MR/Prabhupada 0332 - संपूर्ण जगाची शांततापूर्ण स्थिती असू शकते
Room Conversation -- April 27, 1976, Auckland, New Zealand
संपूर्ण जगाची शांततापूर्ण स्थिती असू शकते. फक्त बदमाश नेत्याद्वारे दुरावस्था. अन्यथा लोक खूप शांतपणे जगू शकतात, चांगले खाणे आणि वेळेची बचत, आणि जीवनातील आवश्यक गोष्टी थांबवण्याची गरज नाही. खाणे,झोपणे, लैगिक जीवनाची देखील व्यवस्था आहे. पण मूर्ख आणि दुष्टा सारखे नाही समजूतदार माणसा सारखे. पण आधुनिक संस्कृती, विवेकशून्य, वेडी संस्कृती आहे. लैगिक जीवनात थोडेसे सुख आहे - फक्त लैगिक जीवन, लैगिक जीवन वाढवणे, सर्वकाही नास करते. तो वेडेपणा आहे. खाणे - काहीही खा, कोणतीही वाईट गोष्ट, आणि डुक्कर बना. झोपणे - त्याला काही मर्यादा नाही, जर शक्य असेल चोवीस तास झोप. हे चालू आहे,
खाणे, झोपणे, संभोग. आणि संरक्षण - आणि आण्विक शस्त्रांचा शोध, हे शस्त्र, ते शस्त्र, आणि निष्पाप व्यक्ती मारणे, अनावश्यक, संरक्षण. हे चालू आहे. पण सर्वकाही शांततापूर्ण स्थितीसाठी व्यवस्थित वापरले जाऊ शकते, आणि जेव्हा तुम्ही शांत होता, तेव्हा कोणतीही अडचण नाही. मग तुम्ही आनंदाने हरे कृष्णाचा जप करु शकता आणि तुमचे आयुष्य यशस्वी बनवू शकता. हा आमचा कार्यक्रम आहे. आम्ही काहीही थांबवू इच्छित नाही. हे कसे थांबवता येईल? ज्या काही जरुरी गरजा आहेत… जसे आपण संन्यास घेतला आहे. ते काय आहे? "आमचे लैगिक जीवन नाही आहे. नाहीतर, आम्ही सुद्धा जेवतो, आम्ही देखील झोपतो." तर ते सुद्धा वृद्धावस्थेत बंद होते. वृद्धपकाळात, जर ऐशी वर्षाचा माझ्यासारखा माणूस, मी लैगिक आयुष्यासाठी खरेदी केली असती, तर ते खूप चांगले दिसले असते का? तरुण माणूस, त्यांना परवानगी आहे. ते ठीक आहे.
पण वृद्ध माणूस क्लबमध्ये जात आहे आणि खूप पैसे खर्च करत आहे. म्हणून तरुण पिढी, त्यांना वयाची पंचवीस ते पन्नास वर्षे गृहस्थ जीवन जगण्याची परवानगी आहे. एव्हढेच. त्यानंतर,लैगिक जीवन थाबवा. वास्तविक, त्यांना लोकसंख्येची वाढ थांबवायची आहे. मग संभोग का, मग? नाही, त्यांचे लैगिक जीवन सुरु असेल त्याच बरोबर लोकसंख्येची वाढ नाही, मुले मुरून टाकणे. ते काय आहे? केवळ पापी जीवन, ते दुःखी राहतील. तर आम्ही त्या दुःखांना थांबवू इच्छितो, हे दुष्ट, ते समजत नाहीत. ते विचार करतात, "हरे कृष्ण आंदोलन त्रासदायक आहे." दुष्ट सभ्यता. तर आपण आपला सर्वोत्तम प्रयत्न करूया. काय केले जाऊ शकते? आपण देखील या आंदोलनात मदत करत आहात. तर नवीन कल्पना निर्माण करून हे आंदोलन खराब करु नका. ते करु नका. मानक मार्गाने जा, स्वतःला शुद्ध ठेवा; मग हे आंदोलन यशस्वी होण्याची खात्री आहे. पण जर लहरींखातर खराब करू इच्छित असाल, तर काय करु शकतो? ती खराब होईल. तुमच्या लहरींखातर निर्माण केलेत आणि असहमती आणि स्वतःशी लढाई तर या तथाकथित चळवळीची दुसरी आवृत्ती असेल. ती आध्यात्मिक शक्ती गमावेल. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही करु शकत नाही… आता, लोक आश्चर्यचकित झाले आहेत: "ह्या हरे कृष्ण मंत्रात काय शक्ती आहे की ते इतक्या लवकर बदलत आहे?" आणि दुसऱ्याकडे, हे मान्य करणे आवश्यक आहे, जोपर्यंत त्याला शक्ती मिळत नाही ते कसे बदलेल? तर आपण ती शक्ती सांभाळली पाहिजे. त्याच्या सामान्य संगीत लहरी करु नका. ती वेगळी आध्यात्मिक गोष्ट आहे. ते संगीत लहरींसारखे वाटते, पण ते आध्यात्मिक आहे, मंत्रौषधी-वश. अगदी, मंत्राद्वारे साप वश होऊ शकतो. तर मंत्र सामान्य ध्वनी कंपन नाही . म्हणून आपल्याला ताकदवान, अपराधरहित जपाद्वारे, शुद्ध राहून मंत्राची ताकद जपली पाहिजे, जर तुम्ही मंत्र अपवित्र केलात, तर त्याचा प्रभाव कमी होईल.