MR/Prabhupada 0303 - अलौकिक. तू याही पलीकडे आहेस



Lecture -- Seattle, October 2, 1968

प्रभुपाद : पुढे...

तमाल कृष्ण : "तुझी ही स्वाभाविक अवस्था आहे की तू अलौकिक आहेस."

प्रभुपाद : अलौकिक. "तू याहून पलीकडे आहेस." हे भगवद्गीतेत स्पष्ट केले आहे.

इन्द्रियाणि पराण्याहु-
रिन्द्रियेभ्यः परं मनः |
मनसस्तु परा बुद्धि-
र्यो बुद्धेः परतस्तु सः ||
(भ. गी. ३.४२)

आता... सर्वप्रथम या शरीराला जाणून घ्या . शरीर म्हणजे इंद्रिये. पण जेव्हा तुम्ही याही पलीकडे जातात, तेव्हा आपण पाहतो की मन या सर्व इंद्रियांच्या कृत्यांच्या केंद्रस्थानी आहे. जोपर्यंत मन सुस्थितीत नसेल, आपण आपल्या इंद्रियांनी कार्ये करू शकत नाही. म्हणून, इंद्रियेभ्यः परं मनः. म्हणून इंद्रियांपलीकडे मन आहे, आणि मनाच्याही पलीकडे आहे बुद्धी, आणि बुद्धीच्याही पलीकडे आहे आत्मा. हे आपण जाणून घ्यायला हवे. पुढे...

तमाल कृष्ण : "कृष्णाची श्रेष्ठ शक्ती ही स्वभावाने दिव्य आहे, आणि बाह्य शक्ती भौतिक आहे. तू भौतिक व अध्यात्मिक शक्तीच्या पलीकडे आहेस, म्हणून तुझी अवस्था तटस्थ आहे. दुसऱ्या शब्दांत, तू कृष्णांच्या तटस्था शक्तीशी संबंधित आहेस. तू एकच वेळी कृष्णांशी एक व त्यांच्यापासून वेगळा आहेस. तू दिव्य आहेस, म्हणूनच तू कृष्णांपासून अभिन्न आहेस. परंतु त्याचवेळी तू त्यांच्याहून भिन्नही आहेस, कारण तू त्यांचा केवळ सूक्ष्म अंश आहेस."

प्रभुपाद : आता येथे एक शब्द वापरला आहे, तटस्था शक्ती. तटस्था शक्ती, हा योग्य संस्कृत शब्दप्रयोग आहे. ज्याप्रमाणे जमिनीच्या अंतिम टोकावर समुद्र सुरु होतो. तेथे कडेची सीमांत भूमी असते. जसे तुम्ही पॅसिफिक समुद्रकिनाऱ्यावर जाणार, तुम्हाला जमीन दिसेल. काहीवेळी ती भूमी पाण्याने व्याप्त असते व काही वेळा ती मोकळी असते. याला म्हणतात तटस्थ. त्याचप्रमाणे, आपण जीवात्मा, जरी गुणात्मक दृष्टीने भगवंताशी एकसारखे असलो, पण काहीवेळा आपण मायेने बद्ध असतो व काहीवेळा मुक्त असतो. त्यामुळे आपली स्थिती तटस्थ आहे. जेव्हा आपण आपली खरी अवस्था जाणून घेऊ, मग... सारखेच... हे सारखेच उदाहरण. समजण्याचा प्रयत्न करा... समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही पाहणार की जमिनीचा काही भाग काहीवेळा पाण्याने आच्छादित असतो आणि काही वेळा ती पूर्ण जमीन असते. त्याचप्रमाणे काहीवेळा आपण माया या कनिष्ठ शक्तीने बद्ध असतो, आणि काहीवेळा आपण मुक्त असतो. आपण ती मुक्त अवस्था टिकवून ठेवायला हवी. जसे मोकळ्या जमिनीवर कोठेही पाणी नसते. जर तुम्ही समुदायाच्या पाण्यापासून थोडे दूर जाणार, तर तेथे पाणी असत नाही, ती पूर्णपणे जमीन असते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही स्वतःला भौतिक भावनेपासून वेगळे ठेवणार, व दिव्य अध्यात्मिक भावनेच्या, किंवा कृष्णभावनेच्या पृष्ठभूमीवर येणार तर तुम्ही तुमचे स्वातंत्र्य शाबूत ठेवणार. पण जर तुम्ही स्वतःला तटस्थ अवस्थेत ठेवणार, तर काहीवेळा तुम्ही मायेने बद्ध राहणार व काहीवेळा मुक्त राहणार. ही आहे आपली अवस्था.