MR/Prabhupada 0329 - गाईची हत्या किंवा भाज्या चिरणे यात पापकर्म आहे



Room Conversation -- April 23, 1976, Melbourne

श्री. डिक्सन: मांस खाण्यावर मनाई, त्या वस्तुस्थितीतून येते की पशूंना त्यांचे जीवन असते जे दिले जाते…

प्रभुपाद: भाज्यांना पण जीवन असते.

श्री. डिक्सन: होय, मी काय विचारत आहे कारण की भाज्यांच्या तुलनेत जीवनामध्ये जनावरांना जास्त प्राधान्य आहे.

प्रभुपाद: प्राधान्याचा प्रश्न नाही. आमचे तत्वज्ञान आहे की आपण भगवंतांचे सेवक आहोत. तर भगवंत जे ग्रहण करतील आणि जे मागे उरेल ते आम्ही घेऊ. भगवद्-गीतेमध्ये… आपण हा श्लोक शोधा. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मी भक्त्या प्रयच्छति(भ.गी. ९.२६) । जसे आपण येथे आला आहात. जर मी तुम्हाला खाण्यायोग्य काही देऊ इच्छितो, ते माझे कर्तव्य आहे. "श्री. निक्सन, आपल्याला कोणता खाद्यपदार्थ खायला आवडेल?" तर तुम्ही म्हणाल, " मला हे खुप आवडते." मग, जर मी तुम्हाला तो पदार्थ दिला, तर तुम्ही आनंदी व्हाल. तर आम्ही या देवळात श्रीकृष्णांना बोलवले आहे. तर आम्ही वाट पाहत आहोत, त्यांना काय खायला आवडते? त्यांनी सांगितले की… गुरु-कृपा: "जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तिभावाने पान, फुल, किंवा पाणी दिले, मी ते स्वीकारेन. प्रभुपाद: पत्रं पुष्पं फलं. ते खूप साधी गोष्ट मागत आहेत जी प्रत्येकजण देऊ शकेल. ज्याप्रमाणे एक छोटे पान पत्रं, छोटे फुल पुष्पं, छोटे फळ, आणि द्रवपदार्थ, पाणी किंवा दूध. आपण देऊ शकतो. आम्ही या घटकांपासून विविध पदार्थ बनवतो, पत्रं पुष्पं फलं तोयं (भ.गी. ९.२६), श्रीकृष्णांनी ग्रहण केल्यावर, आम्ही ते घेतो. आपण सेवक आहोत; श्रीकृष्णांनी ग्रहण केल्यावर उरलेले पदार्थ आम्ही घेतो. आम्ही शाकाहारी नाही किंवा मांसाहारी नाही. आम्ही प्रसाद- हारी आहोत. आम्ही पर्वा करत नाही भाजी आहे किंवा नाही, कारण तुम्ही गाय मारा किंवा भाजी कापा. पापकर्म तिथे आहे. आणि निसर्ग नियमानुसार, असे सांगितले आहे की प्राणी, ज्यांना हात नाहीत, ते हात असणाऱ्या प्राण्यांचे अन्न आहे. आपण सुद्धा हात असलेले प्राणी आहोत. आपण मनुष्यप्राणी, आपण सुद्धा हात असलेले प्राणी आहोत. आणि ते प्राणी आहेत - हात नाहीत पण चार पाय. आणि असे प्राणी ज्यांना पाय नाहीत, त्या वनस्पती आहेत. आपदानि चतुष-पदं असे प्राणी ज्यांना पाय नाहीत, ते चार पाय असणाऱ्या प्राण्यांचे अन्न आहे. ज्याप्रमाणे गाय गवत खाते, बकरी गवत खाते. तर भाजीपाला खाणे, कोणतेही श्रेय नाही. तर बकरीला आणि गाईला श्रेय दिले पाहिजे, जास्त श्रेय, कारण ते भाज्या वगळता कशालाही स्पर्श करत नाहीत. तर आम्ही गाय आणि बकरी बनण्यासाठी प्रचार करत नाही. नाही. आम्ही प्रचार करतो की तुम्ही श्रीकृष्णांचे सेवक बना. तर श्रीकृष्ण जे ग्रहण करतात, ते आम्ही ग्रहण करतो. जर श्रीकृष्णांनी संगितले की "मला मांस द्या, मला अंडी द्या," तर आम्ही श्रीकृष्णांना मांस आणि अंडी देऊ आणि आम्ही ते घेऊ. म्हणून असा विचार करू नका की आम्ही शाकाहारी, मांसाहारी आहोत. नाही. ते आमचे तत्वज्ञान नाही. कारण तुम्ही भाज्या घ्या किंवा मांस घ्या, तुम्ही हत्या करत आहेत. आणि तुम्हाला हत्या केली पाहिजे कारण नाहीतर तुम्ही जगू शकत नाही. हा निसर्ग नियम आहे.

डॉ. डिक्सन: होय.

प्रभुपाद: म्हणून आम्ही त्या मार्गाने नाही.

श्री. डिक्सन: ठीक आहे, तुम्ही का मनाई करता… प्रभुपाद: सक्ती अशासाठी, मांसाहार नाही, कारण गाईचे संरक्षण आवश्यक आहे. आम्हाला दुधाची गरज आहे. आणि दूध घेण्याऐवजी, जर आपण गाय खाल्ली तर दूध कुठून येईल? श्री. डिक्सन: तर दूध खूप महत्वाचे आहे. प्रभुपाद:खूप, खूप महत्वाचे. श्री. डिक्सन जगासाठीअन्नाचे उत्पादन करण्याच्या बाबतीत, प्राणी न खाता हे जग अधिक चांगले होईल. प्रभुपाद: नाही, दूध आवश्यक आहे चरबीयुक्त पोषकद्रव्य आवश्यक आहे. ती गरज दुधाद्वारे पुरी केली जाते. म्हणून विशेषतः… श्री.डिक्सन: धान्याने तुमच्या सर्व गरजा पुऱ्या होऊ शकत नाहीत का?

प्रभुपाद: धान्य, नाही. धान्य, ते स्टार्च आहे. आपल्याला चार भिन्न प्रकारच्या अन्नाची गरज आहे, स्टार्च, कार्बोहाड्रेट, प्रथिन आणि चरबीयुक्त ते पूर्ण अन्न आहे. तर तुम्हाला या सर्व गोष्टी तांदूळ, डाळ, आणि गहू खाऊन मिळू शकतील. गोष्टींमध्ये… डाळ आणि गहूमध्ये प्रथिने असतात. आणि दुधात सुद्धा प्रथिने असतात. तर आपल्याला प्रथिने आवश्यक आहेत. दुधापासून चरबी मिळते. चरबी आवश्यक आहे. आणि भाज्या, कार्बोहाड्रेट; आणि धान्य, स्टार्च. जर तुम्ही हि सर्व सामुग्री घेऊन छान पदार्थ तयार केलात, तुम्हाला पूर्ण मिळेल. आणि श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवलात, मग ते शुद्ध होते. मग तुम्ही सर्व पापकर्मातून मुक्त आहात. नाहीतर, अगदी जरी तुम्ही भाजी चिरलीत, तुम्ही पापी आहात कारण त्याच्यात जीव आहे. तुम्हाला इतर जीवांना मारण्याचा अधिकार नाही. पण तुम्हाला जिवंत राहायचे आहे. हि स्थिती आहे. म्हणूनच उपाय आहे की तुम्ही प्रसाद घ्या. जर भाज्या किंवा मांस खाण्यात पाप असेल तर ते खाणाऱ्याला जाते. आम्ही उरलेले घेतो, एव्हढेच.