MR/Prabhupada 0354 - अंध व्यक्ती इतर अंध माणसांना मार्ग दाखवत आहे
Lecture on SB 2.3.2-3 -- Los Angeles, May 20, 1972
प्रद्युम्न : "तात्पर्य: मानवी समाजात, संपूर्ण जगभर, लाखो करोडो स्त्रीपुरुष आहेत, आणि त्यांपैकी जवळजवळ सर्वचजण कमी बुद्धिमान आहेत कारण त्यांच्याकडे आत्म्याचे अतिशय मोजके ज्ञान आहे."
प्रभुपाद: हे आमचे आव्हान आहे, की संपूर्ण जगात लाखो करोडो स्त्री पुरुष आहेत. पण ते अजिबात बुद्धिमान नाहीत. हे आमचे आव्हान आहे. तर, कृष्णभावनामृत आंदोलनाला इतर वेडेपणा समजतात, किंवा आम्ही आव्हान देतो की "तुम्ही सर्व वेडी माणसे आहेत." म्हणून आमच्याकडे पुस्तक आहे, "कोण वेडा आहे?" कारण ते विचार करतात की "हि मुंडन केलेली मुले आणि मुली वेडी आहेत. पण वास्तविक ते वेडे आहेत. कारण त्यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही. का? त्यांना माहित नाही आत्मा काय आहे. हि प्राणी चेतना आहे. कुत्रे, मांजरी, ते विचार करतात की हे शरीर आहे, ते शरीर आहेत. जनेष्वभिज्ञेषु स एव गोखरः
- यस्यात्त्म बुद्धी; कुणपे त्रिधातुके
- स्वधी: कलत्रादिषु भौम इज्यधी:
- यतीर्थबुद्धी: सलिले न कर्हिचीज्
- जनेष्वभिज्ञेषु स एव गोखरः
- (श्रीमद् भागवतम् १०.८४.१३)
गो-खर. गो म्हणजे गाय, आणि खर म्हणजे गाढव. जी व्यक्ती शारीरिक चेतनेमध्ये असते, "मी हे शरीर आहे." तर संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी ९९.९% लोक, हे असे आहे, "मी हे शरीर आहे," "मी अमेरिकन आहे," "मी भारतीय आहे," "मी आफ्रिकन आहे," "मी हे आहे…" आणि ते कुत्र्या आणि मांजरासारखे भांडत असतात, ते भांडतात, "मी मांजर आहे, तू कुत्रा आहेस. तू कुत्रा आहेस, मी मांजर आहे." एवढेच. तर हे आव्हान आहे, की " तुम्ही सर्व दुष्ट आहात, हा खूप कडक शब्द आहे, पण वास्तविक ते सत्य आहे. ते सत्य आहे. ते एक क्रांतिकारी अंदोलन आहे. आम्ही प्रत्येकाला आव्हान देत आहोत. "तुम्ही सर्व गाढव आणि गाय आणि जनावरांचा समूह आहात, कारण तुम्हाला या शरीरापलीकडचे काही माहित नाही." म्हणून असे सागितले आहे… या तात्पर्यामध्ये, विशेषतः मी उल्लेख केला आहे. "कारण त्यांना आत्म्याबद्दल थोडेसे ज्ञान आहे. त्यांच्यापैकी सर्वजण बुद्धिमान नाहीत." मी मोठ, मोठया प्राध्यापकांशी बोललो आहे. मॉस्कोमध्ये, ते सज्जन, प्राध्यापक कोटोव्स्की, ते म्हणाले, "स्वामीजी, मरणानंतर, काहीच नाही. सर्वकाही संपून जाते." आणि ते देशातील एक मोठे प्राध्यापक आहेत. तर आधुनिक संस्कृतीचा हा एक दोष आहे. खरे पाहता संपूर्ण समाजावर मांजरी आणि कुत्रांचे राज्य आहे. तर मग शांती आणि समृद्धी कशी असू शकते? ते शक्य नाही. अंधा यथान्धैर उपनियमानाः एक अंध मनुष्य दुसऱ्या अंध मनुष्याना मार्ग दाखवत आहे. जर एखाद्याकडे पहाण्यासाठी डोळे आहेत, तो शेकडो आणि हजारो लोकांचे नेतृत्व करू शकतो. "कृपया माझ्या बरोबर चला. मी रस्ता पार करून देऊ शकतो." पण जो माणूस नेतृत्व करतो, तो स्वतः अंध असेल, तो कसा इतरांचे नेतृत्व करू शकेल. अंधा यथान्धैर उपनियमानाः. म्हणून भागवत, तिथे तुलना नाही. होऊ शकत नाही. हे दिव्य विज्ञान आहे. अंधा यथान्धैरुपनीयमानास्ते अपीश तन्त्र्यामुरुदाम्नि बद्धाः (श्रीमद् भागवतम् ७.५.३१) । ईश- तंत्र्याम हे अंध नेते, ते भौतिक निसर्ग नियमांनी बांधलेले आहेत, आणि ते सल्ला देत आहेत. ते कोणता सल्ला देऊ शकतात?