MR/Prabhupada 0327 - जीव या शरीरात असतो. स्थूल शरीरात आणि सूक्ष्म शरीरात



Room Conversation -- April 20, 1976, Melbourne

कॅरोल जार्विस: तुम्ही मला पुर्वी सांगितले होते की तुमची पुस्तके विकून तुम्ही दिवसाला हजारो डॉलर्स कमावता.

प्रभुपाद: होय.

कॅरोल जार्विस: जर तुम्हाला तुमचे विचार दुसर्‍या लोकांपर्यंत पोहचवायचे असतील, तुम्ही पुस्तके का विकता आणि त्यातून पैसे का कमावता?

प्रभुपाद: नाहीतर तुम्ही ते वाचणारच नाही. जर मी तुम्हाला फुकट दिली, तर तुम्ही विचार कराल, "आह, हा काहीतरी मूर्खपणा आहे. ते विनामूल्य देत आहेत."

कॅरोल जार्विस : आवश्यक नाही की त्यांना फुकट द्या, पण कदाचित अशा किमतीला विका ज्याने उत्पादनाचा खर्च देईल.

प्रभुपाद: तर जेव्हा ते त्यासाठी पैसे देतील... जेव्हा ते त्यासाठी पैसे देतील, ते बघायचा प्रयत्न करतील "ही पुस्तके काय सांगत आहेत? मला पाहु द्या." आणि जर तुम्हाला फुकट मिळाली, तर तुम्ही शंभर वर्षे ती फडताळावर तशीच ठेवून द्याल. त्यामुळे, पण नंतर, आम्हाला ती मुद्रित करावी लागतात, त्यामुळे त्याला कोण पैसे देईल, आमच्याकडे पैसे नाही आहेत.

कॅरोल जार्विस: तसेच, बाकीच्या पैशांचे काय होते, जरी, ते रस्त्यात गोळा केले असले?

प्रभुपाद: आम्ही आमची चळवळ वाढवत असतो, आम्ही केंद्रे उघडत असतो. आम्ही अधिक पुस्तके मुद्रण करीत असतो. हे माझे पुस्तक आहे. मी भक्तिवेदान्त बुक ट्रस्ट केली आहे. ती माझी इच्छा आहे, आणि मी माझ्या मृत्युपत्रात लिहिले आहे की पन्नास टक्के वर्गणी पुस्तके पुन्हा मुद्रित करण्यावर खर्च करावी. आणि पन्नास टक्के चळवळीचा प्रसार करण्यास वापरावी. त्यामुळे भौतिक फायद्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

कॅरोल जार्विस: मला आश्चर्य वाटेल जर मी शेवटचे विचारीन, नंतर, जर तुमच्याकडे काही संदेश आहे?

प्रभुपाद: होय, हा संदेश आहे, की लोक प्रभावाखाली असतात की हे एक शरीर आहे. पण ह्यात तथ्य नाही आहे. आत्मा, किंवा पुरूष, तो शरीराच्या आत आहे. ज्याप्रकारे तुम्ही तुमचे नाही, हा सदरा आणि डगला. तुम्ही सदरा आणि डगला च्या आत आहात. त्याचप्रमाणे, जीव, आत्मा , या शरीरात आहे, स्थूल शरीर आणि सूक्ष्म देह . सूक्ष्म शरीर मन, बुद्धीमत्ता आणि अहंकार यांनी रचलेले आहे. आणि स्थूल शरीर या भौतिक गोष्टींनी रचलेले आहे, पृथ्वी, पाणी, हवा, आग, याप्रमाणे, पाच तत्वे. पूर्णपणे, आठ तत्वे. ही कनिष्ठ शक्ति आहे. आणि श्रेष्ट शक्ति या आठ घटकांमध्ये आहे, पाच स्थूल आणि तीन सूक्ष्म . त्यामुळे आम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल, ज्याप्रमाणे मी त्या मुलाला विचारले की, "तुम्ही एक मोठे यंत्र निर्माण करू शकता, आकाशात उडणारे, ७४७, पण तुम्ही वैमानिक का निर्माण करीत नाही?"