MR/Prabhupada 0346 - प्रचाराशिवाय, तत्वज्ञान समजल्याशिवाय, तुम्ही तुमची शक्ती सुरक्षित ठेऊ शकत नाही



Morning Walk -- December 12, 1973, Los Angeles

उमापती: मला वाटते की आपण भक्तांना कार्यालयात ठेवण्याच्या राजकीय शक्यतांबद्दल बोलत होतो, आणि आपल्याला आश्चर्यकारक शोध लागला की आपण पाश्चिमात्य मूल्यांच्या विरोधात असलेल्या प्रत्येक गोष्टींचे प्रतिनिधित्व करत आहोत. आपण तपस्येचे प्रतिनिधित्व करतो, आपण भगवत भवनामृताचे प्रतिनिधित्व करतो. आपण लैगिक स्वातंत्र,नशेला निर्बंध करतो. सर्व चार नियामक तत्त्वे जवळजवळ पूर्णपणे पाश्चिमात्य इच्छांच्या विरोधात आहेत.

प्रभुपाद: याचा अर्थ सर्व पाश्चिमात्य लोक राक्षस आहेत.

उमापती: तर अडचण आहे या परिस्थितीत कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करणे. हे सांगायला की " आम्ही या गोष्टीसाठी उभे आहोत," आणि कोणी तुमच्यासाठी मत देईल.

प्रभुपाद: जरी कोणी मत दिले नाही तरी पण आपण प्रचार केला पाहिजे. ते मी आधीच स्पष्ट केले आहे, काही विद्यापीठात. संपूर्ण देश अशिक्षित आहे. याचा अर्थ असा आहे का कि विद्यापीठ बंद केली पाहिजेत. विद्यापीठ असले पाहिजे. जो भाग्यवान आहे तो येईल आणि शिक्षण घेईल. हा मुद्दा नाही की " लोक अशिक्षित आहेत. त्यांना याची काळजी नाही. म्हणून विद्यापीठ बंद करुया." हा काही मुद्दा नाही.

यशोमतीनंदन: हळूहळू त्यांच्यात आकर्षण विकासत होईल

प्रभुपाद: होय, आपण काम केले पाहिजे, तो प्रचार आहे. तुम्ही प्रचार करणे सोपे आहे असा विचार करू नका. खाणे, झोपणे आणि कधीतरी जप करणे, "हरीबोल," एवढेच. तो प्रचार नाही. आपण संपूर्ण जगात कृष्णभावनामृत विचार रुजवण्यासाठी तयार असले पाहिजे.

उमापती: ते कदाचित एका रात्रीत होणार नाही, तरीपण,

प्रभुपाद: मूर्ती पूजा कार्यक्रम आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. जर आपण मूर्ती पूजेकडे दुर्लक्ष केले, तर आपलेही पतन होईल. पण सर्व कर्तव्य संपले नाही. आर्चायाम एव हरये पूजां यः श्रद्धयेह्ते. आर्च म्हणजे मूर्ती जर कोणी खूप चांगल्या प्रकारे मूर्ती पूजा करत असेल, पण न तद-भक्तेषु चान्येषु, पण त्याला जास्त काही माहित नाही, कोण भक्त आहे, कोण अभक्त आहे, जगासाठी काय कर्तव्य आहे, स भक्त: प्राकृतः स्मृतः, तो भौतिक भक्त आहे. तो भौतिक भक्त आहे. तर आपण खरोखरच कोण शुद्ध भक्त आहे समजण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि सर्वसाधारण लोकांसाठी आपले कर्तव्य काय आहे, आणि मग तुम्ही प्रगती करता. मग तुम्ही मध्यम-अधिकारी बनता. मध्यम-अधिकारी, प्रगत भक्त. जशी हि लोक, भारतात किंवा येथे, ते फक्त चर्चच्या कार्यात गुंतलेले राहतात. कोणत्याही समजेविना चर्चमध्ये जातात. म्हणून ते अयशस्वी झाले आहेत. आता असं आहे… चर्च बंद होत आहेत. त्याचप्रमाणे, जर तुम्ही स्वतःला प्रचार करायला योग्य ठेवत नसाल, तर तुमची सर्व मंदिर काळाच्या ओघात बंद पडतील. प्रचाराशिवाय, मंदिराची पूजा करायला उत्साह वाटणार नाही. आणि मंदिराच्या पूजेशिवाय, तुम्ही स्वतःला शुद्ध आणि स्वच्छ ठेऊ शकणार नाही. दोन गोष्टी समांतरच चालल्या पाहिजेत, मग यश आहे. आधुनिक काळात, एकतर हिंदू, मुसलमान, किंवा ख्रीश्चन कारण या ठिकाणी कोणतेही तत्वज्ञान शिकवत नाहीत. म्हणून ती बंद पडत आहेत, मशीद किंवा मंदिर किंवा चर्च. ती बंद होतील. प्रजापती: ते त्यांच्या कार्यांमध्ये काही चांगले परिणाम दाखवू शकत नाहीत.

