MR/Prabhupada 0355 - मी काहीतरी क्रांतिकारक बोलतोय



Lecture on SB 5.5.1-8 -- Stockholm, September 8, 1973

कामान् म्हणजे जीवनातल्या जीवनावश्यक गरजा. आपण फार सहजपणे आपल्या जीवनातल्या जीवनावश्यक गरजा मिळवू शकता. शेत नांगरून, तुम्हाला धान्य मिळते. आणि जर गाय असेल, तर तुम्हाला दूध मिळते. त्यात सर्व काही आहे. ते पुरेसे आहे. पण नेते योजना बनवत आहेत, की जर ते त्यांच्या शेतीच्या कामा सम्बधी खुश असतील, थोडे धान्य आणि दूध, नंतर कोण कारखान्यात काम करेल? त्यामुळे ते कर आकारतात म्हणून आपण अगदी साधे जीवन जगू शकत नाही - ही परिस्थिती आहे. आपल्याला जरी इच्छा असली, तरी आधुनिक नेते आपल्याला अनुमती देत नाहीत. ते तुम्हाला कुत्रे आणि डुक्कर आणि गाढवा प्रमाणे काम करायची सक्ती करतात. ही स्थिती आहे. पण तरीही, आम्ही अशा अनावश्यक कठीण परिश्रमापासून स्वतःला परावृत केले पाहिजे. पण असू शकते की सरकार माझ्या विरुद्ध कारवाई करेल, कारण मी क्रांतिकारक काहीतरी बोलत असतो. होय. पण ते खरं आहे. का आपण काम करावे? भगवंताने पक्षी, पशू, प्राणी, मुंग्या ह्यांची तरतूद केली आहे, आणि जर मी भगवंताचा भक्त असेल तर, तो मला अन्न देणार नाही? मी काय चुक केली आहे? तर ह्या मुदयावर क्षुब्ध होऊ नका. तुमच्या जवळ जीवनातल्या सर्व जीवनावश्यक गरजा असतील, पण तुम्ही कृष्ण भावनेच्या दृढ संकल्पने मध्ये निश्चिंत राहा. ह्या मूर्ख विश्वासाने क्षुब्ध होऊ नका. आपला फार आभारी आहे.