MR/Prabhupada 0357 - मला या नास्तिक संस्कृती विरुद्ध एक क्रांती सुरू करायची आहे
Morning Walk -- December 11, 1973, Los Angeles
प्रभुपाद: माझे आरोग्य नेहमीच चांगले असत नाही. तरीही, का मी प्रयत्न करीत आहे? माझी महत्वाकांक्षा आहे. मी एक क्रांती सुरू करू इच्छितो. त्यांची नास्तिक संस्कृती, नास्तिक संस्कृती विरुद्ध, ती माझी महत्वाकांक्षा आहे. अमेरिकेतले लोक ह्या पन्था मध्ये आणि पुढाकार घेण्यात शिकवण्यासाठी उत्तम आहेत, पुढारी होण्यासाठी. ते आधीच पुढारी आहेत, परंतु आता खरे पुढारी असणे आवश्यक आहे, जेणेकरून संपूर्ण जग आनंदी असू शकते. मी दिशा देऊ शकतो. जर सर्वोच्च अमेरिकी सज्जन माझ्या कडे आला, मी त्यांना दिशा देऊ शकतो जेणेकरून ते जागतिक पुढारी बनू शकतात. वास्तविक पुढारी, बनावट पुढारी नाही. कारण देवाने त्यांना अनुकुलता दाखविली आहे, खूप काही गोष्टी. आणि ही चळवळ अमेरिका पासून सुरु केली गेली आहे. मी ही चळवळ न्यूयॉर्क पासून सुरू केली होती. त्यामुळे शासनाने खूप गांभीर्याने घेतले पाहिजे. (विश्रांती)
ह्रुदयानन्द: तुम्ही असे म्हणता की अमेरिका सर्वात महत्वाची आहे?
प्रभुपाद: होय.
ह्रुदयानन्द: आपल्याला वाटते...
प्रभुपाद: म्हणून मी तुमच्या देशात आलो आहे...
ह्रुदयानन्द: म्हणून कदाचित...
प्रभुपाद: कारण आपण सर्वात महत्वाचे आहात. आता तुम्हाला आवश्यकता आहे... माझ्या मार्गदर्शनाखाली आपण खरे महत्वाचे आहात, खोटे महत्व नाही.
ह्रुदयानन्द: त्यामुळे कदाचित मला इथे राहीले पाहिजे आणि प्रवचन केले पाहिजे.
प्रभुपाद: आह?
ह्रुदयानन्द: जर ते फार महत्वाचे आहे, तर कदाचित मला वाटते की मला इथे राहीले पाहिजे आणि रूपानुग ला मदत केली पाहिजे.
प्रभुपाद: होय. तुमचा संपूर्ण देश वळवा, भगवंतांच्या भावने मध्ये वळवा, कारण त्यांनी संविधाना मध्ये घोषित केले आहे की, "देवावर आमचा विश्वास आहे." आता त्यांनी फार गंभीरपणे ते घेणे आवश्यक आहे. "देव" म्हणजे अर्थ काय आहे? "विश्वास" म्हणजे अर्थ काय आहे? आपण या प्रचाराचे तंत्र घ्या. आम्ही करत आहोत, वास्तविकपणे. आमचा देवावर विश्वास आहे; म्हणून आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्याचा देवासाठी त्याग केला आहे. हा देवावरचा विश्वास आहे. असे नाही की प्रसाधन गृहात धूम्रपान करा, आणि तुमचा देवावर विश्वास आहे. त्या प्रकारचा विश्वास नाही. खरा विश्वास.