MR/Prabhupada 0347 - सर्व प्रथम तुम्ही जन्म घ्या जिथे आता कृष्ण उपस्थित आहेत
Lecture on BG 2.14 -- Mexico, February 14, 1975
हृदयानंद: आपण स्वतःला शुद्ध करून पूर्णपुरुषोत्तम भगवंतां बरोबरचे आपले नाते अनुभवू शकतो का?
प्रभुपाद: होय, तो शुद्धीचा केंद्रबिंदू आहे.
हृदयानंद: (स्पॅनिश)
हनुमान: प्रभुपाद, मी जाणून घेऊ इच्छितो, जर आध्यात्मिक जगात जन्म नाही, आध्यात्मिक जगात आपण कसे पुन्हा प्रवेश करू शकतो?
प्रभुपाद: ह्म्म? जन्मचा अर्थ आहे, सर्व प्रथम तुम्ही जन्म घ्या जिथे आता कृष्ण उपस्थित आहेत. कृष्ण अनेक ब्रम्हांडांपैकी एकामध्ये उपस्थित आहेत. अनेक ब्रम्हांड आहेत. तर तू पुढच्या ब्रम्हाडांमध्ये, किंवा कृष्ण जिथे आहेत तिथे तुझा जन्म घे, मग तुम्ही प्रशिक्षित होता. आणि जेव्हा तुम्ही प्रशिक्षित बनता,तेव्हा तुम्ही व्यक्तीगत रूपात वैकूंठाला जाता. जन्म नाही. हम्म, ते काय आहे?
हृदयानंद: अधिक प्रश्न आणि उत्तरे?
प्रभुपाद: जर तुम्हाला आवडले, मी पुढे जाऊ शकतो.
हृदयानंद: जर देवाकडे जाण्याचा दुसरा मार्ग असेल तर. जर दुसरा मार्ग असेल तर.
प्रभुपाद: नाही (हशा) कारण ते भगवद् गीतेमध्ये सांगितले आहे.
- भक्त्या मामभिजानाति
- यावान्यश्चास्मि तत्त्वतः
- ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा
- विशते तदनन्तरम्
- (भ.गी. १८.५५)
हे शोधा, भक्त्या मामभिजानाति.
हृदयानंद:
- भक्त्या मामभिजानाति
- यावान्यश्चास्मि तत्त्वतः
- ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा
- विशते तदनन्तरम्
- (भ.गी. १८.५५)
प्रभुपाद: कोणालाही भक्त बनल्याशिवाय देवाच्या राज्यात प्रवेश करण्याची परवानगी नाही.(खंडित) आणि भक्त बनण्यात काही अडचण नाही कारण… भक्त बनणे म्हणजे चार सिद्धांत. एक गोष्ट नेहमी श्रीकृष्णांचा विचार करायचा. मन्मना भव मद भक्त:. तो भक्त आहे. केवळ कृष्णांच्या बद्दल विचार करणे. ते आहे हरे कृष्ण. जेव्हा तुम्ही हरे कृष्णाचा जप करता, तुम्ही कृष्णाचा विचार करता. तुम्ही लगेच भक्त बनता. मन्मना भव बनल्यावर, मद्याजी: "तुम्ही माझी पूजा करता," मां नमस्कुरु, "आणि मला नमस्कार करता." हि खूप सोपी गोष्ट आहे. जर तुम्ही श्रीकृष्णांचा विचार केला आणि जर तुम्ही नमस्कार केला आणि तुम्ही त्यांची पूजा केली. या तीन गोष्टी तुम्हाला भक्त बनवतील. आणि तुम्ही परत घरी जाल, परमधाम जाल. आम्ही या गोष्टी शिकवत आहोत: हरे कृष्ण जप करा, मूर्तीला नमस्कार आणि पूजा करा. सर्व कार्य समाप्त करा.
हृदयानंद: (स्पॅनिश) तर का ते ज्ञान मार्गावर जातात? त्याच्यात इतके ज्ञान आणि व्याकरणाची गरज आहे, इतके नाक दाबायचे, अनेक गोष्टी आहेत, तुम्ही या सर्व गोष्टी टाळा. फक्त या तीन गोष्टी करा आणि तुम्ही भक्त बनाल. तुम्ही सोपी प्रक्रिया का स्वीकारत नाही आणि परत घरी, परत भगवत धाम जात नाही?
धन्यवाद.