकाणच्या बाबतीत, परिस्थिती,वातावरण,व्यक्ती,श्रोत्यांच्या बाबतीत भिन्न आहे. जी गोष्ट मी मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करतो, तीच गोष्ट त्याच्या वडिलांना शिकवणे शक्य नाही. किंवा लहान मुलाला लैगिक जीवन म्हणजे काय समजणार नाही, पण एक तरुण व्यक्ती समजू शकेल. त्याच मुलाला जेव्हा तो मोठा होईल तेव्हा कळेल. म्हणून तुम्ही असा विचार करू नका की प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट समजू शकेल. तर विशिष्ट परिस्थितीत बायबल सांगितले आहे; विशिष्ट परिस्थितीत भगवद् गीता सांगितली आहे. परिस्थितीमध्ये फरक आहे. नाहीतर तत्व समान आहे. बायबलमध्ये सुद्धा असे सांगितले आहे, "देवावर प्रेम करा," आणि भगवद् गीता सांगते, "देवावर प्रेम करा." त्यात काही फरक नाही.