प्रभुपाद: होय, तोच प्रचार आहे. म्हणून आम्ही अनेक पुस्तके लिहीत आहोत. जोपर्यंत आम्ही पुस्तकांची काळजी घेत नाही आणि प्रचार करत नाही आणि स्वतः वाचत नाही, तत्वज्ञान समजत नाही, हे हरे कृष्णा आंदोलन काही वर्षातच संपुष्टात येईल. कारण काही आयुष्य नसेल. कृत्रिमरीत्या किती दिवस आम्ही चालवू शकतो, "हरे कृष्ण! हरीबोल!" ते कृत्रिम होईल, काही आयुष्य नाही.

यशोमतीनंदन: ते बरोबर आहे प्रभुपाद. आम्ही इतके मूर्ख आहोत, आम्ही काही समजू शकलो नसतो जोपर्यंत तुम्ही आम्हाला तश्याप्रकारे सांगितले नसते. प्रचाराशिवाय....

प्रभुपाद: प्रचाराशिवाय, तत्वज्ञान समजल्याशिवाय, तुम्ही तुमची शक्ती सुरक्षित ठेऊ शकत नाही. प्रत्येकाला तत्वज्ञान पूर्णपणे समजले पाहिजे जे आम्ही मांडत आहोत. त्याचा अर्थ तुम्ही रोज काटेकोरपणे वाचले पाहिजे. आपल्याकडे अनेक पुस्तके आहेत. आणि भागवत इतके परिपूर्ण आहे की कोणताही श्लोक तुम्ही वाचा,तुम्हाला नवीन ज्ञान मिळते. ते खूप चांगले आहे. एकत्र भगवत गीता किंवा भगवंत. पण ते सामान्य लिखाण नाही.

उमापती: मी तुम्ही लिहिलेली भगवद गीता काही शाळांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांनी सांगितले, "ठीक आहे," त्यांच्यातील काही, जर त्यांच्याकडे भगवद गीता असेल, ते सांगतात, "ठीक आहे, आमच्याकडे एक भगवद गीता आहे." तर आम्ही, ओह, " हि भगवद गीतेची निराळी समज आहे," आणि ते सांगतात, "ठीक आहे, हे फक्त इतर कोणाचे मत आहे आणि आम्हाला त्याच पुस्तकावर वेगवेगळ्या मतांमध्ये जास्त रस नाही."

प्रभुपाद: हे मत नाहीये. आम्ही जशी आहे तशी मदत आहोत,कोणत्याही मताशिवाय. उमापती: ठीक आहे, ते त्यांचे मत आहे. त्यावर मात करणे फार कठीण आहे… प्रभुपाद: तर प्रचार करणे नेहमीच कठीण असते. ते मी वारंवार सांगत आहे. तुम्ही प्रचार खूप सोपा समजू शकत नाही. प्रचार युद्ध आहे. तुम्हाला असे म्हणायचे आहे का लढाई करणे सोपी गोष्ट आहे? लढाई सोपी गोष्ट नाही. जेव्हा युद्ध असते, तेव्हा धोका असतो, जबाबदारी असते. तर प्रचार म्हणजे... प्रचार काय आहे? कारण लोक अज्ञानी आहेत, आपल्याला त्यांना ज्ञान द्यावे लागेल. तो प्रचार आहे.

नर-नारायण: जेव्हा तुम्ही पाश्चात्य जगात आलात, मला वाटते कोणलाही विश्वास नव्हता की हे यशस्वी होईल. पण प्रत्यक्षात, ते खूप यशस्वी झाले,प्रचार करून.

प्रभुपाद: मला स्वतःला विश्वास नव्हता की मी यशस्वी होईन, इतरांबद्दल काय बोलणार. पण मी योग्य परंपरेद्वारे केले, म्हणून यशस्वी झाले.

यशोमतीनंदन: होय, श्रीकृष्ण एवढे कृपाळू आहेत की आपण काहीतरी अपेक्षा करतो आणि ते आम्हाला शंभरपट अधिक देतात.

प्रभुपाद: होय.

यशोमतीनंदन: म्हणून जर आम्ही फक्त तुमच्या सूचनांचे पालन केले, तर मला खात्री आहे की ते यशस्वी बनेल.

नर-नारायण: जर आम्ही योग्य परंपरेत असलो,तर आमचे राजकीय कार्य सुद्धा यशस्वी बनू शकेल?

प्रभुपाद: हो, का नाही? कृष्ण राजकारणात होता. तर कृष्णभावनामृत म्हणजे सर्वत्र: सामाजिक, राजकीय, तत्वज्ञान, धार्मिक, सांस्कृतिक, सर्वकाही. ते एकतर्फी नाही. ते तसे घेतात… त्यांना माहित नाही. म्हणून ते विचार करतात हे धार्मिक अंदोलन आहे नाही. हे सर्व समावेशी आहे सर्व समावेशी, सर्वव्यापी.