MR/Prabhupada 0290 - आपले लालसा पूर्ण नाही, तेव्हा तू रागावतोस



Lecture -- Seattle, September 30, 1968

उपेन्द्र: प्रभुपाद, रागाचे स्वरुप काय आहे? राग कसा असतो...

प्रभुपाद: राग म्हणजे तीव्र वासना. जेव्हा तुम्ही वासनामय असता आणि तुमची वासना पुर्ति होत नाही, तुम्ही रागिट बनता. आणि काय. ते वासनेचे आणखी एक वैशिष्ट आहे. काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः जेव्हा तुम्ही रजो गुणाने भरपूर प्रभावित असता, तुम्ही रागिट बनता. आणि जेव्हा तुमची वासना पुर्ति होत नाही, तेव्हा तुम्ही संतप्त होता, पुढचा टप्पा. आणि पुढचा टप्पा हा आहे की तुम्ही गोंधळता. आणि पुढचा टप्पा आहे प्रणश्यति, तुम्ही हरवून जाता. त्यामुळे प्रत्येकाला ह्या वासना व रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. हे नियंत्रण म्हणजे तुम्हाला स्वतःला सत्व गूणामध्ये प्रस्थापित केले पाहिजे, रजो गुणामध्ये नाही. भौतिक प्रकृतीचे तीन गुण आहेत : तम गुण, रजो गुण, सत्व गुण. त्यामुळे जर कोणाला दैविक शास्त्राची माहिती करून घ्यावयाची असेल, तर त्याला सत्व गुणामध्ये स्वतःला प्रस्थापित केले पाहिजे. अन्यथा शक्य नाही. त्यामुळे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो की "आपण हे करू नका, आपण हे करू नका, आपण हे करू नका, आपण हे करू नका," कारण त्याला स्वतःला सत्व गुणामध्ये प्रस्थापित केले पाहिजे. नाहीतर तो समजण्यास सक्षम होणार नाही. कृष्ण भावना ही तम आणि रजो गुणांच्या व्यासपीठावर समजले जाऊ शकत नाही. हे संपूर्ण जग तम आणि रजो गुणांनी प्रभावित आहे. पण ही पद्धत इतकी सोपी आहे की जर तुम्ही चार निर्बंधाचे पालन केले आणि हरे कृष्ण हा जप केला, तुम्ही ताबडतोब भौतिक प्रकृतीच्या सगळ्या गुणांच्या वरचढ होता. तर राग हा रजो गुणाच्या व्यासपीठावर असतो.