MR/Prabhupada 0331 - खरे सुख भगवद् धाम परत जाण्यात आहे



Lecture on SB 6.2.16 -- Vrndavana, September 19, 1975

संपूर्णपणे, निष्कर्ष असा आहे की जो कोणी या भौतिक जगात आहे, तो पापी मनुष्य आहे. कोणीही, नाहीतर त्याला हे भौतिक शरीर मिळाले नसते. जसे की जो तुरुंगात आहे, तुम्ही निष्कर्ष काढू शकता की तो पापी, गुन्हेगार माणूस आहे, तुम्हाला एका मागून एक अभ्यास करायची गरज नाही. कारण तो तुरुंगात आहे तुम्ही निष्कर्ष काढू शकता की "इथे एक गुन्हेगार आहे." त्याचप्रमाणे, जो कोणी भौतिक जगात आहे, तो गुन्हेगार आहे. पण तुरुंगात अधीक्षक नाही. तुम्ही निष्कर्ष काढू शकत नाही की, "प्रत्येकजण तुरुंगात आहे, म्हणजे गुन्हेगार आहे, म्हणून तुरुंगाचा अधीक्षक, तो सुद्धा गुन्हेगार आहे." मग तुम्ही चुकीचे आहात. जो या पापी लोकांना संभाळत आहे ते परत परम धाम, परत घरी नेण्यासाठी, तो अपराधी नाही. तुरूंगातून या बदमाशांना कसे सोडवायचे हे त्याचे कार्य आहे. आणि परत त्यांना घरी, भगवद धाम न्यायचे.

तर महद-विचलनं नृणां गृहीणां दीन-चेतासां गृहिणां. गृहि म्हणजे जो कोणी या शरीरात रहात आहे किंवा जो कोणी या भौतिक जगात रहात आहे. हि एक संक्षिप्त गोष्ट आहे. तर ते खूप कमकुवत हृदयाचे आहेत. त्यांना माहित नाही की जीवनाचे मूल्य काय आहे. न ते विदुः स्वार्थगतिं हि विष्णु विष्णुं(श्रीमद् भागवतम् ७.५.३१) । म्हणून त्यांना ज्ञानी बनवण्याऐवजी, जर महात किंवा महात्मा, त्यांनी त्यांना अंधारात ठेवले, ते अतिशय वाईट आहे. त्यांना मार्गदर्शन दिले पाहिजे. त्यांचे कार्य प्रचार करणे आहे " या भौतिक जगात स्वतःला ठेऊ नका. आध्यात्मिक जगात या." हे महात्मांचे कार्य आहे. महद-विचलनं नृणां ग्रिहिनां दिन-चेतसां. ते अज्ञानी, मूढ आहेत. त्यांचे वर्णन मूढ, दुष्कृतीना केले आहे. हे सर्व पुरुष आपल्या अज्ञानामुळे पापकर्म करण्यात गुंतले आहेत. जर तुम्ही सांगितलेत, " नाही, तुम्ही कसे सांगू शकाल की ते अज्ञानात आहेत? अनेक विद्यापीठे आहेत. ते एमएसी, डीएसी, डॉक्टर, पीएचडी पास होत आहेत, आणि तरीही ते अज्ञानी आहेत?" "होय." "कसे?" माययापहृतज्ञाना: "तथाकथित ज्ञान मायेमुळे झाकले गेले आहे." नाहीतर ते का या भौतिक जगात पडले आहेत?

जर तुम्ही ज्ञानी असलात, तर तुम्हाला माहित असले पाहिजे, की हे भौतिक जग आपले निवास्थान नाही. आपण परत परम धाम गेले पाहिजे. म्हणून हि कृष्णभावनामृत चळवळ प्रचार करते की, " हे तुमचे घर नाही. इथे आनंदी राहण्याचा प्रयत्न करु नका." दुराशाया ये बहिर-अर्थ-मानिनः . बहिर-अर्थ-मानिनः. बहिर, बहिरंगा शक्ती. ते विचार करत आहेत की भौतिकदृष्ट्या, जर आपण काही व्यवस्था…" काही जण वैज्ञानिक सुधारणा करून आनंदी होण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा काही जण स्वर्गात जाण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि काही हे नाहीतर ते बनण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना माहित नाही की खरं सुख घरी परत जाण्यात, परम धाम जाण्यात आहे. न ते विदुः स्वार्थगतिं हि विष्णु विष्णुं (श्रीमद् भागवतम् ७.५.३१) त्यांना माहित नाही की. तर हि मह्त्वाची चळवळ आहे, की आम्ही त्यांना सूचना आणि शिक्षण देत आहोत. घरी, परम धाम कसे परत जायचे. खूप खूप धन्यवाद.