MR/Prabhupada 0330 - प्रत्येकाने ज्याची त्याची काळजी स्वतःच घेतली पाहिजे



Lecture on BG 1.26-27 -- London, July 21, 1973

जर आपण विचार करत असलो की " या भौतिक अस्तित्वात मी सुरक्षित राहीन, माझा समाज, मैत्री, प्रेम, देश,आणि राजकारण, आणि समाजशास्त्राच्या सहाय्याने," "नाही, नाही, श्रीमान, ते शक्य नाही." ते शक्य नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःची काळजी घ्यावी लागेल. तुमचा तथाकथित समाज, मैत्री, प्रेम, देश, राष्ट्र, आणि हे आपल्याला कधीही मदत करू शकणार नाही. कारण तुम्ही मायेच्या पकडीत आहात. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया (भ.गी. ७.१४) ।

प्रकृते: क्रियमाणानि
गुणै: कर्माणि सर्वश:
अहंकार विमूढात्मा
कर्ताहम् इति मन्यते
(भ.गी. ३.२७) ।

तुम्ही मायेच्या पकडीत आहात. तुम्हाला स्वातंत्र नाही. कोणालाही तुम्हाला वाचवण्याचे कोणतेही स्वातंत्र मिळालेले नाही. ते शक्य नाही. तेच उदाहरण जे मी कधी कधी दिले आहे, की तुम्ही विमान कसे चालवायचे हे शिकाल. तर तुम्ही उंच आकाशात जाल. पण तुम्ही संकटात असाल, इतर कोणतेही विमान तुमाला मदत करु शकत नाही. तुमचा शेवट झाला. म्हणून तुमची स्वतःची काळजी घेण्यासाठी तुम्ही सावध वैमानिक असले पाहिजे. त्याचप्रमाणे, या भौतिक जगात प्रत्येकाने स्वतंत्रपणे स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तो मायेच्या तावडीतून कसा वाचेल. ती कृष्णभावनामृत चळवळ आहे. शिक्षक तुम्हाला संकेत देऊ शकतील. आचार्य तुम्हाला संकेत देऊ शकतील की "तुम्ही या मार्गाने वाचू शकाल." पण कर्तव्यांची अंमलबजावणी, ती तुमच्या हातात आहे. जर तुम्ही योग्यरीत्या आध्यात्मिक कर्तव्ये पार पडलीत, तर तुम्ही वाचलात. नाहीतर, आचार्य तुम्हाला सूचना देतील, जर तुम्ही अनुसरण केले नाही, तर ते तुम्हाला कसे वाचवू शकतील? ते तुम्हाला सूचना देऊन, त्यांच्या कृपेने, जेव्हढे शक्य आहे तेव्हढे वाचवू शकतील. परंतु तुम्हाला तुमच्या हातात ते गंभीर्याने घेतले पाहिजे. तर हि अडचण आहे… अर्जुन आता या समस्येला तोंड देत आहे. ती सामान्य समस्या आहे. देहापत्य-कलत्रदिषु. देहापत्य. देह म्हणजे हे शरीर.अपत्य म्हणजे मुले. कलत्र म्हणजे पत्नी. देहापत्य-कलत्रादिश्व आत्म-सैन्येश्व असत्स्व आपि (श्रीमद् भागवतम् २.१.४) । आम्ही विचार करतो की "आमच्या या सैनिकांद्वारे आम्ही सुरक्षित होऊ. मला माझा मुलगा, नातू, माझे आजोबा, माझे सासरे, माझा मेहुणा, माझा हा माझा समाज, मित्र आणि प्रेम मिळाले आहेत." प्रत्येकजण असा विचार करत आहे की. " माझा देश, माझा समुदाय, माझे तत्वज्ञान, माझे राजकारण." नाही. काहीही तुमचे रक्षण करु शकत नाही.

देहापत्य-कलत्रादिषु असत्सु अपि. ते सर्व तात्पुरते आहेत. ते येतात आणि जातात. असत्सु अपि. प्रमत्तो तस्य निधनं पश्यन्न अपि न पश्यति. जो या समाजाशी, मित्रांशी आणि प्रेमाशी खूप आसक्त आहे, तो प्रमत्त आहे प्रमत्त म्हणजे विलक्षण आकर्षण असलेला, वेडा मनुष्य. पश्यन्न अपि न तस्य निधनं. तो बघत नाही. जरी तो बघत असला की "माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे वडील मला संरक्षण देत होते. आता माझे वडील गेले. मला संरक्षण कोण देत आहे? माझे वडील जिवंत आहेत का मला संरक्षण द्यायला? मला संरक्षण कोण देत आहे? माझी आई मला संरक्षण देत होती. आता मला संरक्षण कोण देत आहे? मी कुटूंबात होतो, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी पत्नी, पण मी त्यांना सोडले. आता मला संरक्षण कोण देत आहे? प्रत्यक्षात श्रीकृष्ण आपल्याला नेहमी संरक्षण देतात. तुमचा समाज, मित्र, आणि प्रेम नाही. एक दिवस त्या सर्वांचे अस्तित्व संपेल.