MR/Prabhupada 0348 - जर पन्नास वर्ष एखाद्याने फक्त हरे कृष्ण जप केला, तो निश्चितपणे परिपूर्ण बनेल



Lecture on BG 7.14 -- Hamburg, September 8, 1969

इंग्रजी मुलगा: एखाद्याला याच आयुष्यात हे करणे शक्य आहे का? हे एक? असे एखाद्याचे पतन होणे शक्य आहे का?

प्रभुपाद: जर तुम्ही गंभीर असाल तर एका सेकंदात हे शक्य आहे. ते कठीण नाही. कृष्ण भक्ती… बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते: (भ.गी. ७.१९) "अनेक जन्मांनंतर, एखादा, जेव्हा एखादा बुद्धिमान असतो, ज्ञानी, पूर्ण विकसित, ज्ञानी, तो मला शरण येतो," असे श्रीकृष्ण सांगतात. जर मी हुशार आहे तर मला ते दिसेल "जर हेच आयुष्याचे ध्येय आहे, की अनेक जन्मांनंतर एखाद्याला श्रीकृष्णांना शरण जावे लागते, तर मी लगेच शरण का जाऊ नये?" हि बुद्धीमत्ता आहे. जर हे खरे असेल, तर त्यास या मुद्द्यापर्यंत आले पाहिजे, अनेक जन्मांनंतर ज्ञान रुजवल्यावर, मग का नाही ते लगेच स्वीकार करायचे? जर हे खरे असेल, तर मी अनेक जन्म का वाट पाहू? तर त्यासाठी थोडी बुद्धिमत्ता आवश्यक आहे. त्यासाठी अनेक जन्मांची गरज नाही. त्यासाठी थोडी बुद्धिमत्ता आवश्यक आहे. हे कृष्णभावनामृत गंभीरपणे घ्या; तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. आता, जर तुम्ही विश्वास ठेवत नसाल, तर मग तर्क करा,तत्वज्ञान जाणा, कारण शोधा. तर्क करत रहा, अनेक पुस्तके आहेत. खात्री करा. तुम्ही ते शिकू शकता. भगवद् गीतेमध्ये प्रत्येकाचे उत्तर आहे. तुम्ही तुमच्या तर्काने, तुमच्या कारणानी समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. ते खुले आहे. (खंडित)

अर्जुनाप्रमाणे. अर्जुनाला भगवद् गीता शिकवली, किती वेळात? जास्तीत जास्त, अर्ध्या तासामध्ये. कारण तो खूप बुद्धिमान होता. हि भगवद् गीता, जगातील लोक वाचत आहेत. अत्यंत विद्वान, ज्ञानी पुरुष, ते वाचत आहेत. ते वेगवेगळी व्याख्या देऊन समजण्याचा प्रयत्न करत आहेत, हजारो आवृत्या, समालोचन आहेत. पण अर्जुन बुद्धिमान होता. तो अर्ध्या तासाच्या आत समजला. तर त्यासाठी सापेक्ष बुद्धिमत्ता आवश्यक आहे. सर्वकाही, हे जग सापेक्ष आहे. सापेक्षता कायदा. ते वैज्ञानिक आहे. प्रोफेसर आइनस्टाइन सिद्धांत? सापेक्षता कायदा? म्हणून ते सापेक्ष आहे. एखादा लगेच काही सेकंदात कृष्णभावनामृत बनू शकेल, आणि एखादा अनेक जन्मानंतर कृष्णभावनामृत बनू शकणार नाही. तर ते सापेक्ष आहे. जर तुमच्याकडे पुरेशी बुध्दिमत्ता असेल, तुम्ही ताबडतोब स्वीकारु शकता. जर बुद्धिमत्ता कमी असेल, तर जास्त वेळ लागेल. तुम्ही सांगू शकत नाही की "ते किती जन्मानंतर शक्य होईल." ते सांगता येत नाही. ते सापेक्ष आहे. सर्व काही सापेक्ष आहे. एका मनुष्यासाठी, इथून ते तिथे, एक पाऊल; आणि एका सूक्ष्म जीवासाठी, इथून ते तिथे दहा मैल, त्याच्यासाठी दहा मैल. तर सर्व काही सापेक्ष आहे. हे जग सापेक्ष जग आहे. असे कोणतेही सूत्र नाही की " एखादा अमुक एवढ्या वर्षानंतर कृष्णभावनामृत बनू शकतो." नाही. असे काही सूत्र नाही. एखादा लाखो जन्मांनंतर सुद्धा कृष्णभावनामृत बनू शकत नाही. आणि एखादा एका सेकंदात कृष्णभावनामृत बनू शकतो. पण दुसरी बाजू, जर आपण गंभीरपणे स्वीकारले तर आपण या आयुष्यात कृष्णभावनामृतामध्ये परिपूर्ण बनू शकतो विशेषतः तुम्ही सर्व तरुण मुले आहात. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही कमीतकमी पन्नास वर्षे जगाल. ओह, तो पुरेसा वेळ आहे. पुरेसा. गरजेपेक्षा जास्त. गरजेपेक्षा जास्त. जर पन्नास वर्ष एखाद्याने फक्त हरे कृष्ण, हरे कृष्ण जप केला, तो निश्चितपणे परिपूर्ण बनेल. त्याबद्दल काही शंकाच नाही. फक्त जर त्याने या मंत्राचा जप केला, हरे कृष्ण, ओह, यात काही शंकाच नाही.